Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कधी होणार? राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक कधी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त या निवडणुकांमध्ये VVPAT वापरण्यात येणार नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 05, 2025 | 04:52 PM
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक कधी होणार? राज्य निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक कधी होणार? राज्य निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Elections News In Marathi : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली आहे की या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच सगळ्या भागांमध्ये एकाच वेळी निवडणुका न घेता वेगवेगळ्या टप्प्यांत घेतल्या जातील. याव्यतिरिक्त या निवडणुकांमध्ये VVPAT (मतदान यंत्राला जोडलेली पर्ची दाखवणारी यंत्रणा) वापरण्यात येणार नाही. त्यामुळे मतदाराने दिलेला मत यंत्राद्वारेच नोंदवला जाईल, पण त्याची पावती मिळणार नाही. आयोगाने यामागचे कारण तांत्रिक आणि प्रशासनिक सोयीचे असल्याचे सांगितले आहे. तसेच या निवडणूका कधी होणार हे देखील निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

आता प्रवाशांना मिळणार जलद सेवा! ST महामंडळ आणणार ओला-उबरसारखं सरकारी अ‍ॅप

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Municipal Elections 2025) ची प्रक्रिया दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेर सुरू होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. आज नाशिक (नाशिक न्यूज) विभागात येणाऱ्या निवडणुकांबाबत आढावा बैठक झाली, यावेळी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूकपूर्व तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने आखले जाईल. नाशिक विभागात एकूण ५० लाख ४५ हजार मतदार आहेत आणि ४,९८२ मतदान केंद्रे आहेत. यासाठी ८,७०५ नियंत्रण युनिटची आवश्यकता असेल आणि १७,००० हून अधिक मतदान यंत्रांची आवश्यकता आहे. सर्व निवडणुका एकत्रित केल्याने मनुष्यबळाची मोठी अडचण येणार आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त, कोणत्या संस्थेची निवडणूक आधी घ्यायची हे अद्याप निश्चित झालेले नाही, असे दिनेश वाघमारे यांनी सांगितले आहे.

ओबीसी आरक्षणासाठी लॉटरी पद्धत

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना वाघमारे यांनी सांगितले की, एससी-एसटी आरक्षण निश्चित आहे, परंतु ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाईल. त्यांनी स्पष्ट केले की, “ओबीसी आरक्षण फक्त मागील निवडणुकांमध्येच होते आणि यावेळीही तेच तत्व पाळले जाईल.”

मतदार यादी आणि प्रभाग निर्मितीचे काम सुरू

१ जुलै २०२५ पर्यंत मतदार यादीच्या आधारे निवडणुका घेतल्या जातील. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर, पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक यंत्रणांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

व्हीव्ही-पीएटी प्रणाली वापरली जाणार नाही

वाघमारे यांनी स्पष्ट केले की, निवडणुकीत व्हीव्ही-पीएटी मशीन वापरल्या जाणार नाहीत. दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

मोठी बातमी! महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय

Web Title: Maharashtra local body elections to be held in december january says state election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • BMC
  • elections
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
3

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.