राज्यातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट (फोटो- istockphoto)
पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण विभाग, मराठवाडा, विदर्भ विभागात अत्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण विभागात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर हवामान विभागाने महाराष्ट्राला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात तर पावसाने कहर केला आहे. नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूर आला आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. तर भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुणे शहरात देखील काल संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. कोयनेच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. तर मुंबईतील मोडकसागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
हवामान विभागाने भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरात देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेले काही दिवस कोकण किनारपट्टी, घाटमाथा, तर पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील चार दिवस रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.