Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

महाराष्ट्रात टॅक्सी आणि रिक्षा चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. नियमाच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मराठी न येणाऱ्या तब्बल १,२६८ चालकांना परिवहन विभागाने नोटिसा बजावल्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 02:27 PM
‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई;

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई;

Follow Us
Follow Us:
  • पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांना नोटीस
  • मराठी शिकण्यासाठी चालकांना एक महिन्याची मुदत
  • नियम न पाळल्यास चालकाचा बॅज ३ महिन्यांसाठी निलंबित
महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान आता अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने गुरुवारपासून राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवसाच्या तपासणीत व्यवहारिक मराठी येत नसलेल्या राज्यभरात १२६८ चालकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. मराठी न येणाऱ्या चालकांना सुधारणेसाठी एक महिन्याची संधी देण्यात आली आहे.

कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार

पुरेसे ज्ञान नाही ! मोहीमेच्या पहिल्याच दिवशी मुंबई

महानगर क्षेत्रात ३,९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले. या सर्वांना तात्काळ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित राज्यातील आकडेवारीनुसार आतापर्यंत एकूण ४,२२२ चालकांची तपासणी झाली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

चालकांवर तीन टप्प्यांत होणार कारवाई

  • परिवहन विभागाच्या माहितीनुसार, तीन टप्प्यात ही कारवाई केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात तपासणीत मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळल्यास चालकाला नोटीस दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात नोटीस मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत चालकाला व्यवहारिक मराठी शिकणे बंधनकारक असेल.
  • तिसऱ्या टप्प्यात मुदतीत मराठीचे ज्ञान सिद्ध न केल्यास संबंधित चालकाचा बॅज ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत सर्व व्यावसायिक वाहनचालकांची व्यवहारिक मराठीच्या ज्ञानासाठी तपासणी केली जाणार आहे.
Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

केवळ नियम नाही, सुरक्षेची बाब !

  • महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर ती प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे.
  • चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे.
  • मात्र दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Maharashtra taxi rickshaw drivers marathi language mandatory notices 1268 drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
1

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई
2

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज
3

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

Pimpalwandi Junnar Pune Case : ‘आरोपीला कठोर शिक्षा द्या’; चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळवंडीत संताप
4

Pimpalwandi Junnar Pune Case : ‘आरोपीला कठोर शिक्षा द्या’; चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळवंडीत संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.