Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 02, 2026 | 04:23 PM
काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

Follow Us
Follow Us:

मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. टिळक भवन येथे आज पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी मंत्री वामनराव नाईक यांची नात गितांजली नाईक यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

 

भाजप शिक्षक आघाडी व उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ कल्याणचे अध्यक्ष विकास मुकुंदराव पाटील यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. प्रभारी डॉ. सिरिवेल्ला व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे स्वागत केले. यावेळी CWC चे सदस्य राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, AICC चे सचिव, बी.एम. संदीप, रेहाना चिस्ती, ज्येष्ठ नेते अशोक पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रदेश सरचिटणीस ऍड. संदेश कोंडविलकर, प्रवेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, धीरज देशमुख, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनावणे, प्रवीणकुमार शेप आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद म्हणाले की, बीड जिल्ह्यासह ज्या जिल्ह्यात काँग्रेस संघटनेची ताकद कमी आहे तेथे संघटन मजबूत करण्याची गरज आहे. पडीक जमीन कसण्याचे प्रयत्न शेतकरी कधीच सोडून देत नाही, ती जमीन सुपिक होईपर्यंत मशागत करतच राहतो, त्याप्रमाणे जेथे काँग्रेस पक्षाची ताकद कमी आहे तेथे जोमाने काम करा, संघटनेची ताकद वाढवा. लोकशाही व संविधान वाचवणे व सर्वसामान्य जनतेचे मुलभूत हक्क व अधिकार कायम रहावेत यासाठी केंद्रात काँग्रेसचे सरकार व राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे हात बळकट करायचे आहेत, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे ८८२ दिवस आहेत, जोमाने काम करा, असे आवाहन प्रसाद यांनी केले.

हे सुद्धा वाचा  : घरातच थाटला तंबाखूचा कारखाना! अमूलच्या नावाने बनावट चीजही बनविले; पोलिसांनी केली मोठी कारवाई

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आपल्या आजोबा पंजोबांनी आरएसएस-भाजपाचा कुटील डाव ओळखला होता म्हणून ७० वर्षे त्यांना सत्तेपासून दूर ठेवले होते, आरएसएस-भाजपाचा अजेंडा समाजात फुट पाडण्याचा, भेदाभेद करण्याचा आहे, हा डाव आता तरुणाईनेही ओळखला आहे. काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे आणि काँग्रेसचा विचारच देशाला तारू शकतो, त्यामुळे गावागावात काँग्रेसचा विचार पोहचवा, असे सपकाळ म्हणाले. आजच्या पक्ष प्रवेशाने बीड जिल्हृयात व खान्देशात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढण्यास मदत होईल असेही सपकाळ म्हणाले.

Web Title: Many leaders have joined the congress party in the presence of state president harshvardhan sapkal nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण
1

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
3

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
4

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.