Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Forecast: IMD चा नवा अंदाज, आठवडाभराच्या धुमाकूळानंतर पाऊस विश्रांती घेणार; ‘या’ तारखेपर्यंत जोर ओसरणार

IMD Weather Forecast: महाराष्ट्रात २३ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. कोकणात कमी पाऊस, विदर्भात काही भागांत अधिक पावसाचा अंदाज. मुंबई लोकलसाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 10, 2026 | 01:57 PM
Maharashtra Monsoon, IMD Forecast, Monsoon Break, Konkan Rains, Vidarbha Weather, Mumbai-Pune Rain

Maharashtra Monsoon, IMD Forecast, Monsoon Break, Konkan Rains, Vidarbha Weather, Mumbai-Pune Rain

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात २३ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता.
  • कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज.
  • विदर्भात काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता.
  • अतिवृष्टीनंतर पश्चिम रेल्वेकडून रुळांची उंची वाढविण्याचा निर्णय.
 

Maharashtra  Weather Forecast:   जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठड्यात चांगलाच धुमाकूळ घातला. भारतीय हवामान विभागाने संपूर्ण देशात मान्सूनचा विस्तार पूर्ण झाल्याची घोषणा केली. आठवडाभर धुमाकूळ घातल्यानंतर आता मात्र, महाराष्ट्रासाठी पुढील दोन आठवड्यांचा अंदाज फारसा दिलासादायक नसल्याचे दिसत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, २३ जुलैपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २३ जुलैपर्यंत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता आहे. मात्र, या कालावधीत एकूण पर्जन्यमान सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी राहू शकते. २३ ते ३० जुलैदरम्यान दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो, पण त्याबाबत १६ जुलैनंतरच स्पष्ट चित्र समोर येईल.

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ९ ते १६ जुलै या कालावधीत विदर्भातील काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १६ ते २३ जुलैदरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा किंचित अधिक पाऊस पडू शकतो. १३ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या सरींचा अंदाज कायम आहे.

कोकणात तापमानात वाढ

पावसाचा जोर कमी होताच कोकणातील तापमानात वाढ झाली आहे. अलिबाग येथे कमाल तापमान सरासरीपेक्षा २.९ अंश सेल्सिअसने अधिक नोंदविण्यात आले. मुंबईतही उष्णता वाढली असून कुलाबा येथे ३०.५ अंश, तर सांताक्रूझ येथे ३१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?

अतिवृष्टीनंतर पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

दरम्यान, गेल्या आठवडाभरातील अतिवृष्टीमुळे वसई-विरार विभागात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबई लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने नालासोपारा परिसरातील रेल्वे रुळांची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी विभागाची पाहणी करून तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात रेल्वे रुळांची उंची ५० मिमीने वाढविण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात ती ४०० मिमीपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. यासाठी फलाट, ओव्हरहेड वायर आणि इतर पायाभूत सुविधांमध्येही आवश्यक बदल करण्यात येणार आहेत.

 

 

Web Title: Maharashtra weather forecast imd predicts dry spell monsoon break till july 23

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Monsoon
  • Maharashtra Weather Forecast

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यासह देशावर महाभयानक संकट येणार; अत्यंत वेगवान वारे अन्…, पाऊस झोडपणार
1

Maharashtra Rain Alert: राज्यासह देशावर महाभयानक संकट येणार; अत्यंत वेगवान वारे अन्…, पाऊस झोडपणार

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान
2

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?
3

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?

पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम
4

पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.