• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Agri Ai Priority In Central Budget Ajit Pawar Dream Dattatray Bharne

Budget 2026: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व; मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 07:03 PM
अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात 'कृषी AI' ला महत्त्व (Photo Credit- X)

अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात 'कृषी AI' ला महत्त्व (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार!
  • केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व
  • मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प शेती व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास वाटतो. कृषी बजेट वाढवून सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत देण्यात आले असून ही बाब महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच आनंदाची आहे. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्याच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती क्षेत्रात एआय धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच राज्याच्या कृषी विभागाने ‘महा-विस्तार’ अ‍ॅप विकसित केले आहे. याच दिशेने पुढचे पाऊल टाकत केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात ‘Bharat Vistar’ नावाचे एआय-आधारित बहुभाषिक कृषी सहाय्यक साधन जाहीर केले आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत योग्य वेळी हवामान, पीक नियोजन, कीड-रोग नियंत्रण आणि बाजारपेठेची माहिती मिळणार असून निर्णयप्रक्रिया अधिक सुलभ होईल. डिजिटल शेतीच्या विकासाची दिशा या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येते.

उच्च मूल्य पिके, पीक विविधीकरण, मत्स्यव्यवसायात व पशुपालन, सिंचन तसेच एआयसारख्या तंत्रज्ञानाधारित शेतीवर दिलेला भर स्वागतार्ह आहे. कापसाचे उत्पादन व गुणवत्ता वाढवण्यासाठी केंद्र सरकार विशेष योजना राबवणार आहे. फलोत्पादनाला चालना देण्यासाठी नारळ, चंदन व काजू यांसारख्या उच्च मूल्य नगदी पिकांचे उत्पादन वाढवले जाणार असून काजू व कोको यांना जागतिक ब्रँड म्हणून उभारणी करण्यावर भर देण्यात आला आहे. मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी देशभरात ५०० नवीन ‘अमृत जलाशय’ उभारले जाणार असून यामुळे मत्स्य उत्पादकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच मत्स्य संपदा योजनेचा विस्तार करून मत्स्य विक्रेते व सूक्ष्म उद्योगांसाठी ६,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील काळात १० दशलक्ष शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी सरकार मदत करणार असून, काढणीनंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी विकेंद्रित साठवणूक क्षमता निर्माण केली जाणार आहे.

Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारचं धोरणं काय असू शकतं ?

२०२६-२७ च्या आर्थिक सर्वेक्षणात भारतीय शेती अधिक शाश्वत व फायदेशीर बनवण्यासाठी युरिया अनुदान प्रणालीत सुधारणा, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून पोषक तत्त्वांवर आधारित मॉडेल स्वीकारण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच कृषी निर्यातीसाठी स्थिर व दीर्घकालीन निर्यात धोरण ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

तसेच अॅग्री बिझनेस नेटवर्कसाठी १६७ कोटी रुपये, उपसा सिंचन योजनांच्या सौर ऊर्जिकीकरणासाठी २०७ कोटी रुपये आणि कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजनेसाठी ६४६ कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली असून या बाबी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.

शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन या परस्परपूरक घटकांसाठी भरीव तरतुदी व योजनांची घोषणा करण्यात आल्याने या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन त्यांचा सर्वांगीण विस्तार होईल. केंद्र व राज्य सरकार समन्वयाने काम करत असताना, या अर्थसंकल्पातील तरतुदींचा जास्तीत जास्त लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कटिबद्ध आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीला नफ्याचा व्यवसाय बनवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राला शेती क्षेत्रात विकासाची नवी झेप घेण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चितच महत्त्वाचा ठरेल.

India Agriculture 2025: अमेरिकन टॅरिफचा फटका, तरीही भारताची कृषी क्षेत्रात मजबूत कामगिरी

Web Title: Agri ai priority in central budget ajit pawar dream dattatray bharne

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • agricultural
  • ai
  • Dattatray Bharne
  • farmer
  • Nirmala Sitaraman
  • union budget 2026

संबंधित बातम्या

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार
1

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
2

Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने
3

Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने

Bio-Pharma Budget 2026: अर्थसंकल्पात जाहीर केली ‘बायो फार्मा शक्ती’ योजना! भारत बनणार जागतिक बायो-फार्मा हब
4

Bio-Pharma Budget 2026: अर्थसंकल्पात जाहीर केली ‘बायो फार्मा शक्ती’ योजना! भारत बनणार जागतिक बायो-फार्मा हब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

हिवाळ्यात लुटा गरमागरम नाश्त्याची खास मजा; घरी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट ‘बटाटा पुरी’

Feb 01, 2026 | 08:15 PM
Operation Herof 2.0: पाकिस्तानच्या छाताडावर ‘बीएलए’चा प्रहार! 150 सैनिकांचा मृत्यू आणि 35 तासांपासून बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी

Operation Herof 2.0: पाकिस्तानच्या छाताडावर ‘बीएलए’चा प्रहार! 150 सैनिकांचा मृत्यू आणि 35 तासांपासून बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी

Feb 01, 2026 | 08:14 PM
T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत

Feb 01, 2026 | 07:51 PM
Currency War: डॉलरला चेकमेट अन् युआनचा उदय; शी जिनपिंग आणि ट्रम्पमध्ये सुरु झालाय इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक संघर्ष

Currency War: डॉलरला चेकमेट अन् युआनचा उदय; शी जिनपिंग आणि ट्रम्पमध्ये सुरु झालाय इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक संघर्ष

Feb 01, 2026 | 07:36 PM
Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा

Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा

Feb 01, 2026 | 07:13 PM
Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?

Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?

Feb 01, 2026 | 07:09 PM
DC vs UPW,WPL 2026 : आज DC चे ठरणार स्पर्धेतील भवितव्य! TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; UP करणार फलंदाजी 

DC vs UPW,WPL 2026 : आज DC चे ठरणार स्पर्धेतील भवितव्य! TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; UP करणार फलंदाजी 

Feb 01, 2026 | 07:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Feb 01, 2026 | 04:55 PM
Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

Feb 01, 2026 | 04:49 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.