Photo Credit- Social Media दिल्ली निवडणुकांबाबत अरविंद केजरीवालांचे मोठे विधान
आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत गोगी यांच्या निधनानंतर लुधियाना पश्चिमची जागा रिक्त झाली आहे. या जागेवरील पोटनिवडणुकीत पंजाबचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना तिकीट देण्याची तयारी आप करत असल्याची चर्चा होती, अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. आम आदमी पक्षाने लुधियाना पश्चिम जागेवर होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना तिकीट देण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आम आदमी पक्षाचे पंजाबमधील मंत्री, नेते आणि प्रवक्ते याचं खंडण करते होते, परंतु आज लुधियाना पश्चिम मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी संजीव अरोरा यांना उमेदवारी जाहीर होताच, पंजाबमधील आम आदमी पक्षाची या प्रकरणात पहिली मोठी प्रतिक्रिया आली.
अरविंद केजरीवाल यांना पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चांवर पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधावा म्हणाले की, अशा गोष्टी बोलणे हे विरोधी पक्षाचं काम आहे, परंतु कोण कुठून राज्यसभा सदस्य होईल आणि त्यात काय चूक आहे हे ठरवण्याचा अधिकार पक्षाला आहे. काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे इतर राज्यांमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पंजाबमधून राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांच्या जागेवरून अरविंद केजरीवाल यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या आणि लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीत संजीव अरोरा यांना उमेदवार घोषित करण्याच्या चर्चेवर, पंजाब भाजपचे प्रवक्ते प्रीतपाल सिंह बालीवाल म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना गुप्तपणे मागच्या दाराने राज्यसभेत प्रवेश दिला जात असल्याचं भाजपकडून सांगितलं जात होतं.
पहिले बलिदान म्हणून, राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना लुधियाना पश्चिममधून उमेदवार करण्यात आले. येत्या काळात संजीव अरोरा आपल्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा देतील हे स्पष्ट आहे आणि जेव्हा राज्यसभेची जागा रिक्त होईल तेव्हा केजरीवाल त्या मार्गाने राज्यसभेत जातील.
दिल्ली विधानसभेतला मंगळवार ठरला वादळी; 12 आमदारांचं निलंबन, दिवसभरात काय घडलं? वाचा सविस्तर
जे स्वतःला सामान्य लोक म्हणवतात ते सत्तेच्या सुखसोयींशिवाय राहू शकत नाहीत. त्यांना गाडी हवी आहे आणि त्याला बंगलाही हवा आहे. त्यांना विमानतळावर सुरक्षा आणि प्रोटोकॉलचीही आवश्यकता आहे आणि या सर्व गोष्टींसाठी आम आदमी पक्षाने केजरीवाल यांच्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे, परंतु त्यांना दिल्लीच्या जनतेने नाकारलं आहे. त्यांना आमदारही बनवण्यात आलं नाही आणि आज त्यांना पंजाबवर लादलं जात आहे. याचा आम्ही तीव्र विरोध करतो आणि संपूर्ण पंजाबचे लोक याचा विरोध करतील आणि जर ते दिल्लीहून आले आणि येथे आमच्यावर लादले गेले तर आम्ही ते सहन करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.