Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल…”, उदय सामंत यांचा विश्वास

सांगलीतील पाच माजी नगरसेवकांनी तसेच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2025 | 06:40 PM
"सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल…", उदय सामंत यांचा विश्वास

"सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल…", उदय सामंत यांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सांगली जिल्ह्यात शिवसेना पक्ष मजबूत झाला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली मिरज कुपवाडचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरवेल, असा विश्वास शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सांगलीतील पाच माजी नगरसेवकांनी तसेच रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरमधील उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. या पक्ष प्रवेश सोहळ्यास आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, चंद्रहार पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! ‘या’ जिल्ह्यात 14 हजार महिलांना कॅन्सर, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मंत्री सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. ग्रामीण भागातून मोठं झालेलं नेतृत्व असल्याने ते इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना न्याय देतात. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकेंच्या आदेशाने अयोध्येत कारसेवेसाठी गेलेले सुरेश शेळके यांनीही आज मूळ शिवसेनेत प्रवेश केला. यातून बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेच पुढे घेऊन जात आहेत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.

आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे काँग्रेस प्रदेश सचिव सागर वनखंडे, सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, सचिव राज सोनार, माजी नगराध्यक्ष मोहनसिंग राजपूत, माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे, माजी नगरसेवक सुरेश शेळके, माजी नगरसेवक अश्विनी कांबळे, माजी नगरसेवक कल्लाप्पा कांबळे, माजी सभापती अनिता वनखंडे, माजी शिक्षण उपसभापती तानाजी व्हनकडे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे, रत्नागिरीमधील उबाठाच्या महिला संपर्क प्रमुख वर्षा पितळे, कोल्हापूर विधानसभा संपर्क प्रमुख प्राची पोतदार, दक्षिण कराड विधानसभा संपर्क प्रमुख रोहीणी लोंढे, मुक्ताईनगरचे उबाठाचे विष्णू राणे, भुसावळमधील उबाठाचे आदित्य राणे या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद वाढत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मंगळवारी निषेध जाहीर केला आहे. निषेधाला परवानगी देणे ही पोलिस आणि प्रशासनाची जबाबदारी आहे असे महाराष्ट्र सरकारचे मंत्री उदय सामंत म्हणाले.

मंगळवारी मनसेच्या निषेधावर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र सरकारचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, हा प्रशासनाचा विषय आहे. लोकशाही व्यवस्थेत जर कोणी निषेध करत असेल तर त्याला परवानगी देणे किंवा न देणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणताही अन्याय करणार नाही. कुणाल कामरा यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेल्या विशेषाधिकार उल्लंघनाच्या नोटीसवर उदय सामंत म्हणाले की, आमच्याकडे एक हस्तक्षेप समिती आहे, ज्याचे काम विधानसभेच्या नियम आणि कायद्यांच्या आधारे काम करणे आहे. आम्हाला त्याच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. जर कुणाल कामरा यांनी काही केले असेल आणि त्यांना नोटीस बजावण्यात आली असेल तर ती त्यांची बाब आहे.

Maharashtra Rain Alert: पावसाच्या टार्गेटवर विदर्भ अन्…; पुढील काही दिवस ‘या’ जिल्ह्यांत तुफान बरसणार

Web Title: Maharashtra politics hundreds of workers from sangli ratnagiri pune kolhapur join shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Mumbai
  • shivsena

संबंधित बातम्या

Praskash Deole Passes Away: शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन
1

Praskash Deole Passes Away: शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन

Mumbai crime: मुंबईत डबल मर्डर! 23 वर्षीय मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या, नंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले
2

Mumbai crime: मुंबईत डबल मर्डर! 23 वर्षीय मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या, नंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले

पॅलेडियन पार्टनर्सकडून 1500 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा, मुंबई रिअल इस्टेट बाजार सणासुदीसाठी सज्ज
3

पॅलेडियन पार्टनर्सकडून 1500 कोटींच्या प्रकल्पाची घोषणा, मुंबई रिअल इस्टेट बाजार सणासुदीसाठी सज्ज

एसएसआयआय मंत्राम “मेड-इन-इंडिया” सर्जिकल रोबोट यात्रा मुंबईत दाखल
4

एसएसआयआय मंत्राम “मेड-इन-इंडिया” सर्जिकल रोबोट यात्रा मुंबईत दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.