Jalgaon News: अभिमानाचा क्षण! महाराष्ट्राच्या दियानाची वर्ल्ड कपसाठी निवड; (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जळगाव येथे स्टेट लेव्हल स्पर्धा पार पडल्या होत्या. याठिकाणी राज्यभरातील अंडर १५ मधील क्रिकेट खेळाडू सहभागी झाले होते. तेथे डायना ने चांगल्या व्हीकेट्स व फलंदाजी करत उत्कृष्ठ खेळी करून पात्र ठरल्याने साऊथ आफ्रिका येथे होणाऱ्या अंडर १५ इंनडोअर क्रिकेट वर्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. Jalgaon News:
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातून भारतीय संघात निवड झालेली ती एकमेव खेळाडू आहे. याआधी धुळे येथे झालेल्या अंडर १९ बॉईझ क्रिकेट सिरीज मध्ये देखील अमृताने धमाकेदार प्रदर्शन करत मैन ऑफ द सिरिज चा बहुमान मिळविला होता. याशिवाय अनेक स्पर्धेत ती चमकली आहे. क्रिकेट साठी तिला प्रशिक्षक मिलिंद शिंदे व रोनक शेख यांचे मार्गदर्शन तिला लाभले असून वर्ड कप साठी बेंगलोर येथे १० सप्टेंबर पासन सरावासाठी ती जाणार आहे. त्यानंतर २१ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या वर्ड कप साठी साऊथ आफ्रिका येथे ती रवाना होणार आहे.
सदर निवडीबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर येथे दियानाला शुभेच्छा देऊन कौतुक व सत्कार केला. खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील व मुंदडा ग्लोबल स्कुलचे चेअरमन ओमप्रकाश मुंदडा यांनी दियाना व तीच्या आईवडिलांचे अभिनंदन केले आहे. सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Sugar and Jaggery Prices Fall: दरवाढीनंतर अचानक मोठा दिलासा! साखर-गुळाच्या भावात घसरणीचा नवा ट्रेंड
Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम
ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक पॅन्ट, ना कोणी शिकवायला कोच. साधी सुती साडी, रोजच्या वापरातली चप्पल आणि मनात दोन लेकींना शिकवायचं स्वप्न. अंबाजोगाईच्या एका महिलेने जे करून दाखवलं, त्याने मोठमोठ्या धावपटूंना सुद्धा मागे टाकलं आहे. रमाबाई रणवीर वय वर्ष ४७ बीडच्या अंबाजोगाईत लोकांच्या घरी स्वयंपाकीन याचं काम करत आपल्या संसार चालवत आहेत.






