Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात भिंत कोसळून मोठी दुर्घटना; दोन जण जखमी, जीर्ण भिंतींचा धोका कायम

सुदैवाने दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आणि मोठी दुर्घटना टळली. अपघातावेळी खाली उभी असलेली २ वाहनेही नुकसानग्रस्त झाली. घटनेची माहिती मिळताच मनपाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 26, 2026 | 10:06 AM
महालात पुन्हा कोसळली भिंत

महालात पुन्हा कोसळली भिंत

Follow Us
Follow Us:

नागपूर : शहरात वारंवार भिंती कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. शनिवारी अशीच एक घटना महाल परिसरात घडली. येथे भिंत कोसळल्याने २ जण जखमी झाले. तसेच काही वाहनेही नुकसानग्रस्त झाली. माहिती मिळताच मनपाचे पथक बुलडोझरसह घटनास्थळी दाखल झाले आणि मलबा हटवण्याचे काम सुरू केले. विशेष म्हणजे, १ महिन्याच्या आत भिंत कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी महालातील गांधी गेटजवळील एका भिंतीचा काही भाग अचानक कोसळला. घटना घडली तेव्हा विक्रम भगत आणि भगवान कामठे हे खाली उभे होते. भिंतीचा कोसळलेला भाग अंगावर पडल्याने दोघेही जखमी झाले. सुदैवाने दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आणि मोठी दुर्घटना टळली. अपघातावेळी खाली उभी असलेली २ वाहनेही नुकसानग्रस्त झाली. घटनेची माहिती मिळताच मनपाचे पथक घटनास्थळी पोहोचले. जेसीबीच्या मदतीने भिंतीचा मलबा हटविण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

जीर्ण इमारतींच्या तपासणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह

जीर्ण इमारतींवर मनपाकडून कारवाई होत असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, शनिवारी महालात घडलेल्या भिंत कोसळण्याच्या घटनेमुळे जीर्ण इमारतींच्या तपासणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जबाबदार अधिकारी जीर्ण इमारतींच्या तपासणीला किती गांभीर्याने घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Vishwas Nangare Patil : वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा मोठा निर्णय

नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली

मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून राज्यभरात संतापाचे वातावरण असताना आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये याची पुनरावृत्ती झाली आहे. नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली असून, यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

‘नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?’ मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Web Title: Major accident in nagpur as wall collapses two injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’
1

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी
2

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा
3

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक
4

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.