Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही खड़सेनी स्पष्टीकरण दिले. ती केवळ औपचारिक भेट होती. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,

  • By anuradha sagar
Updated On: Jul 13, 2026 | 11:00 AM
Eknath Khadse BJP Re Entry, Amit Shah Eknath Khadse, Girish Mahajan

Eknath Khadse BJP Re Entry, Amit Shah Eknath Khadse, Girish Mahajan

Follow Us
Follow Us:
  • अमित शाह यांनी स्वतः फोन करून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावा
  • एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतल्याने या चर्चेला नवे वळण
 

Maharashtra Politics: भाजपमध्ये पुर्नप्रवेशाच्या चचर्चादरम्यान ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः फोन करून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. वाढदिवसानिमित्त भाजपमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी दिल्लीतील भेटीबाबतही खुलासा केला.

मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा : खडसेंकडून महाजनांच्या नावाची भर

राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून विविध नेत्यांकडून वेगवेगळी नावे पुढे येत आहेत, त्यात आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतल्याने या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. खडसे यांनी महाजन हेही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील दावेदार असल्याचा दावा केला, त्यांच्यामतदारसंघात त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या आशयाचे फलकही लागले होते, असे सांगत त्यांनी महाजन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय, त्यांना मंत्री होईपर्यंत मी सर्वतोपरी मदत केली. माझ्या सभेशिवाय त्याच्या मतदारसंघातील निवडणूक प्रचाराची सांगता होत नव्हती, असा दावाही खडसेंनी केला.

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाची उघडीप; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे प्रवेश रखडला

पक्षातील काही स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे माझा प्रदेश रखडला आहे. वरिष्ठ नेत्यांनी मला स्पष्ट सांगितले की, तुम्हाला पक्षात घेतले तर स्थानिक लोक काम करणार नाहीत. ‘खड़सेना पक्षात घेतले तर आम्ही लोकसभेची जागा पाडून टाकू.” अशी ब्लॅकमेलिंगही करण्यात आली. त्यामुळे लोकसभेत आमचे काम करा, पुढे पाहू, असे वरिष्ठानी सांगितले होते. मग माझ्या पक्षप्रवेशाला नेमका विरोध का होतोय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Amit Shah)

Pune Crime: दारू पिताना झाला वाद, आईवरून शिवीगाळ अन् रक्तरंजित शेवट; फरशीच्या दगडाने तरुणाचा

तावडेंसोबतची भेट औपचारिक

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही खड़सेनी स्पष्टीकरण दिले. ती केवळ औपचारिक भेट होती. त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, मी त्यांना आणि नितीन गडकरी यांनाही वाढदिवसाचे निमंत्रण दिले असून गडकरी यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे, असे खडसे म्हणाले.

खडसेंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की,”खडसेंचा प्रदेश माझ्यामुळे कसा काय रखडला ? वरिष्ठ पातळीवरील घडामोडी मी कसं काय थांबवणार? त्यांची डायरेक्ट दिल्लीला हॉटलाईन आहे. मी तर छोटा माणूस आहे, माझी मुंबईपर्यंत देखील हॉटलाईन नाही आहे. मी आपल्या जळगाव जिल्ह्यापुरता बरा आहे. निश्चितच त्यांना जर वरून ग्रीन सिग्नल मिळाला आहे तर ठीक आहे.”

 

Web Title: Maharashtra politics eknath khadse bjp entry claim amit shah phone call controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Amit Shah
  • eknath khadse
  • girish mahajan
  • Jalgaon Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?
1

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण
2

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल
3

Sangli Politics: सांगली राजकीय वर्तुळात खळबळ! जतमध्ये दोन माजी आमदारांसह ४० जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Maharashtra Breaking News Today 2026: महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Breaking News Today 2026: महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.