Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

Nagpur Health : नागपूरमध्ये आरोग्य सेवांमध्ये निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. रुग्णांना योग्य आणि वेळेवर उपचार मिळावेत, तसेच आरोग्य व्यवस्थेतील जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी प्रशासनाने भूमिका घेतली आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 08, 2026 | 04:38 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले
  • मुदतबाह्य औषधे आढळल्यास अधिकाऱ्यांवर गदा
  • ६६२ खाजगी रुग्णालयांची झाडाझडती : विशेष मोहीम तीव्र
Nagpur Health : शहरातील खाजगी रुग्णालयांच्या तपासणीबाबत महापालिकेकडून मोठे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष पाहता जमिनीवर त्याचे फलित अद्याप दिसलेले नाही. विशेष म्हणजे, तपासणी मोहीम सुरू झाल्याची घोषणा करून १५ दिवस उलटल्यानंतरही आरोग्य समिती केवळ ‘सखोल तपासणी करणार’ असल्याचीच री ओढत आहे.

प्रत्यक्षात किती रुग्णालयांची झाडाझडती झाली आणि कुठे नियमांची पायमल्ली सुरू आहे, याचा ठोस डेटा समोर येणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या बैठकीत आरोग्य सेवेतील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

बोगस डॉक्टरचे धाबे दणाणले

शहरात बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रक्टिस करणाऱ्या संशयित बोगस डॉक्टरांचे जाळे उद्धवस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक झोनल वैद्यकीय अधिकाऱ्याने कार्यक्षेत्रात शोधमोहीम राबवावी, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन विशेष पथकांद्वारे अचानक तपासण्या कराव्यात आणि दोषींवर थेट कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश बैठकीत दिले.

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

मुदतबाह्य औषधे आढळल्यास अधिकाऱ्यांवर गदा

मनपाच्या स्वतःच्या आरोग्य केंद्रांमधील सेवांच्या गुणवत्तेबाबत सभापतींनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणत्याही आरोग्य केंद्रात मुदत संपलेली औषधे आढळल्यास कोणतीही गय न करता संबंधित झोनल वैद्यकीय अधिकारी आणि फार्मसिस्टला थेट जबाबदार धरून कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

६६२ खाजगी रुग्णालयांची झाडाझडती : विशेष मोहीम तीव्र

नागपूर मनपा हद्दीतील ६६२ नौदणीकृत खाजगी रुग्णालयांची कसून तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. मोहिमेत प्रामुख्याने खालील बाबींची पडताळणी केली जाईल, सुविधा व सुरक्षा रुग्णालयातील एकूण खाटांची संख्या, अग्निशमन यंत्रणा आणि जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे आहे की नाही.

पारदर्शकता रुग्णांचे अधिकार आणि उपचारांचे दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. कायद्याचे पालन : ‘महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायद्या ‘तील नियमांचे काटेकोर पालन सर्व खाजगी रुग्णालयांना करावेच लागेल.

 

Web Title: Nagpur health action inevitable if patients lives are jeopardized health department issues warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • health
  • Nagpur
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक
1

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?
2

Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई
3

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
4

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.