अनधिकृत बांधकाम (फोटो- सोशल मीडिया)
मोहिमेतील प्रमुख आकडेवारी
अनधिकृत बांधकामे: ४५१ (सुमारे १.०४ लाख चौ.मी.)
नाले अतिक्रमण: २३ (सुमारे ८३९ चौ.मी.)
फेरीवाले व पथारीवाले: ३४६ अतिक्रमणे हटवली.
क्षेत्रीय कार्यालयांची कामगिरी
शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक २२९ कारवाया करून आघाडी घेतली आहे. तर ‘इ’ (१०३), ‘ड’ (१००), ‘फ’ (९५), ‘ब’ (९४), ‘अ’ (८४), ‘ग’ (६४) आणि ‘ह’ (५१) अशा क्रमाने कारवाया करण्यात आल्या आहेत.
Pimpri News : तुम्हीही अनधिकृत बांधकाम केलंय? तर आता महापालिकेचा हातोडा पडणार
नागरिकांकडून ‘दिखाऊ’ कारवाईवर संताप
एकीकडे महापालिका प्रशासन कारवाईचा दावा करत असतानाच, दुसरीकडे नागरिकांनी या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील अनेक भागांत केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मोठा फौजफाटा नेऊन केवळ भिंत किंवा पत्राशेड तोडून कारवाईचा सोपस्कार पूर्ण केला जातो. त्यानंतर पुन्हा तितक्याच आत्मविश्वासाने अनधिकृत बांधकामे पूर्ण केली जातात. तसेच, अनेकदा क्षेत्रीय कार्यालये पोलिसांत तक्रार देऊन स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ आणि नाले हे नागरिकांच्या सोयीसाठी आहेत. त्यावर होणारी अतिक्रमणे नागरी सुरक्षिततेसाठी घातक आहेत. त्यामुळे ही कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे आणि सातत्याने सुरू राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.”






