Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ठाकरे गटात वाद; माजी नगरसेवकांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर फाेडले खापर

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2025 | 12:18 PM
ठाकरेंकडून शिवसेना बळकटीसाठी प्रयत्न सुरु असतानाच 'इथं' पेटले गृहयुद्ध; तक्रार करत म्हटलं...

ठाकरेंकडून शिवसेना बळकटीसाठी प्रयत्न सुरु असतानाच 'इथं' पेटले गृहयुद्ध; तक्रार करत म्हटलं...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. साेडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेवकांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर खापर फाेडले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने या पाचही जागा महापालिकेच्या निवडणुकीत आमच्या वाट्याला हव्यात, अशी मागणी केली आहे.

पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद बाहेर पडू लागली आहे. माजी पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभुमीवर माजी नगरसेवक विशाल धनावडे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करीत, माझी शिवसेना, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब यांच्याबद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. परंतु पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही. गेल्या पाच वर्षांत पक्ष वाढविण्यासाठी काही प्रयत्न केले गेले नाही. नगरसेवकांची संख्या वाढविण्यापेक्षा त्यांच्याच पायात पाय घालण्याचा प्रकार सुरु आहे. ज्यांचे खरे काम बॅक ऑफिस सांभाळणे आहे त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे. पक्षात मागील 5 वर्षात पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही की त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी टिका धनावडे यांनी केली आहे.

धनावडे यांनी केलेल्या टिकेला शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. थरकुडे म्हणाले, पक्ष सोडणाऱ्या माजी नगरसेवकांवर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांना निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात किती बैठका घेतल्या तसेच शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले हे त्यांना विचारण्याची आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक

ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये जाणाऱ्या पाचही जागा या महायुतीच्या जागा वाटपात आमच्या पक्षाला मिळाव्यात अशी भुमिका शिंदेंच्या शिवसेनेने घेतली आहे. यासंदर्भात शहर प्रमुख प्रमाेद ऊर्फ नाना भानगिरे यांनी पत्रकार परीषदेत भुमिका जाहीर केली. यामुळे पुढील काळात जागा वाटपात या जागा वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पत्रकार परीषदेला शिवसेनेचे शहर व जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले यावेळी उपस्थित होते. तर भाजपकडून या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा अथवा माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा : लघुशंका करताना हटकल्याचा राग; टोळक्याच्या मारहाणीत सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा मृत्यू

‘त्या’ जागा आम्हीच लढविणार

भानगिरे म्हणाले की, राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत आम्ही महायुती म्हणून काम केले. गेल्या अडीच वर्षात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. या दोन्ही निवडणूकांंमध्ये ज्यांचा विद्यमान खासदार, आमदार ती जागा त्या पक्षाची असे जागा वाटपाचे सूत्र होते. हेच सूत्र महापालिका निवडणूकांमध्येही कायम असणार आहे. त्यामुळे, २०१७ मध्ये तत्कालीन शिवसेनेने लढविलेल्या जागा आम्ही लढविणार आहोत. जे पाच नगरसेवक भाजपमध्ये जात आहेत त्या जागा ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढले होते. त्यामुळे या जागा शिवसेनेच्या असून या जागा आम्हीच लढविणार असल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे.

Web Title: Many former corporators from the thackeray group in pune are going to join the bjp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
1

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.