Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची तिरपी चाल, नाट्यमय घडामोडी अन् अभिजीत पवारांची माघार

Vidhan Parishad Election 2026: पक्षाने रवींद्र फाटक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीत कोणतीही बंडखोरी झाली नाही. तसेच महाविकास आघाडीकडूनही कोणताही मजबूत पर्यायी उमेदवार रिंगणात उतरला नाही.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Jun 04, 2026 | 01:21 PM
Thane News, Vidhan Parishad, MLC Election 2026, Ravindra Phatak,

Thane News, Vidhan Parishad, MLC Election 2026, Ravindra Phatak,

Follow Us
Follow Us:
  • ठाणे मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार
  • शिंदे गटाकडून रवींद्र फाटक आणि म शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजीत पवार यांचे उमेदवारी अर्ज
  • महायुतीतील रस्सीखेचनंतर शिवसेनेकडे जागा
Thane Vidhan Parishad Election 2026: ठाणे आणि पालघर च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ठाणे मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार आहेत. विधानपरिषदेसाठी ठाण्यातून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण दुसरीकडे अभिजीत पवार यांनीदेखील त्यांच्या उमेदवारी अर्ज भरला होता. पण आता अभिजीत पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.

शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोड

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे विधानपरिषदेसाठी महायुतीकडून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोघांकडूनही जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. दोघांमध्ये थेट लढत होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. पण अचानक अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन? अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा;

विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार होती. या निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी आमदार रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी त्या दोघांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले होते. त्यामुळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. “मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे हा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे”, असं अभिजीत पवारांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे आता रवींद्र फाटक यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

महायुतीतील रस्सीखेचनंतर शिवसेनेकडे जागा

सुरुवातीला भाजप आणि शिंदे गटात ठाण्याच्या या जागेवरून काही प्रमाणात रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर अखेर ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर पक्षाने रवींद्र फाटक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीत कोणतीही बंडखोरी झाली नाही. तसेच महाविकास आघाडीकडूनही कोणताही मजबूत पर्यायी उमेदवार रिंगणात उतरला नाही.

बंडखोरी टळल्याने निवडणूक बिनविरोध

राजकीय वर्तुळात काही अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत कोणत्याही अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे अभिजित पवार यांच्या माघारीनंतर रवींद्र फाटक हेच एकमेव उमेदवार उरल्याने आता त्यांचा बिनविरोध विजय निश्चित मानला जात आहे. या घडामोडीमुळे महायुतीने ठाणे मतदारसंघातील अंतर्गत मतभेद टाळण्यात यश मिळवल्याचे मानले जात आहे.

India Rain Alert: पावसाची जोरदार हजेरी! 24 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, हवामान विभागाचा मोठा अंदाज

ठाणे-पालघरमध्ये फाटक यांचा प्रभाव

रवींद्र फाटक यांची ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत राजकीय पकड मानली जाते. शिवसेनेतील संघटनात्मक कामकाज आणि स्थानिक पातळीवरील सक्रियतेमुळे त्यांनी या भागात स्वतःचा प्रभाव निर्माण केला आहे.

शिंदे यांचे विश्वासू सहकारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी म्हणून रवींद्र फाटक यांची ओळख आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा पक्षाकडून संधी देण्यात आली होती. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, हा विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.

 

 

Web Title: Maharashtra vidhan parishad election abhijeet pawar withdraws nomination thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Thane news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.