Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra MSME Council 2026 : नवी मुंबईत २७ जूनला रंगणार महाराष्ट्र एमएसएमई परिषद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

जागतिक MSME दिनानिमित्त 27 जून 2026 रोजी नवी मुंबईतील वाशी येथे महाराष्ट्र MSME परिषद आणि MSME पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यभरातील उद्योजक, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2026 | 11:13 AM
Maharashtra MSME Council 2026 : नवी मुंबईत २७ जूनला रंगणार महाराष्ट्र एमएसएमई परिषद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

Maharashtra MSME Council 2026 : नवी मुंबईत २७ जूनला रंगणार महाराष्ट्र एमएसएमई परिषद; 2,500 हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

Follow Us
Follow Us:
  • 2,500 हून अधिक उद्योजक, गुंतवणूकदार आणि उद्योगतज्ज्ञांची उपस्थिती अपेक्षित.
  • AI, डिजिटल परिवर्तन, निर्यातवृद्धी, वित्तपुरवठा आणि महिला उद्योजकता यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे.
  • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योगांचा ‘महाराष्ट्र MSME पुरस्कार 2026’ द्वारे गौरव होणार.
महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनाचे औचित्य साधून येत्या २७ जून २०२६ रोजी नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात महाराष्ट्र एमएसएमई परिषद व एमएसएमई पुरस्कार २०२६१ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.०० ते सायंकाळ ५.३० या वेळेत होणाऱ्या या परिषदेसाठी संकल्पातून सिद्धीकडे ही संकल्पना (थिम) निश्चित करण्यात आली आहे. एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात एमएसएमई क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेमध्ये राज्यभरातील २ हजार ५०० हून अधिक एमएसएमई उद्योजक, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

PCMC News: पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमणविरोधी मोहिमेचा धडाका, तब्बल ८२० ठिकाणी कारवाई

परिषदेला मान्यवर करणार मार्गदर्शन

या परिषदेला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान उद्योग जगताशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने निर्यातवृद्धी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, डिजिटल परिवर्तन, शाश्वत औद्योगिक विकास, वित्तपुरवठा तसेच महिला उद्योजकतेला चालना देणे यांसारख्या विषयांवर विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

‘महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६’ चे वितरण

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एमएसएमई उद्योगांचा गौरव करण्यासाठी “महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६’ चे वितरण केले जाणार आहे. राज्यातील उत्कृष्ट उद्योजकता, नवीन उपक्रम आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार नऊ वेगवेगळ्या श्रेणीमध्ये प्रदान केले जातील. यामध्ये आर्टिसन/हँडिक्राफ्ट पुरस्कार, नेक्स्टजेन पुरस्कार, डिजिटल आणि एआय एक्सलन्स पुरस्कार, सर्व्हिस पुरस्कार, मॅन्युफॅक्चरिंग पुरस्कार, ग्रीन एंटरप्राइझ पुरस्कार, वुमन एंटरप्रेन्योर पुरस्कार आणि एक्सपोर्ट पुरस्कार यांचा समावेश आहे.

मोठी बातमी ! राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र सिंघल आता ACB प्रमुख

उद्योजकांनी परिषदेत सहभागी व्हावे

महाराष्ट्रातील सर्व एमएसएमई उद्योजकांना या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मोफत नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करून या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकांतर्फे करण्यात आले आहे. परिषदेच्या दिवशी म्हणजेच दि. २७ जून २०२६ रोजी सायंकाळी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथेच एका पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालिका यांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Maharashtra msme parishad 2026 to be held in navi mumbai on june 27

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Business
  • cmomaharashtra
  • MSME
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Ganeshotsav 2026: प्रसादाच्या पिशवीत आता ‘घरगुती मोदक’; पुण्याच्या पेठा ठरल्या छोट्या विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ
2

Ganeshotsav 2026: प्रसादाच्या पिशवीत आता ‘घरगुती मोदक’; पुण्याच्या पेठा ठरल्या छोट्या विक्रेत्यांसाठी मोठी बाजारपेठ

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर
3

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
4

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.