Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा

ST Employees Salary: एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कोविड काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी त्यांचे कौतुक केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 26, 2026 | 11:54 AM
एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष; अजित पवारांचे कौतुक, फडणवीसांवर बरगेंचा निशाणा

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या निधीवरून राजकीय संघर्ष
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला अजित पवार धावले
  • फडणवीस सरकारवर श्रीरंग बरगेंची टीका
ST Employees Salary: कोरोना महामारीच्या काळात एसटीचे उत्पन्न शून्यावर आले असतानाही तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही, मात्र विद्यमान अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी करूनही एसटी महामंडळाला कधीच पूर्ण निधी दिला नाही, अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा मिळत नसल्याने दिवाळीच्या तोंडावर विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनाच्या नोटिसा दिल्या आहेत. अर्थ खात्याकडून एसटी महामंडळाच्या निधीला सातत्याने कात्री लावली जात असल्याने महामंडळाची आर्थिक कोंडी झाल्याचा आरोप बरगे यांनी केला.

ST Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीचा मुद्दा ऐरणीवर; प्रताप सरनाईक यांना २० हजारांसाठी निवेदन

कोरोना महामारीमुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली होती आणि उत्पन्न पूर्णपणे बंद झाले होते. अशा संकटाच्या काळातही तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ४,००० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी आल्यानंतर एसटीला मागणीनुसार कधीच पूर्ण निधी मिळालेला नाही, असे बरगे यांनी सांगितले.

११७८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी कमी

नोव्हेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत वेतनासाठी महामंडळाला ५९४४ कोटी रुपयांची गरज असताना शासनाकडून प्रत्यक्षात ४७६५ कोटी ८५ लाख रुपयेच मिळाल्याने सुमारे ११७८ कोटी १५ लाख रुपयांचा निधी कमी पडल्याचा दावा बरगे यांनी केला.

अजित पवार यांनी उत्पन्न बंद असतानाही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी घेतली होती. मात्र, फडणवीस यांच्या काळात मागणी करूनही पूर्ण निधी मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रकमांसाठी संघर्ष करावा लागत आहे, असे बरगे म्हणाले.

एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असताना तिच्या सेवकांच्या आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष केले जात आहे. निधीअभावी कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमा रखडणे हे योग्य नाही. भविष्यात हीच परिस्थिती राहिली तर सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही बरगे यांनी दिला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न ऐरणीवर

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, वेतनवाढीचा फरक, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रॅच्युइटी आणि इतर देयकांचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. महामंडळाला आर्थिक मदत वेळेवर मिळाली नाही, तर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी भागवावीत, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून होत आहे. कोविड काळातील निधी वितरणाचा दाखला देत बरगे यांनी सध्याच्या सरकारच्या निधीवाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

MSRTC employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष? मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवण्याचा संघटनेचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोविड काळात एसटी कर्मचाऱ्यांसाठी किती निधी वितरित करण्यात आला होता?

    Ans: सप्टेंबर २०२१ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्चांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

  • Que: श्रीरंग बरगे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर काय आरोप केला आहे?

    Ans: एसटी महामंडळाला मागणीप्रमाणे निधी मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक देणी आणि महामंडळाच्या अडचणी कायम असल्याचा आरोप बरगे यांनी केला आहे.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख आर्थिक मागण्या कोणत्या आहेत?

    Ans: कर्मचाऱ्यांचे वेतन, वेतनवाढीचा फरक, पीएफ, ग्रॅच्युइटी आणि इतर प्रलंबित देणी वेळेवर मिळावीत, तसेच एसटी महामंडळाला आवश्यक आर्थिक मदत मिळावी, या प्रमुख मागण्या आहेत.

Web Title: Ajit pawar supported st employees during covid fadnavis fund demand shrirang barge sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • msrtc
  • Shrirang Barge
  • ST Employees

संबंधित बातम्या

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल
1

Manoj Jarange Audio Clip Row : ‘फडणवीस, शिंदे आणि जरांगे… बाकी सगळे एक्स्ट्रा!’ म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप
2

Manoj Jarange Patil threat attack: मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचे माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत…; जरांगे पाटलांचा आरोप

Maharashtra Agniveer Police Recruitment: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: २८२ अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबलपदी नियुक्ती
3

Maharashtra Agniveer Police Recruitment: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: २८२ अग्निवीर पोलीस कॉन्स्टेबलपदी नियुक्ती

Raj Thackeray : ‘हा लोकशाहीवरचा बलात्कारच!’ 500 कोटींच्या क्लिपवरून राज ठाकरे संतापले, ‘फ्रेंडशिप फाईल’वरून सरकारला घेरलं
4

Raj Thackeray : ‘हा लोकशाहीवरचा बलात्कारच!’ 500 कोटींच्या क्लिपवरून राज ठाकरे संतापले, ‘फ्रेंडशिप फाईल’वरून सरकारला घेरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.