Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांनो, घाबरून जाऊ नका; LPG च्या उत्पादनात केली मोठी वाढ, पुरवठा लवकरच सुरळीत होणार

राज्यात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. भुजबळ म्हणाले, गॅसपुरवठा हा केंद्राचा विषय आहे. त्यांच्याकडे मुबलक एलपीजी असल्याचे केंद्राने सांगितले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2026 | 07:57 AM
एलपीजीचे ११ हजार टन उत्पादन वाढले

एलपीजीचे ११ हजार टन उत्पादन वाढले

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशात एलपीजी आणि पीएनजीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. एलपीजीचे उत्पादन 11 हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊन रांगा लावण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले. तसेच, गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात सरकारने आक्रमक पवित्रा घेतला असून, आतापर्यंत ३३ गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. भुजबळ म्हणाले, गॅसपुरवठा हा केंद्राचा विषय आहे. त्यांच्याकडे मुबलक एलपीजी असल्याचे केंद्राने सांगितले आहे. त्यामुळे एलपीजी आणि पीएनजीचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे काळजी करायचे कारण नाही. गॅसचा साठा दडवून ठेवणे किंवा काळाबाजार करणे रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील भुजबळ यांनी सभागृहात मांडला.

छगन भुजबळ यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलाविषयीदेखील माहिती दिली. ते म्हणाले, सिलिंडरच्या किमती मागील महिन्यात ८५२.५० रुपये होत्या. आता त्या ९१२.५० रुपये झाल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडर १७२०.५० रुपये होत्या, तर आता त्याच किमती १८३५ रुपये झालेल्या आहेत. घरगुती सिलिंडरला भारत सरकारतर्फे आपल्याला ३०० रुपये मिळतात.

हेदेखील वाचा : Indian Currency : Iran युद्धाची रुपयाला झळ, Dollar समोर भारतीय चलन का पडतंय कमकुवत?

केरोसीन उपलब्ध करुन देऊ

राज्यात केरोसीन पुन्हा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आपल्याकडे केरोसीनचा साठा आहे. पण, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिला होता की, उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ लोकांनी घेतल्यामुळे केरोसीन देऊ नका. मात्र, सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता केरोसीन आता उपलब्ध करुन द्यावे लागेल, असे भुजबळ म्हणाले.

जहाज गुजरातच्या बंदरात

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून भारतावर ओढवलेले एलपीजी संकट आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग बंद केल्यामुळे भारतीय जहाजे तिथे अडकून पडली होती. मात्र, भारताच्या यशस्वी राजनैतिक प्रयत्नांनंतर, 54 हजार टन एलपीजी घेऊन ‘शिवालिक’ हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुखरूप दाखल झाले आहे. यामुळे देशातील गॅस टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

Web Title: Major increase in lpg production supply to normalize soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • Iran-Israel War
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

Iran-Israel War : युद्धाचा बसतोय मोठा फटका; हवाई आणि सागरी मालवाहतुकीचे वाढले दर
1

Iran-Israel War : युद्धाचा बसतोय मोठा फटका; हवाई आणि सागरी मालवाहतुकीचे वाढले दर

थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस
2

थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

Price Rise : युद्धानं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! सोफ्यापासून गाद्यांपर्यंत सर्व काही महागलं
3

Price Rise : युद्धानं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! सोफ्यापासून गाद्यांपर्यंत सर्व काही महागलं

“उद्योगांना LPG चा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार रावल?
4

“उद्योगांना LPG चा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी…”; काय म्हणाले मंत्री जयकुमार रावल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.