पुणे शहरात पावसाची हजेरी (फोटो - ai gemini)
पुणे शहरात पावसाची हजेरी
हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
Pune Weather Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी देखील लागल्याचे दिसून आले. दरम्यान सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह आहे. आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच पुणे शहरात पावसा ने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेला पावसाचा अंदाज खरा ठरताना दिसून येत आहे.
पुणे शहरातील अनेक भागात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सिंहगड रस्ता परिसरात वडगाव, नांदेड सिटी परिसरात पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासून ढगाळ आणि उन्हाळी वातावरण पाहायला मिळाले. मात्र अचानक दुपारी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसामुळे गुढीपाडव्याच्या कार्यक्रमांवर थोडासा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे शहराप्रमाणेच राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये देखील गारपीट आणि जोरदार पाऊस झाला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा
अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बुधवारी गारपीटासह अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरात ऐन कापणीच्या तोंडाशी आलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गुरुवारी गुढी पाडव्याच्या सणाआधीच शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचा आढावा स्थानिक पातळीवर घेतला जात असून, मदतीची मागणी होत आहे.
विधानभवन येथे धाराशिवचे आमदार कैलास पाटील व उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांनी बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. त्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
Unseasonal Rain: अवकाळीमुळे ‘राजा’ संकटात; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुणे-कोल्हापूर महामार्गासह आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. डिंभे धरण परिसरात दुपारनंतर वातावरणात गारवा निर्माण होत पावसाला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून उकाडा वाढला होता. सध्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विशेषतः आदिवासी भागातील शेतकरी चिंतेत असून, पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






