Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: ठाकरेंना मोठा धक्का: अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; जिल्हाध्यक्षांसह ४ नगरसेवकांचा राजीनामा

अकोल्यात शिवसेना UBT ला मोठे खिंडार पडले असून जिल्हाध्यक्षांसह ४ नगरसेवकांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. हे सर्व नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला

  • By anuradha sagar
Updated On: Mar 19, 2026 | 03:06 PM
Akola Political, Shiv Sena, Eknath Shinde Akola, Uddhav Thackeray Akola, Maharashtra Politics,

Akola Political, Shiv Sena, Eknath Shinde Akola, Uddhav Thackeray Akola, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांसह चार नगरसेवकांनी शिवसेना गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश
  • जिल्हाध्यक्ष आणि चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता अकोल्यात ठाकरे गटाकडे फक्त दोनच नगरसेवक
  • शिवसेना शिंदे गटानेही महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती, पण त्यांना फक्त एक जागा जिंकता आली.
Shiv Sena UBT Resignation: अकोला महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी संपून अवघा काही अवधी लोटला आहे. अशातच अकोल्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाला अकोल्यात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांसह चार नगरसेवकांनी शिवसेना गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मंगळवारी (१७ मार्च) रात्री मुंबईत अकोला शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांसह चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. ही बातमी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हाध्यक्ष आणि चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता अकोल्यात ठाकरे गटाकडे फक्त दोनच नगरसेवक उरले आहेत. त्यानतंर आता अकोल्याच्या ८० सदस्यीय महानगरपालिकेतील त्यांचे संख्याबळ जवळपास संपुष्टात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत,ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगेश काळे आणि चार नगरसेवक, मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे हे सर्वजण शिवसेना शिंदे गटात सामील झाले.

Meta च्या ‘या’ घोषणेमुळे 3,000,000,000 इन्स्टाग्राम युजर्सची Privacy धोक्यात, काय आहेत नेमकं बद्दल?

अकोला महानगरपालिका निवडणुकीत, महाविकास आघाडीपासून वेगळे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने ५४ जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यात त्यांनी सहा जागा जिंकल्या. पण चार नगरसेवकांच्या फुटीमुळे आता आता महापालिकेत ठाकरे गटाचे फक्त २ नगरसेवक उरले आहेत.

शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव वाढला

शिवसेना शिंदे गटानेही महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती, पण त्यांना फक्त एक जागा जिंकता आली. भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर, चार नवीन नगरसेवकांच्या समावेशामुळे शिंदे गटाचे संख्याबळ पाच झाले असून, महानगरपालिकेत त्यांचा प्रभाव वाढला आहे.

Maharashtra Rain Alert: सणाच्या दिवशी पण पाऊस! पुणे शहरात वरूणराजाने लावली हजेरी

शिवसेनेच्या ठाकरे गटात फक्त दोन नगरसेवक उरले

यावेळी नगरपालिका निवडणुकीत चित्र बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. ठाकरे गटाने ५४ जागांवर निवडणुका लढवल्या. पण केवळ सहा जागा जिंकल्या, तर अनेक जागांवर त्यांना थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या सहापैकी चार नगरसेवकांनी आता गट सोडला असून, ठाकरे गटाकडे अकोल्यात फक्त दोन नगरसेवक उरले आहेत. यामध्ये नगरसेवक अभय खुमकर आणि विजय इंगळे यांचा समावेश आहे.

मंगेश काळे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होणार?

या राजकीय घडामोडीशी संबंधित माहितीनुसार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांची आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती होण्याची चर्चा आहे. नगरसेवकांना त्यांच्या संबंधित विभागांच्या विकासासाठी भरीव निधी मिळू शकतो, असेही सांगितले जात आहे.

 

 

 

Web Title: Major blow to thackeray in akola district chief and 4 corporators resign from shiv sena ubt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Akola Municipal Corporation Election 2026
  • Eknath Shinde
  • Shivsena Politics
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.