Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

ST Bus Employee: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी राज्य शासनाकडून ३९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 27, 2026 | 02:03 PM
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर

Follow Us
Follow Us:
  • दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा
  • सरकारकडून ३९१ कोटींचा निधी मंजूर
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश
 

ST Bus Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Bus Employee) दिवाळीपूर्वीच्या वेतनासाठी महाराष्ट्र सरकारने ३९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

३९१.०२ कोटींचा निधी वितरित

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ₹३९१.०२ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित झाला आहे.

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा

दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा

एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणतः दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच वेतन मिळावे, यासाठी मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने पाठपुरावा केला.

एसटी महामंडळाच्या प्रवासी सवलत योजनांपोटी शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेला महामंडळाच्या आर्थिक नियोजनात महत्त्वाचे स्थान आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींची अंमलबजावणी करताना महामंडळावर मोठा आर्थिक भार येतो. या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वेळेत उपलब्ध झाल्यास महामंडळाच्या आर्थिक व्यवहारांना गती मिळण्यास मदत होते. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीपूर्व वेतनासाठी निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे.

कर्मचाऱ्यांच्या सणाच्या आनंदावर आर्थिक अडचणींचे सावट पडू नये, यासाठी शासन आणि एसटी प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती. “एसटी ही केवळ परिवहन सेवा नसून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सेवेला अहोरात्र कार्यरत ठेवणारे अधिकारी आणि कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे, यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी,” अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.

ST Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीचा मुद्दा ऐरणीवर; प्रताप सरनाईक यांना २० हजारांसाठी निवेदन

Web Title: Maharashtra government approves 391 crore funds st msrtc employees diwali salary pratap sarnaik sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • ST Employees

संबंधित बातम्या

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा
1

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा

MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा
2

MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा

ST Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीचा मुद्दा ऐरणीवर; प्रताप सरनाईक यांना २० हजारांसाठी निवेदन
3

ST Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीचा मुद्दा ऐरणीवर; प्रताप सरनाईक यांना २० हजारांसाठी निवेदन

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र
4

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.