Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’

Nagpur News : नागपूरच्या गोल्डन रिंग रोडवर ‘युटिलिटी कॉरिडोर’ उभारण्याची योजना आहे. या माध्यमातून वीज, पाणी, गॅस, दूरसंचार यांसारख्या विविध सेवा वाहिन्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते वारंवार खोदण्याची गरज कमी होऊन वाहतूक आणि शहराच्या पायाभूत सुविधांना फायदा होणार आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 09, 2026 | 04:07 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • रस्त्याच्या दुतर्फा उभारले जाणार ८ कमर्शिअल हब्स
  • हेलिकॉप्टरच्या साहाय्याने होणार अचूक मॅपिंग
  • शहरातील वाहतूक कोंडीवर बसणार नियंत्रण
Nagpur News : सुमारे १७३ किलोमीटर लांबीच्या ‘गोल्डन रिंग रोड’ अर्थात तिसऱ्या रिंग रोडच्या संभाव्यता अभ्यास (फिजिबिलिटी स्टडी) आणि सविस्तर प्रकल्प अहवालासाठी (डीपीआर) नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) वेगाने काम सुरू केले आहे. हा रिंग रोड केवळ वाहनांच्या वाहतुकीसाठीचा साधा बायपास नसून, स्वतःचा बांधकाम व देखभाल खर्च स्वतःच भागवणारा एक स्वावलंबी ‘इकॉनॉमिक कॉरिडोर’ (आर्थिक कॉरिडोअर) ठरणार आहे. माहितीनुसार, या महाप्रकल्पाच्या वित्तीय मॉडेलमध्ये ‘डेडिकेटेड युटिलिटी कॉरिडोर’वर विशेष भर दिला जात आहे.

मुख्य हायवेच्या रोड डिव्हायडर आणि राईट-ऑफ-वे अंतर्गत गॅस पाईपलाईन, पाण्याची मुख्य वाहिनी, वीज ट्रान्समिशन केबल्स आणि टेलिकॉम कंपन्यांचे ऑप्टिकल फायबर केबल्स टाकण्यासाठी स्वतंत्र जागा डिझाईन करण्याचे निर्देश एनएमआरडीएने आत्तापासूनच दिले आहेत. ही युटिलिटी स्पेस सरकारी व खासगी कंपन्यांना दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिली जाईल.

याशिवाय, या युटिलिटी कॉरिडोअरसोबतच सोलर पॅनेल आणि पवन ऊर्जा टर्बाईन लावून स्वच्छ वीजनिर्मिती करणे व तिची व्यावसायिक विक्री करण्याचा आराखडाही आखण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ड्रीम प्रोजेक्टचे काम जोरात सुरू आहे, प्राधिकरणाचे आयुक्त संजय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या तिसऱ्या आऊटर रिंग रोड प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी लवकरच सल्लागार एजन्सीची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

रस्त्याच्या दुतर्फा उभारले जाणार ८ कमर्शिअल हब्स

केवळ टोल टॅक्सवर अवलंबून न राहता एनएमआरडीएने या प्रकल्पाच्या व्यावसायिक मोनेटायझेशनची योजना आखली आहे. संपूर्ण १७३ किमीच्या क्षेत्रात ८ विशेष नोडल डेव्हलपमेंट पॉकेट्स चिन्हांकित केले जात आहेत. यामध्ये आयटी, लॉजिस्टिक्स, इंडस्ट्रियल आणि अॅग्रो प्रोसेसिंग हब्ससह मेडिकल व एज्युकेशनल सिटीचा विकास केला जाईल.

प्रवाशांच्या व अवजड वाहनचालकांच्या सोयीसाठी दर ५० किलोमीटरवर वे-साइड अॅमेनिटीज उभारल्या जातील, यात पेट्रोल-डिझेल, ईव्ही चार्जिंग स्टेशन, फूड प्लाझा, मोटेल, रेस्ट एरिया आणि आपत्कालीन ट्रॉमा सेंटरचा समावेश असेल.

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने होणार अचूक मॅपिंग

सामान्यतः पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये ड्रोनचा वापर केला जातो, मात्र एनएमआरडीएने या आऊटर रिंग रोडच्या टोपोग्राफिक सव्र्व्हेसाठी ड्रोनऐवजी उच्च अचूकता असलेल्या ‘अॅरियल लिडार’ तंत्रज्ञानाचा चापर अनिवार्य केला आहे. यामध्ये विमान किंवा हेलिकॉप्टरच्या खाली लेझर स्कॅनर लावून संपूर्ण १७३ किमी मार्गाचा ३डी डिजिटल मॅप तयार केला जाईल. यामुळे जमिनीच्या री-सरफेस मॅपिंगमधील त्रुटीची शक्यता शून्य होईल.

शहरातील वाहतूक कोंडीवर बसणार नियंत्रण

या रिंग रोडवर विशेष लॉजिस्टिक्स अॅड ट्रान्सपोर्ट पार्क्स आणि ट्रकसाठी ‘ट्रक ले-बाय’ची व्यवस्था केली जाईल. मुंबई, हैदराबाद, जबलपूर आणि अमरावतीकडून येणारी मालवाहतूक व ट्रक शहरात न येता थेट या आऊटर रिंग रोडने आपल्या गंतव्यस्थानाकडे निघून जाऊ शकतील, यामुळे शहरातील वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवता येईल, तसेच आतील रस्त्यावरील अपघात आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

Web Title: Nagpur news utility corridor to be constructed on golden ring road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Maharashtra Road
  • Nagpur
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
1

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी
2

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा
3

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक
4

Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.