Mahashivratri celebrated with great enthusiasm at Shikhar Shingnapur in Maan taluka
दहिवडी : संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या महादेव डोंगरावर आज ‘हर हर महादेव’चा जयघोष झाला. मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण महादेव डोंगर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमला. आज (दि.26) महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी आले असून त्यांनी शिव पार्वतीचे मनोभावें दर्शन घेतले.
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या अलोट गर्दीत आज पहाटे 3 पासून भाविकानंसाठी मंदिर खुले करण्यात आले होते. मानकरी, सालकरी यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त मुख्य शंभू महादेव मंदिरात सजावट करण्यात आली होती. तर फुलमाळा व तोरणाची सजावट विशेष आकर्षण ठरत होते. रात्री 12 वाजता सालकरी मानकरी यांच्या उपस्थितीत महापूजा व बेलार्पण सोहळा संपन्न झाला. हरहर महादेव गर्जनेने शंभू महादेव मंदिर परिसर यावेळी दणाणून गेला होता.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिरास फुलमालांचे तोरण बांधण्यात आले तर मंदिर दगडी खांबास बेल फुल माळांची सजावट करण्यात आली होती. प्रतिवर्षी प्रमाणे महापूजा म्हणजे मुख्यशिवपिंडीच्या त्रिकाल प्रहरपूजा करण्यात आल्या . मध्यानरात्री 12 ते 1, मंगलपर्व काळी महाशिवरात्री महापूजा करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीसह राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी गर्दी केली होती हरहर महादेव गर्जनेत मध्यानरात्र महापूजा संपन्न झाली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवकथा व महान्यास पूजेबरोबर, महाशिवरात्री उत्साहात साजऱी झाली. महाशिवरात्रीनिमित्त गेले सप्ताहभर याठिकाी विविध धार्मिक कार्यक्रम सुरु होते. माघ कृष्ण नवमीच्या महान्यास पूजेने महाशिवरात्री प्रयोजनास प्रारंभ झाला होता. गेले सप्ताहभर शिवकथा, महान्यास पूजेबरोबर शिंगणापूर येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली.तर महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकभक्तांनी घेतला शिवलिंग दर्शनाचा लाभ झाला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ॐ नमः शिवाय जप, शिवलीलामृत ग्रंथ, ज्ञानेश्वरी सप्ताह वाचन, भजन पूजन,असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीस रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात आले होते. गुरुवारी उत्तर रात्री पासूनच भविक यात्रेकरूनीं मंदिरा सभोवती देवदर्शन, अभिषेकासाठी रांगा लावल्या होत्या. समस्त थदाळकर बडवे सालकरी यांनी महाशिवरात्री प्रयोजन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सर्वच मानकरी,सेवाधारी यांचे वतीने शंभू महादेव चरणी सप्ताहभर सेवा अर्पण करण्यात आली. सातारा,वडूज,दहिवडी,फलटण एसटी प्रशासनाने ज्यादा बसेसची सोय केली होती. उमाबनामध्ये वाहनतळ केल्याने शंभू महादेव मंदिर परिसरामध्ये वाहनांची कोंडी झाली नाही. दरम्यान दिवसभर मुख्यप्रशासकीय अधिकारी,लोकनेते, विविध संस्थाचे पदाधिकारी, यांनी महाशिवरात्री निमित्त शिवपिंडीचे दर्शन घेतले.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम रद्द
आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीनिमित्त नाशिक जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळीला ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पण काल (२५ नोव्हेंबर) प्राजक्ताने सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना माहित दिली. त्यानंतर हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हे पाहता आता प्राजक्ता माळीनं कार्यक्रमात नृत्य न करण्याचा निर्णय घेतला आहे.