Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : ‘कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा’; स्थानिक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जुना मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर कल्याणफाटा ते कळंबोली पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते.त्यामुळे कित्येक वर्ष महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिकांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 23, 2025 | 06:00 PM
KDMC News : ‘कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा’; स्थानिक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  • वाहतूक कोंडी नागरिकांना ठरतेय डोकेदुखी
  • कल्याण फाटा ते कळंबोली आठ पदरी महामार्ग करा,
  • स्थानिक आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डोंबिवली : लोकवस्ती वाढतेय तशी जागेची मागणी आणि किंमतही वाढत जात आहे. दिवसेंदिवस याच कारणाने मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कित्येक वर्ष महामार्गालगत राहणाऱ्या स्थानिकांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे. या त्रासाला अपवाद KDMC देखील नाही. कल्याण डोंबिवली हद्दीतील कल्याण फाटा ते नवी मुंबईतील कळंबोली महामार्ग आठ पदरी महामार्ग करा, अशी मागणी माजी स्थानिक आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक

जुना मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर कल्याणफाटा ते कळंबोली पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. उरण जे.एन.पी.टी. बंदरातून दररोज सुमारे 20 ते 25  हजार कंटेनर, अवजड वाहने नाशिक, गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये येत – जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याच परिसरात लोकनेते दि. बा. पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे या महामार्गावरून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे सध्या असलेला चार पदरी महामार्ग आठ पदरी करावा अशी मागणी माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पत्राद्वारे केली आहे.

दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा एकमेव महामार्ग आहे. सदरचा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येतो. सदरचा चार पदरी महामार्ग अपुरा पडत असून तो आठ पदरी केल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दूर होवून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या महामार्गावरून पुणे, मुंबई तसेच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावार वाहतूक होत असते.या महामार्गावर अवजड वाहन बंद पडले अथवा अपघात झाला तर या महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे कल्याण फाटा ते कळंबोली महामार्ग आठ पदरी करण्यासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांचा सतत पाठपुरावा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

Mira Bhayander News : उत्तन विकास आराखड्यावर हरकतींसाठी ग्रामस्थांची मुदतवाढीची मागणी

Web Title: Make an eight lane highway from kalyan phata to kalamboli mla subhash bhoir demands from the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • KDMC
  • Traffic News

संबंधित बातम्या

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक
1

KDMC News : कचऱ्यामध्ये चुकून सापडली मौल्यवान वस्तू अन्…; सफाई कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचं कौतुक

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन
2

Kalyan : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचा KDMC मुख्यालयासमोर बोनससाठी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.