Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News : प्रत्येक बालकाला कुटुंबाचा आधार मिळावा; महाराष्ट्र शासन प्रयत्नशील – आदिती तटकरे

Maharashtra News : प्रत्येक बालकाला कुटुंबाचा आधार आणि सुरक्षित संगोपन मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासन बाल संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यावर भर देत आहे. अनाथ मुलांना शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण, बाल संगोपन योजनेतील आर्थिक मदत, शालेय प्रवेश आणि दत्तक प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 09, 2026 | 05:50 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अनाथ मुलांना शासकीय नोकरीत आरक्षणाचा लाभ
  • बाल संगोपन योजनेतून दोन लाख मुलांना आर्थिक मदत
  • दत्तक प्रक्रिया आणि आफ्टर केअर अधिक सक्षम करण्यावर भर
Maharashtra News :प्रत्येक बालकाला सुरक्षित कुटुंब, प्रेम आणि योग्य संगोपन मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासन बाल संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देत आहे. संस्थात्मक देखभालीऐवजी कुटुंब आणि समुदायाधारित पर्यायांना प्राधान्य देत फॉस्टर केअर, दत्तक प्रक्रिया आणि आफ्टर केअर अधिक प्रभावी करण्याची गरज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे आयोजित दोन दिवसीय विभागीय शिखर परिषदेत महाराष्ट्राच्या उपक्रमांची माहिती देताना त्यांनी ही भूमिका मांडली.

अनाथ मुलांना शासकीय नोकरीत आरक्षणाचा लाभ

मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनाथ मुलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये लागू असलेल्या एक टक्का समांतर आरक्षणातून सप्टेंबर २०२६ पर्यंत १ हजार ६० मुलांना शासकीय नोकरी मिळाली आहे. यामध्ये वर्ग एकमधील ४, वर्ग दोनमधील ६८, वर्ग तीनमधील ९७४ आणि वर्ग चारमधील १४ उमेदवारांचा समावेश आहे.

राज्यात आतापर्यंत सुमारे १२ हजार ४४३ अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच अनाथ मुलांच्या उच्च व तंत्रशिक्षणाचा आणि परीक्षा शुल्काचा संपूर्ण खर्च राज्य शासन उचलत आहे. १७ जुलै २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयाचा ९९ हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे.

Hinjawadi-Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत मोठी अपडेट; १७ स्थानकांवर सेवा सुरू होणार

बाल संगोपन योजनेतून दोन लाख मुलांना आर्थिक मदत

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख मुलांना दरमहा २ हजार २५० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. याशिवाय झोपडपट्ट्या आणि रस्त्यांवर राहणाऱ्या बालकांसाठी राबविण्यात आलेल्या ‘फिरते पथक’ या पथदर्शी उपक्रमातून २०२४-२५ मध्ये सुमारे १० हजार मुलांपर्यंत पोहोचण्यात आले.

त्यापैकी तीन हजार मुलांना नियमित शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला. हा उपक्रम राज्यातील ३९ हून अधिक महानगरपालिकांमध्ये विस्तारित करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील महिला व बालविकासासाठी राखीव निधीचा वापर पायाभूत सुविधा, अंगणवाड्या आणि बालकांच्या कल्याणकारी उपक्रमांसाठी केला जात आहे.

Nagpur Police : डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

दत्तक प्रक्रिया आणि आफ्टर केअर अधिक सक्षम करण्यावर भर

दत्तक प्रक्रियेसाठी सुमारे २० ते २५ हजार अर्जदार नोंदणीकृत असले, तरी बहुतांश पालक एक ते दोन वर्षांखालील बालकांना दत्तक घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे अधिक वयाच्या मुलांच्या दत्तक प्रक्रियेला विलंब होतो. बालकांना कायदेशीरदृष्ट्या दत्तक घेण्यासाठी मुक्त घोषित करण्यात होणारा विलंब, फॉस्टर कुटुंबांची कमतरता आणि १८ वर्षांनंतर शिक्षण, रोजगार, निवारा व कौशल्य विकासासाठी आवश्यक असलेले सहाय्य ही प्रमुख आव्हाने आहेत.

यावर उपाय म्हणून केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन प्राधिकरण (CARA) आणि मिशन वात्सल्य यांच्यातील समन्वय वाढविणे, प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करणे आणि बालक १८ वर्षांचे होण्याच्या किमान १२ महिने आधीच आफ्टर केअर व स्वावलंबनाचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे तटकरे यांनी सांगितले. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना सक्षम केल्यास योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Maharashtra news ensuring every child receives family support maharashtra government is making concerted efforts aditi tatkarecp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Aaditi Tatkare
  • Child Protection
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी सांगलीत एल्गार!; शासनाचा जीआर रखडल्याने संतापाची लाट!
1

Sangli : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हक्कासाठी सांगलीत एल्गार!; शासनाचा जीआर रखडल्याने संतापाची लाट!

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?
2

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’
3

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर
4

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.