Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला; आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातही तोच नियम लावा – मनोज जरांगे पाटील

नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेचे कौतुक केले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही फास्ट ट्रॅक पद्धतीने न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 04:46 PM
'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

'मी आणि समाज कधीच मागे सरकणार नाही'; मनोज जरांगे पाटलांचा निर्धार

Follow Us
Follow Us:

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेचे कौतुक केले. त्याचवेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही अशाच वेगाने न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, नसरापूर प्रकरणात शासनाने तत्परता दाखवली आणि अवघ्या दोन महिन्यांत न्याय मिळाला, ही चांगली बाब आहे.

“संतोष देशमुख प्रकरणातही तोच नियम लागू करा”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री साहेबांचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी या प्रकरणात तत्परता दाखवली आणि अल्पावधीत आरोपीला शिक्षा झाली. हाच नियम संतोष देशमुख हत्या प्रकरणात, तसेच मालेगाव येथील तीन वर्षीय मुलीच्या प्रकरणातही लागू केला पाहिजे.”

Nasarapur Case: चिमुरडीच्या हत्याऱ्याला फाशी मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अशा नराधमांना…’

त्यांनी पुढे सांगितले की, नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याने पीडित कुटुंबाला आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला आहे. मात्र, संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि मालेगावसारख्या गंभीर प्रकरणांमध्येही जलदगतीने न्याय मिळणे तितकेच आवश्यक आहे.

शेतकरी आंदोलनाबाबतही भूमिका स्पष्ट

यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होतो. सरकार असो किंवा विरोधक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जे आंदोलन करतात, त्यांच्यासोबत मी उभा राहतो. बच्चू कडू आणि रोहित पवार यांच्या आंदोलनांबाबतही माझी हीच भूमिका आहे.”

नसरापूर प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात जलद न्यायप्रक्रियेबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, याच धर्तीवर इतर संवेदनशील गुन्ह्यांमध्येही तत्पर कारवाई आणि न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही, नसरापूर हत्या प्रकरणातल्या निकालावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, न्यायालयाने अत्यंत योग्य निर्णय दिला आहे; अशा मारेकऱ्यांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाचे मनापासून आभारही मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकील अजय मिसर यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कमी वेळेत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांनी तपास यंत्रणांचे कौतुक केले.

Web Title: Manoj jarange on nasarapur case santosh deshmukh fast track demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Manoj Jarang patil
  • Nasrapur Case

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग
2

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
3

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?
4

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.