ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांनी विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्यांचा वापर वाढवला आहे.
भारताचे 'पाइन गॅस' आणि 'जग वसंत' ही दोन एलपीजी टँकर्स सोमवारी पहाटे पर्शियन आखातातून यशस्वीरित्या बाहेर पडली आहेत. ही जहाजे पुढील दोन दिवसांत भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
एलपीजीचा पुरवठा ही अजूनही चिंतेची बाब असली, तरी एलपीजी वितरक स्तरावर मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. एलपीजीसाठी भीतीपोटी केल्या जाणाऱ्या (पॅनिक-ड्रिव्हन) बुकिंगमध्ये आता घट झाली आहे.
स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून १४.२ किलोच्या सिलेंडरमध्ये आता फक्त १० किलो गॅस मिळणार आहे. दरांमध्येही एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आला आहे.
तालुक्यातील अनेक गावात गॅसधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी ३० दिवसांची मर्यादा वाढवून आता ४५ दिवस केली असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
देशात एलपीजी आणि सीएनजी पुरवठा सुरळीत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच आखाती देशांत अडकलेल्या २.८ लाख भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आले आहे.
नांदेड शहरात गॅस टंचाईचे संकट अद्याप कायम असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी सकाळी महावीर गॅस एजन्सीवर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले
नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या छाप्यात एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त OTP प्रणालीद्वारेच करावा, असे आदेश देण्यात आले. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट सिलेंडरचे वितरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
गॅस तुटवडा निर्माण झाला असून याविरोधात वाईतील मुख्य किसनवीर चौकात काँग्रेसच्या महिला पदाधीकाऱ्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी आणि चहा बनवून अनोखे आंदोलन केले.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरुन सरकारवर निशाणा साधला. तसेच मंदिरांच्या अन्नछत्रांसाठी तरी गॅस द्यावा अशी मागणी केली.
भारताच्या यशस्वी राजनैतिक प्रयत्नांनंतर, 54 हजार टन एलपीजी घेऊन 'शिवालिक' हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुखरूप दाखल झाले आहे. यामुळे देशातील गॅस टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
आज घराघरात वापरल्या जाणाऱ्या LPG (Liquefied Petroleum Gas) चा शोध लागण्यामागे एक अतिशय रंजक घटना कारणीभूत आहे. हा शोध प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ वॉल्टर स्नेलिंग (Walter Snelling) यांनी लावला.
PNG नेटवर्कजवळ राहणाऱ्या सुमारे 60 लाख कुटुंबांना ही सुविधा स्वीकारण्याची विनंती केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी हे स्पष्ट केलं
जेवणाच्या ऑर्डर एक ते दोन महिने आधी केटरिंग व्यावसायिकांना दिल्या जातात. अशात गॅस टंचाईमुळे लग्नसराईच्या ऑर्डर कशा पूर्ण करायच्या? असा प्रश्न केटरिंग व्यावसायिकांसमोर उभे राहिले आहेत.
Gas Black Marketing Action: देशात एलपीजी गॅसचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
MVA Protest against Fuel Crisis: सातारा शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गॅसच्या किंमती वाढल्यामुळे स्मृती इराणी यांनी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जोरदार आंदोलन केले होते. यावरुन आता गॅस तुटवड्यावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे.