फोटो सौजन्य - Social Media
दरम्यान, ‘देऊळबंद 2’ सिनेमानिमित्त प्रवीण तरडे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. बारामती येथे असताना त्यांनी आवर्जून विद्या प्रतिष्ठानमधील अजित दादांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. तसेच, अजित दादांविषयी आपल्या मनात असलेल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पत्नीसह अजित दादांना वंदन करतानाचे हे क्षण सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत.
प्रवीण तरडे सध्या अनेक वाहिन्यांना मुलाखती देण्यात व्यस्त आहेत. अशाच एका मुलाखतीत त्यांना, “आता पुढे कोणत्या व्यक्तिमत्त्वावर बायोपिक बनवणार?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अजितदादा पवार” असे उत्तर दिले.
भविष्यात अजित दादांवर सिनेमा काढणार असल्याचे संकेत स्वतः प्रवीण तरडे यांनी या मुलाखतीत दिले आहेत.
‘देऊळबंद 2’ सिनेमाने 100 कोटींचा आकडा पार करून इतिहास रचला आहे. 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘देऊळबंद 2’ हा तिसरा ऐतिहासिक मराठी सिनेमा ठरला आहे. तसेच, ‘देऊळबंद’ या चित्रपटाच्या पुढील भागांमध्ये स्वामींच्या विविध लीला अनुभवायला मिळतील, याची ग्वाही स्वतः दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली आहे. याशिवाय, ‘देऊळबंद 2’ हा मराठी सिनेविश्वाच्या इतिहासातील दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आता हा सिनेमा कमाईचा टप्पा किती गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






