Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manikrao Kokate on Jangali Rummy: जंगली रमी’वाद: स्पष्टीकरण देता देता कोकाटेंना फुटला घाम, म्हणाले, “मी काही पाप केलं नाही”

रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर कृषीमंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळतानाता व्हिडीओ शेअर केला. "जंगली रमी पे आओ ना महाराज..." आणि "कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज!" असी टीका त्यांनी केली होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 20, 2025 | 05:06 PM
Manikrao Kokate Conviction,

Manikrao Kokate Conviction,

Follow Us
Close
Follow Us:

Manikrao Kokate on Jangali Rummy:  मंत्रीपद मिळाल्यापासूनच सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी थेट विधिमंडळात कोकाटे ‘जंगली रमी’ गेम खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर माणिकराव कोकाटेंना यावर स्पष्टीकरण देताना चांगलाच घाम फुटल्याचेही दिसत आहे. रोहित पवार यांनी व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी आपण गेम खेळत नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.

स्वत:च्या बचावार्थ बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, “मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो आणि कनिष्ठ सभागृहात काय चालले आहे हे पाहण्यासाठी YouTube प्ले करत होतो. त्यावेळी अचानक ‘जंगली रमी’ ची जाहिरात आली. ती जाहिरात स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. त्याच क्षणाचा व्हिडिओ दाखवून मला केलं जात आहे. तुम्हाला अशा जाहिराती येत नाहीत का?” असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

भूकंपामुळे हादरली रशियाची जमीन; त्सुनामीचा इशाऱ्याने लोकांमध्ये घबराट, जाणून घ्या काय आहे परिस्थिती?

तसेच, “मी काही पाप केलं नाही. मी गेम खेळत नव्हतो. जाहिरात स्किप करताना थोडा वेळ लागला इतकंच. आम्ही शेतकऱ्यांसाठी जी कामे करत आहोत, त्यावर कोणी काही बोलत नाही, मात्र दोन सेकंदाच्या क्लिपवरून मला टार्गेट केलं जातंय. माझं काम पारदर्शक असून मी तितकाच जबाबदारीनं वागतो.” असंही कोकाटेंनी स्पष्ट केलं. पण या संपूर्ण वादावर विरोधकांनी मात्र कोकाटेंना जाब विचारत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, कोकाटे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवावा का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले की, ‘मी माझ्या विभागाच्या कामांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही का? यासाठीच आम्ही दौरे करत आहोत. मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मात्र, काही लोक केवळ बदनामी करण्यासाठी डाव आखत आहेत.” त्यांनी पुढे रोहित पवारांकडेही लक्ष्य करत म्हटले.

सोनाक्षीच्या ‘निकिता रॉय’ला मिळाला कमी स्क्रीन टाइम, भाऊ कुश सिन्हाने ‘सैयारा’ चित्रपटाला दिला दोष

रोहित पवारांकडून कोकाटेंचा व्हिडीओ व्हायरल

रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर कृषीमंत्री कोकाटे सभागृहात रमी खेळतानाता व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिलं, “जंगली रमी पे आओ ना महाराज…” आणि “कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज!” अशा खोचक शब्दांत त्यांनी निशाणा साधला. इतकंच नव्हे तर, “रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा, कर्जमाफी, शेतीमालाचे भाव यांसारख्या मागण्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्त आवाज ऐकू येतील का? दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना, सभागृहात मंत्री रमी खेळत आहेत हे दुर्दैवी आहे.” असं टीकाही केली होती. तसंच, “कधीतरी गरीब शेतकऱ्यांच्या शेतीवर या महाराज! खेळ थांबवा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या…” असा स्पष्ट संदेशही रोहित पवारांनी दिला. त्यानंतर कोकाटे चांगलेच चर्चेत आले होते.

 

Web Title: Manikrao kokate breaks into a sweat while explaining the viral video of jungli rumi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • Manikrao Kokate
  • rohit pawar
  • viral video

संबंधित बातम्या

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …
1

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …

Viral: मृत्यूशी झुंज! तासभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत, थरारक VIDEO समोर
2

Viral: मृत्यूशी झुंज! तासभर ट्रॅक्टरखाली दबला होता तरुण; बाहेर हात काढून मागत होता मदत, थरारक VIDEO समोर

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral
3

15 भुकेल्या जंगली सिंहांमध्ये जिवंत बकरीला सोडलं, मग जे घडलं… काही सेकंदातच पडला फडशा; थरारक Video Viral

भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral
4

भावाला मृत्यूचेही भय नाही! विना सेफ्टी 101 मजली इमारत चढून केला विक्रमी स्टंट; पाहून युजर्सचे हातपाय थरथरले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.