अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; बेबी डिसुझा रस्त्यावरील कामावर कारवाईचे आदेश
माथेरानमध्ये पुन्हा एकदा अनधिकृत विकास कामांवरून वाद निर्माण झाला आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या माथेरानमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.सर्वोच्च न्यायालयाने २००३ साली माथेरान नगरपरिषद क्षेत्राला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर या भागात कोणतेही विकासकाम करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार माथेरान सनियंत्रण समितीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र,शहरातील बेबी डिसुझा मार्गावर काही खाजगी मालमत्ताधारकांकडून दगडी-मातीच्या रस्त्याचे नियमबाह्य उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे,या कामासाठी नगरपरिषद किंवा सनियंत्रण समितीची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत असल्याचे बोलले जात आहे.
Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा
दरम्यान,काही दिवसांपूर्वी माथेरान नगरपरिषद आपल्या मालकीच्या रस्त्यावरून एका खासगी जागेकडे नवीन रस्ता तयार करून देत असल्याची बाब विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांच्या निदर्शनास आली होती.यानंतर त्यांनी या कामाविरोधात रायगड जिल्हाधिकारी आणि माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.माथेरान मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेच्या बांधकाम अभियंता करुणा बांगर यांची बदली झाली असल्याचे माथेरान पालिकेतून सांगण्यात येत आहे.
त्यात आता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने माथेरान मध्ये पालिकेचे विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांच्या अर्जानंतर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.याबाबत सीताराम कुंभार यांनी आम्ही फक्त काम बंद पाडून थांबणार नाही, तर संबंधित ठेकेदार आणि ज्यांच्या बंगल्याकडे हा रस्ता जात आहे त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा ठेवणार आहेत.मात्र आता या संपूर्ण प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण बंद करण्यात आलेले हेच रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याचे आणि आता ते जवळपास पूर्णत्वास गेल्याचे सांगितले जात आहे.
Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा
नागरिकांचा सवाल…
हे सर्व केवळ दिखावा होता का? विरोधकांचा विरोध अचानक का मावळला? प्रशासन नेमकं काय करतंय? संबंधितांवर कारवाई होणार का? की या सर्वामागे काही अर्थपूर्ण राजकारण दडलं आहे? या प्रकरणाकडे आता संपूर्ण माथेरानवासीयांचे लक्ष लागले आहे.






