पुणे : पुण्यात महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत चालला आहे. आता देखील ९ दिवसांच्या बाळाला सोडून आई बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाघोली परिसरातून २४ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचं नाव पूजा खंबाट असं आहे. या महिलेने कुणालाही न सांगता घरातून बाहेर निघाली. बाहेर जातांना ती महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
पूजेची पोलीस कसून शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा हिला ९ दिवसाचं बाळ आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नुकताच सी-सेक्शन डिलेव्हरी झाली होती. पूजाचे टाके देखील काढले नसल्याची माहिती समोर येत आहे. अवघ्या ९ दिवसांच्या बाळाला सोडून पूजा गेली कुठे? असा प्रश्न समोर आला आहे.
महिलांचा शोध पोलिसांना लागत नाही आहे
पुणे शहरात महिला मिसिंग होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या महिलांचा शोध पुणे पोलिसांना लागत नसल्याची माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून 840 महिला गायब झाल्या होत्या. तर 2024 मध्ये अल्पवयीन मुलींसह तरुण आणि तरुणीही गायब होत झाल्याने खळबळ उडाली होती. विविध पोलीस ठाण्यात या मिसिंगच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या अशी देखील माहिती समोर येत आहे.महिला, मुली या बेपत्ता होण्याचे कारण काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्वातंत्र्यदिनी ८ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; घटनेने नागरिकांमध्ये संताप, आरोपीचे हॉटेल फोडले
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचे हॉटेल फोडले आहे. एकीकडे देश स्वातंत्र दिन साजरा करत होता तर दुसरीकडे शिरपूर तालुक्यात ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार होत होता. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे (वय 28, व्यवसाय – हॉटेल) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती पसरताच संतप्त नागरिकांनी आरोपी अनिल काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली.
पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी