Shivsena mp Milind Deora letter to CM devendra fadnavis for Protests banned in South Mumbai
जुन्नर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. कोर्टाच्या आणि सरकारच्या नियमांनंतर जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर केवळ एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर आता जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला इशारा दिला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीला भेट दिली आहे. यानंतर शिवनेरीवरुन जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. मराठा समाजाच्या योगदानाची मुख्यमंत्र्यांनी कदर केली पाहिजे,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारकडून केवळ एक दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सगळ्या महाराष्ट्रासमोर असं सिद्ध करायचं होतं की त्यांनी तर आंदोलनाला परवानगी दिली. पण एक दिवसाची परवानगी दिली ही गरिब मराठ्यांची चेष्ठा आहे. परवानगीसाठी ते आधी न्यायालयाकडे बोट दाखवत होते. पण शेवटी परवानगी त्यांनीच दिली. त्यामुळे ते एक दिवसाचीही परवानगी देऊ शकतात आणि मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंतही आआंदोलन करण्याची परवानगी देऊ शकतात. पण त्यांनी जाणूनबुजून एकच दिवसाची परवानही दिली. तुम्ही मोठे मन दाखवायला हवं होते,” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “यांचं बहुमताचं सरकार मराठ्यांच्या मतांवरच आलं आहे. तुमच्याविरोधात मराठ्यांची लाट वारंवार आली, तर येणारे दिवस तुमचं राजकीय करिअर बरबाद करणारे असतील. मी वारंवार सांगितलंय, आजही तेच सांगतोय. देवेंद्र फडणवीसांना आता योग्य संधी आहे. संधीचं सोनं करा मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी आहे. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाही हा आमचा शब्द आहे,” असे म्हणत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे.