Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

मल्हारपेठमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे निसरेफाटा, एफिल आणि रासे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 08, 2026 | 09:26 PM
मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

Follow Us
Follow Us:

मल्हारपेठ : आज दिवसभर ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने मल्हारपेठ परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे दुपारनंतरच्या मोठ्या पावसाने निसरे फाटा, परिसरातील सखल भाग जलमय झाले. अनेक घरांमध्ये आणि दुकानगाळ्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

निसरे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच निसरे गाव व मल्हारपेठ परिसरातील अनेक रस्त्यांवर पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी वाहनचालकांना वाहने थांबवावी लागली, तर पादचाऱ्यांचीही गैरसोय झाली.

घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे धान्य, किराणा सामान, फर्निचर, विद्युत उपकरणे तसेच इतर घरगुती वस्तूंचे नुकसान झाले. दुकानगाळ्यांमध्येही पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मालाचे नुकसान झाले असून पावसामुळे दिवसभर व्यापारावर परिणाम झाला.

Satara Water Supply : मुसळधार पावसामुळे साताऱ्यात पाणीसंकट; जलवाहिनी फुटल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नाले व गटारे तुडुंब भरून वाहू लागले. पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून मदत द्यावी तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निसरे फाटा रहिवाशी करत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

Web Title: Malharpeth heavy rain nisare phata flood waterlogging loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • Maharashtra Monsoon
  • Satara
  • Satara News
  • Satara Rain

संबंधित बातम्या

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
1

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
2

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.