• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Wrong Tax Collection In 32 Villages Included In Pune Municipal Corporation

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये चुकीची कर आकारणी; गावकरी आक्रमक

काही ठिकाणी मिळकतींचे अचूक मोजमाप न झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे चुकीची कर आकारणी झाल्याचे सांगत काही नागरिक कर भरणे टाळत असल्याचेही समोर आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 06, 2026 | 10:58 AM
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये चुकीची कर आकारणी; गावकरी आक्रमक

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये चुकीची कर आकारणी; गावकरी आक्रमक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 32 गावांमधील मिळकत कर आकारणी आणि कर संकलनाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गावांमधील कर आकारणीबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून, चुकीची कर आकारणी झाल्याचा आरोप करत अनेक नागरिक कर भरणे टाळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या महसुलावर परिणाम होत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गटनेते काका चव्हाण, काँग्रेसचे गटनेते अॅड. चंदूशेठ कदम आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे निवेदन देत संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. समाविष्ट गावांमधील कर आकारणी आणि कर संकलनाबाबत स्पष्ट व निश्चित धोरण ठरविण्यासाठी ही समिती स्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी ३२ गावांचा समावेश करण्यात आला. या गावांमध्ये विकासकामे, पायाभूत सुविधा आणि कर आकारणी या मुद्द्यांवर सातत्याने चर्चा होत आहे. विशेषत: मिळकत कराच्या दरांबाबत तसेच कर आकारणीच्या पद्धतीबाबत अनेक नागरिकांनी आक्षेप घेतले आहेत. काही ठिकाणी मिळकतींचे अचूक मोजमाप न झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे चुकीची कर आकारणी झाल्याचे सांगत काही नागरिक कर भरणे टाळत असल्याचेही समोर आले आहे. परिणामी, महापालिकेला अपेक्षित महसूल मिळत नसल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पातळीवर चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज असल्याचे नगरसेवकांचे मत आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षांच्या गटनेत्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या समितीच्या बैठकीस समाविष्ट गावांमधील प्रत्येक राजकीय पक्षाचा एक प्रतिनिधी गटनेत्यांच्या संमतीने विशेष आमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच या विषयावर तांत्रिक मार्गदर्शन मिळावे यासाठी महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपआयुक्त यांना समितीच्या बैठकीस बोलावण्यात यावे, असे सुचविण्यात आले आहे. याशिवाय कर आकारणी विभागाचे माजी उपआयुक्त आणि सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानदेव ठुबे यांनाही सल्लागार म्हणून बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

या समितीमार्फत समाविष्ट गावांमधील मिळकत कर आकारणीची सद्यस्थिती, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनासमोरील अडचणी यांचा सविस्तर आढावा घेऊन योग्य धोरण निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमधील असंतोष कमी होऊन कर संकलनातही सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, उबाठातील सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका

Web Title: Wrong tax collection in 32 villages included in pune municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Property Tax
  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

Rameshwaram Cafe Encroachment : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड
1

Rameshwaram Cafe Encroachment : प्रसिद्ध ‘रामेश्वरम कॅफे’ला PMC चा दणका; अतिक्रमण केलेल्या जागेची तोडफोड

Pune Politics: पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय रचनेवरून राजकारण; राष्ट्रवादीचा प्रशासनावर ‘राजकीय’ हेतूचा आरोप
2

Pune Politics: पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय रचनेवरून राजकारण; राष्ट्रवादीचा प्रशासनावर ‘राजकीय’ हेतूचा आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Debt of Maharashtra: राज्याच्या तिजोरीवर तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; आकडा वाचून भरेल धडकी

Debt of Maharashtra: राज्याच्या तिजोरीवर तब्बल ‘इतक्या’ कोटींचे कर्ज; आकडा वाचून भरेल धडकी

Mar 06, 2026 | 12:36 PM
Kolhapur News :  वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

Kolhapur News : वाहतूक संघटनांचा एल्गार; ‘ई-चलनाविरोधात आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा

Mar 06, 2026 | 12:34 PM
Health Insurance Reforms: लवकरच विमा होणार स्वस्त; आयआरडीएचे मोठे बदल येणार

Health Insurance Reforms: लवकरच विमा होणार स्वस्त; आयआरडीएचे मोठे बदल येणार

Mar 06, 2026 | 12:30 PM
Sharad Pawar News :  राज्यसभेवर हॅटट्रीक! बिनविरोध निवड होताच शरद पवारांची भावनिक पोस्ट

Sharad Pawar News :  राज्यसभेवर हॅटट्रीक! बिनविरोध निवड होताच शरद पवारांची भावनिक पोस्ट

Mar 06, 2026 | 12:29 PM
Dhurandhar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर २’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या वेळ आणि तारीख

Dhurandhar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर २’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; जाणून घ्या वेळ आणि तारीख

Mar 06, 2026 | 12:22 PM
Latur News: ई-चलन दंडाविरोधात लातूरमध्ये वाहतूकदारांचा चक्का जाम; चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी

Latur News: ई-चलन दंडाविरोधात लातूरमध्ये वाहतूकदारांचा चक्का जाम; चुकीचे ई-चलन रद्द करण्याची मागणी

Mar 06, 2026 | 12:22 PM
US Israel Iran War: ‘पाताळात घुसून प्रहार!’ अमेरिकेच्या ‘B-2 Spirit Bomber’नी इराणचे भूमिगत ‘मिसाईल्स अड्डे’ केले जमीनदोस्त

US Israel Iran War: ‘पाताळात घुसून प्रहार!’ अमेरिकेच्या ‘B-2 Spirit Bomber’नी इराणचे भूमिगत ‘मिसाईल्स अड्डे’ केले जमीनदोस्त

Mar 06, 2026 | 12:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.