भिडे पूल वाहतुकीसाठी बंद (फोटो- ai gemini)
मुठा नदीवरील भिडे पुलाच्या वरून हा महत्त्वाचा पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या निर्मितीमुळे नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांना, तसेच या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकात ये-जा करणे अत्यंत सोयीचे आणि सुलभ होणार आहे. तथापि, पुलाचे बांधकाम वेगाने आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित वातावरणात पूर्ण करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मोठी बातमी! पुण्यातील ‘हा’ सुप्रसिद्ध पूल दीड महिना राहणार बंद; काय आहे कारण?
भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असला, तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहनचालकांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
भिडे पूल बंद आणि पर्यायी मार्ग
१. लकडी पूल
२. बालगंधर्व पूल
३. झेड ब्रिज
पुण्यातील खडकवासला धरण ‘फुल्ल’; भिडे पूल गेला पाण्याखाली, जाणून घ्या इतर धरणांची स्थिती…
पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या कालावधीत नागरिकांना होणाऱ्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल पुणे मेट्रो प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पुण्यातील नदीपात्रातील सुप्रसिद्ध भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
Ans: भिडे पूल गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
Ans: नवीन पादचारी पुलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकात थेट आणि सोयीस्करपणे ये-जा करता येणार आहे.






