Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics: राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे आक्रमक, पार्थ पवार अचानक उठून गेले; नेमकं घडलं काय?

NCP Politics: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष एकसंध ठेवण्यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तटकरे यांनी सांगितले “पक्ष एकसंध ठेवणे आणि तो सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थिर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.

  • By anuradha sagar
Updated On: May 27, 2026 | 11:17 AM
Sunil Tatkare, Chhagan Bhujbal, Devgiri Meeting, Maharashtra Politics,

Sunil Tatkare, Chhagan Bhujbal, Devgiri Meeting, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  •  मुंबईतील देवगिरी बंगल्यावर मंगळवारी पार पडलेली ची बैठक अत्यंत वादळी ठरल्याची माहिती
  • सुनील तटकरेंनी थेट पक्ष नेतृत्वालाच थेट जाब विचारल्याने वातावरण चांगलेच तापले
  • प्रत्येक वेळी मी आणि प्रफुल पटेलांनीच टीकेचे धनी का व्हायचे?- सुनील तटकरे
Maharashtra Politics news:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत मतभेदांच्या चर्चा सुरू आहेत. ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याने पक्षात नाराजी नाट्य सुरू होते. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर मंगळवारी पार पडलेली ची बैठक अत्यंत वादळी ठरल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात ‘साईडलाईन’ झाल्याच्या चर्चेत असलेले सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे या बैठकीतील चर्चेचे केंद्रबिंदू ठरले.

देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी थेट पक्ष नेतृत्वालाच थेट जाब विचारल्याने वातावरण चांगलेच तापल्याचे बोलले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल पटेल यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या बैठकीला उपस्थित होते. माहितीनुसार, बैठकीत सुनील तटकरे यांच्या कठोर वक्तव्यांमुळे त्यांची आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकही झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Legislative Council Election : एकनाथ शिंदेंची नाराजी कायम; भाजप ठाम, शिवसेनेची मात्र कोंडी

“अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष एकसंध ठेवण्यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तटकरे यांनी सांगितले “पक्ष एकसंध ठेवणे आणि तो सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थिर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत आमच्यावर सातत्याने टीका होत असताना पक्षातील एकही आमदार किंवा नेता आमच्या समर्थनासाठी पुढे आला नाही,” अशी खंत तटकरे यांनी व्यक्त केल्याचे समजते.
तसेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांमुळे माझ्यावर आणि प्रफुल पटेलांवरच टिका केली जाऊ लागली. हे सर्व होत असताना त्यावेळी पक्षातील कोणत्याही नेत्याने आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला नाही. अशी खंतही तटकरे यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“प्रत्येक वेळी मी आणि प्रफुल पटेलांनीच टीकेचे धनी का व्हायचे? याबाबत वरिष्ठ नेतृत्व काही भूमिका घेणार आहे की नाही?” असा थेट सवालही तटकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. सुनील तटकरेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे बैठकीत काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?

अशातच, “जे झालं ते झालं, आता त्यावर अधिक चर्चा न करता पुढे जाण्याची गरज आहे,” असे म्हणत तटकरेंच्या या पक्ष नेतृत्त्वावरील नाराजीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण भुजबळांच्या या विधानाकडे दुर्लभ करत तटकरेंनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ” मी यावर बोलणारच आणि याबाबत आता मला स्पष्टता मिळालयाच हवी.” असे त्यांनी ठणकावून सांगितल्याचे समजते.

या सर्व बैठकांच्या घडामोडीमंध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, तटकरे बोलण्यासाठी उभे राहण्यापूर्वीच पार्थ पवार हे अचानक बैठकीतून बाहेर पडल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. तटकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या अन्य आमदारांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याचे सांगितले जात आहे. अखेरीस कोणतीही पुढील चर्चा न होता बैठक संपल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

Web Title: Maharashtra politics news nationalist congress party internal rift sunil tatkare chhagan bhujbal fight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Maharashtra Politics
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

’26/11 च्या वेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला आठवत नाही’; गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला
1

’26/11 च्या वेळी गिरीश महाजन बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते, हे मला आठवत नाही’; गिरीश महाजनांचा दावा एकनाथ खडसेंनी फेटाळला

Nitesh Rane News: आमिर खानला ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणावं का? नितेश राणेंची आमिर खानवर घणाघाती टीका
2

Nitesh Rane News: आमिर खानला ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणावं का? नितेश राणेंची आमिर खानवर घणाघाती टीका

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा
3

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला
4

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.