Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Relief for livestock farmers : दुष्काळात पशुपालकांना दिलासा! वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार, शेतकरी गटांना २० हजारांचे चारा बियाणे

Relief for livestock farmers : महाराष्ट्रात २०२६-२७ मध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या अटी शिथिल केल्या आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 16, 2026 | 08:17 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार रुपयांचे चारा बियाणे 
  • शेतकरी गटांना २० हजार रुपयांपर्यंत लाभ  
  • योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत  
Relief for livestock farmers :  राज्यात २०२६-२७ मध्ये कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांतील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या अटी शिथिल केल्या आहेत. चारा टंचाईवर मात करण्यासाठी या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी तसेच शेतकरी गटांना अतिरिक्त चारा बियाणे व ठोंबे वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही सवलत केवळ २०२६-२७ या वर्षासाठी लागू राहणार आहे.

योजनेच्या ९ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, वैयक्तिक लाभार्थ्याकडे स्वतःचे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. मात्र, दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन ही किमान पशुधनाची अट चालू वर्षासाठी शिथिल करण्यात आली आहे.

वैयक्तिक लाभार्थ्यांना ४ हजार रुपयांचे चारा बियाणे

योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना एक हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर चार हजार रुपये किमतीचे चारा बियाणे देण्यात येते. संबंधित लाभार्थ्याकडे चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यास आणि प्रथमच लाभ मागणाऱ्या नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्यास, एकापेक्षा अधिक वेळा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Baramati Agricultural News: बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव 

शेतकरी गटांना २० हजार रुपयांपर्यंत लाभ

शेतकरी समूह किंवा गटांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत १०० टक्के अनुदानावर २० हजार रुपये किमतीचे चारा बियाणे देण्यात येते. चारा उत्पादनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असलेल्या गटांना, प्रथमच लाभ मागणाऱ्या अर्जदारांची मागणी पूर्ण झाल्यानंतर, उपलब्धतेनुसार एकापेक्षा अधिक वेळा बियाणे वाटप करता येणार आहे.

सर्वसाधारणपणे ही योजना वर्षातून एकदाच राबविण्यात येते. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती विचारात घेऊन चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्याची खातरजमा केल्यानंतर अतिरिक्त लाभ देण्याची सवलत देण्यात आली आहे. यासाठी संबंधित उपायुक्त पशुसंवर्धन यांनी पाणीसाठा उपलब्ध असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे. तसेच, प्रथमच लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांची मागणी प्रलंबित नसल्याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हा व विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

योजनेबाबत अधिक माहितीसाठी पशुपालकांनी १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर किंवा ९०६३१४२२९९ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

“दुष्काळजन्य परिस्थितीत पशुपालकांना आर्थिक दिलासा देणे आणि चाऱ्याचा तुटवडा जाणवू न देणे यासाठी शासन कटिबद्ध आहे. अटी शिथिल केल्यामुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त चारा उत्पादन घेता येईल. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,” असे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

Nashik News : डांगर उत्पादक शेतकरी संकटात! ७० टक्के पीक खराब,किलोला मिळतोय अवघा ४ ते ५ रुपये भाव

Web Title: Maharashtra fodder seed subsidy farmers livestock relief 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Farmer Crisis
  • Farmers

संबंधित बातम्या

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
1

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी
2

Nagpur News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करा; आशिष जयस्वाल आणि बच्चू कडू यांची मागणी

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका
3

Amravati News: धानपिकाला टँकरच्या पाण्याचा आधार! शेतकऱ्यांची धडपड, पीक करपण्याची भीती, आर्थिक फटका

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही
4

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.