Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी

Nagpur News : नागपुरात २५ हजार रुपये पगार मंजूर असताना कर्मचाऱ्यांच्या हातात केवळ १५ हजार रुपये मिळत असल्याच्या मुद्द्यावर आमदार विकास ठाकरे आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात एजी एन्व्हायरो, सुरक्षा एजन्सी, संबंधित बँक आणि दोषी मनपा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 09, 2026 | 03:39 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • विनापरवानगी बँक खाती आणि वेतनावर दरोडा
  • मुख्य मागण्या
  • आवाज उठवला म्हणून पगार रोखला
  • मनपाच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Nagpur News : कचरा संकलनाचे काम करणाऱ्या ‘एजी एन्व्हायरो’ कंपनीने सुरक्षा एजन्सी आणि मनपा अधिकाऱ्यांशी संगनमत करून १७ सुरक्षा रक्षकांच्या नावावर त्यांची परवानगी न घेताच परस्पर बैंक खाती उघडल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. या खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार करण्यात आले असून, सुरक्षारक्षकांना ठरलेल्या वेतनापेक्षा दरमहा हजारो रुपये कमी देऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली असल्याचाही आरोप आहे.

वेतनातील तफावत: कंत्राटाच्या नियमानुसार प्रत्येक सुरक्षारक्षकाला दरमहा २५,६०० रुपये वेतन मिळणे बंधनकारक होते, मात्र प्रत्यक्षात हाती पडलेली रक्कम कर्मचाऱ्यांना केवळ १५,५०० रुपये दिले जात होते.
वार्षिक अपहार त्यामुळे १७ सुरक्षारक्षकांचे दरमहा १,७१,७०० रुपये म्हणजेच वर्षाला तब्बल २०,६०,४०० रुपये हडपण्यात आले.

विनापरवानगी बँक खाती आणि वेतनावर दरोडा

पीडित सुरक्षा रक्षकांच्या शिष्टमंडळाने आमदार विकास ठाकरे यांची भेट घेऊन या गैरप्रकाराची पोलखोल केली. नोव्हेंबर २०१९ पासून ‘आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड’ या एजन्सीने सूर्योदय स्मॉल फायनान्स बैंकेत (बडीं शाखा) सुरक्षारक्षकांची कोणतीही संमती नसताना त्यांच्या नावाने खाती उघडली.

लग्नात मिळालेल्या दागिन्यांवर पतीचा हक्क नाही; घटस्फोटानंतर पत्नीला सर्व ‘स्त्रीधन’ परत द्या; हायकोर्टाचा आदेश

मुख्य मागण्या

संपूर्ण कंत्राट कालावधीतील सर्व आर्थिक व्यवहारांचे तात्काळ विशेष ऑडिट करण्यात यावे. बनावट खाती उघडणारी सुरक्षा एजन्सी, एजी एन्व्हायरो, सूर्योदय बैंक आणि मनपाच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या वेतनाची थकीत रक्कम व्याजासह त्वरित अदा करण्यात यावी.

आवाज उठवला म्हणून पगार रोखला

मे २०२६ मध्ये जेव्हा सुरक्षारक्षकानी या अन्यायाविरोधात आवाज उठवला, तेव्हा एजन्सीने सुडाचे राजकारण करत त्यांचे वेतनच रोखून धरले, पगार न मिळाल्याने जून २०२६ पासून या कर्मचा-यांवर काम बंद करण्याची वेळ आली.

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

मनपाच्या संशयास्पद भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मनपा ही ‘मुख्य नियोक्ता’ असताना कंत्राटदार कंपनी कामगार कायद्यांचे पालन करतेय की नाही, याची कोणतीही तपासणी अधिकाऱ्यांनी केली नाही. इतकेच नव्हे तर वाद निर्माण झाल्यानंतर एजी एन्व्हायरोने जुन्याच मालकांशी संबंधित असलेल्या ‘एलिट सिक्युरिटास’ या दुसऱ्या एजन्सीला कंत्राट दिले. केवळ नाव बदलून तोच गैरप्रकार सुरू ठेवण्यात आल्याचा संशय आमदार ठाकरे यांना आहे.

 

Web Title: Nagpur news 25 thousand salary 15 thousand in hand vikas thackeray aggressive the demand of the crime on the guilty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News
  • Salary

संबंधित बातम्या

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’
1

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून १२ हजार पदांवर भरती! ‘या’ पदांसाठी जागा भरणार
2

SBI Recruitment 2026: देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून १२ हजार पदांवर भरती! ‘या’ पदांसाठी जागा भरणार

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा
3

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक
4

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.