Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Economic Survey: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुसाट! ७.९ टक्क्यांच्या विकासदरासह देशाच्या जीडीपीमध्ये १४ टक्क्यांचा ‘सिंहाचा वाटा

गेल्या काही वर्षांत रस्ते, मैट्री, बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भरीव गुंतवणुकीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. गतवर्षी राज्यात रारासरीच्या १०९.१ टक्के पाऊस झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 06, 2026 | 12:05 PM
Maharashtra Economic Survey 2025-26, Devendra Fadnavis, Budget 2026,

Maharashtra Economic Survey 2025-26, Devendra Fadnavis, Budget 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्याची अर्थव्यवस्था ७.९ टक्के
  • १ कोटी १६ लाख शेतक-यांना ९ हजार २२ कोटी नुकसानीची मदत
  • राज्यातील महागाईचा दर नियंत्रणात असून एप्रिल ते डिसेंबर २०२५ या काळात चलनवाढ
Maharashtra Economic Survey 2025-26 : देशाचे आर्थिक इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली असून २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्याची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांच्या सुसाट वेगाने धावणार असल्याचा सुखद धक्का आर्थिक पाहणी अहवालाने दिला आहे. राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी विधिमंडळात मांडलेला हा अहवाल केवळ आकडेवारीचा खेळ नसून महाराष्ट्राने देशाच्या एकूण जीडीपीमध्ये तब्बल १४ टक्क्यांचा सिंहाचा वाटा उचलत आपले निर्विवाद वर्चस्व अधोरेखित केले आहे.

विशेष म्हणजे, राज्याचे दरडोई उत्पन्न ३ लाख ४७ हजार ९०३ रुपयांवर पोहोचले असून, हे प्रमाण देशाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा दीड पटीने अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या खिशात खुळखुळणाऱ्या पैशांची ताकद वाढल्याचे स्पष्ट होत आहे. राज्याच्या समृद्धीसाठी एक रोडमॅप सादर करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्वेक्षणात आर्थिक उत्पादन आणि उत्पादकतेत सातत्याने वाढ दिसून येते. महाराष्ट्र लवकरच १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साध्य करेल, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. त्यामुळे अलीकडच्या वर्षांत पायाभूत सुविधांचा वेगवान विकास अनुभवाला आल्याचे निरीक्षणही नोंदवले आहे.

Maharashtra Politics : “भाजपने महाराष्ट्रात निवडणुकीसाठी घोडेबाजार करू नये…; बिनविरोध राज्यसभा

अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी ९ हजार कोटी

राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी सरकारने मदत जाहीर केली होती. एकूण १ कोटी १६ लाख शेतक-यांना ९ हजार २२ कोटी नुकसानीची मदत देण्यात आल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र आज सरकारचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (६ मार्च) विधानसभेत सादर होणार आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जात असून, नव्या मोठ्या योजना अर्थसंकल्प जाहीर करण्याऐवजी सुरू असलेल्या योजनांना अधिक बळ देण्यावर सरकारचा भर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे एकूण कर्ज ९ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्यामुळे खर्चाबाबत सावध भूमिका घेतली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये चुकीची कर आकारणी; गावकरी आक्रमक

महागाई दर नियंत्रणात

गेल्या काही वर्षांत रस्ते, मैट्री, बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भरीव गुंतवणुकीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. गतवर्षी राज्यात रारासरीच्या १०९.१ टक्के पाऊस झाला.

तृणधान्ये (१०.६ टक्के), ऊस (२२.० टक्के) आणि कापूस (७.० टक्के) यांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. मात्र, कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनात अनुक्रमे २८.२ टक्के व ४७.४ टक्के मोठी घट अपेक्षित आहे.

राज्यातील महागाईचा दर नियंत्रणात असून एप्रिल ते डिसेंबर २०२५ या काळात चलनवाढ ग्रामीण भागासाठी २.० टक्के आणि नागरी भागासाठी १.५ टक्के होती, खाद्यपदायांच्या किमतीमधील वाढ तर एका टक्क्यापेक्षाही कमी राहिली आहे, असे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

क्षेत्रनिहाय विकास दर
सेवा ९.०%
उद्योग :५.७%
कृषी व सलग्न: ३.४%

 

Web Title: Maharashtras economy accounts for 14 percent of the countrys gdp with a growth rate of 79 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 12:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.