Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माळेगावकरांनो…तुमच्या विश्वासाला तडा लागू देणार नाही; अध्यक्ष अजित पवारांनी दिली ग्वाही

माळेगाव कारखान्याची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संचालक व अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 06, 2025 | 06:30 PM
Maratha Reservation:

Maratha Reservation:

Follow Us
Follow Us:

बारामती : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे अजित पवार यांनी हाती घेतली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी  संचालक व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काटकसरीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कधीही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा देत माळेगावकरांनो तुम्ही दिलेल्या विश्वासाला कदापिही तडा लागू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

माळेगाव कारखान्याची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संचालक व अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीनंतर कारखाना कार्यालयाबाहेर थांबलेल्या सभासद व कार्यकर्त्यांशी अजित पवार यांनी संवाद साधला.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आपण निवड झाल्यानंतर अधिकारी व संचालकांची बैठक घेऊन कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये अनेक सभासदांनी चांगल्या सूचना मांडल्या. त्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नीरा नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या उपयोजना करता येतील, त्या केल्या जातील. आपण निवडणूक प्रचारामध्ये जाहीर केल्याप्रमाणे कारखान्याच्या कोणत्याही संचालकाला कारखान्याची गाडी वापरता येणार नाही. भाड्याची गाडी न वापरण्याच्या सूचना देखील आपण कार्यकारी संचालकांना दिल्या आहेत. कोणताही कामगार कामचुकार करत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांची ऊसतोड करताना नियमानुसारच केली जाईल, यामध्ये कोणत्याही प्रकारचा दूजाभाव होऊ दिला जाणार नाही. कारखान्याच्या हितासाठी जे काही करता येईल, ते पारदर्शी पद्धतीने केले जाईल, असे अजित पवार म्हणाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिवनगर प्रसारक म्हणून तीन जणांची शिफारस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळ या कारखान्याच्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार असल्याने या संस्थेमध्ये सहा विश्वस्त नेमण्याचे अधिकार त्यांना आहेत, मात्र त्यांनी ॲड एस. जगताप, ॲड राजेंद्र काटे व व रोहन देवकाते या तिघांची विश्वस्त म्हणून शिफारस केली आहे, उर्वरित एका जणांची नावे देण्याचे अधिकार मला दिले आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत त्या तिघा विश्वस्तांची नियुक्ती आपण करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार

माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतल्याचे सांगत अजित पवार यांनी सहकार कायद्याच्या तरतुदीनुसारच ही निवड करण्यात आली आहे. या संदर्भात आपण सहकार खात्यातील तज्ञांशी तसेच वकिलांशी चर्चा करूनच आपण अध्यक्ष होण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार दिला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

Web Title: Malegaon sugar factory chairman ajit pawar held a meeting of the board of directors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • ajit pawar
  • malegoan news
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
2

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…
3

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
4

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.