(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द बंगाल फाइल्स’ (The Bengal Files) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवरून कोलकातामध्ये (Kolkata) बराच गोंधळ झाला. ट्रेलर लाँचचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने विवेक अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त करत थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्याचा कार्यक्रम सुरुवातीला दुपारी १२ वाजता नियोजित होता, परंतु नंतर तो एक तास उशिरा सुरू झाला. कार्यक्रमादरम्यान गोंधळ वाढल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि कार्यक्रम थांबवावा लागला. विवेक अग्निहोत्री यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आणि ‘द बंगाल फाइल्स’च्या प्रदर्शनावर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला.
विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “मी अमेरिकेतून कोलकाता विमानतळावर पोहोचताच मला सांगण्यात आले की, ‘द बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स चेनने राजकीय दबावामुळे आणि संभाव्य राजकीय तणावामुळे कार्यक्रम घेण्यास नकार दिला. आम्ही दुसऱ्या एका मल्टिप्लेक्सशी संपर्क साधला, पण त्यांनीही तोच राजकीय दबाव असल्याचं कारण दिलं. हे आम्हाला आधीच कळलं असतं, तर आम्ही एवढ्या टीमला आणि कलाकारांना घेऊन इथे आलोच नसतो.”
#WATCH | West Bengal | A ruckus erupted during the release of ‘The Bengal Files’ trailer in Kolkata today. Actor Pallavi Joshi alleges the trailer launch was not allowed.
Actor Pallavi Joshi says, ” I absolutely did not like the way my film was stopped. Is there freedom of… pic.twitter.com/nKC3ACIV7a
— ANI (@ANI) August 16, 2025
विवेक अग्निहोत्री यांनी पुढे म्हटले की, “जेव्हा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट बंगालवर आधारित आहे, तेव्हा त्याचा ट्रेलर बंगालमध्येच लाँच व्हायला पाहिजे. मी हार मानणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे आम्ही थिएटर ऐवजी एका हॉटेलच्या बॅंक्वेट हॉलमध्ये ट्रेलर लाँच केला. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की आमचा आवाज का दाबला जात आहे?”
विवेक अग्निहोत्री यांनी प्रशासनाला प्रश्न विचारला की ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला परवानगी का दिली नाही? ते म्हणाले, “माझ्या विरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत आणि हे काम सत्ताधारी पक्षाचे सदस्य करत आहेत. कोलकाताच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आम्ही या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हा धमकी दिली होती की ‘द बंगाल फाइल्स’ला इथे प्रवेश करू दिला जाणार नाही. “सरकार कशाला घाबरत आहे? या चित्रपटात असा कोणता मुद्दा आहे?”
अनुपम खेर हे ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटात महात्मा गांधींची (Mahatma Gandhi) भूमिका साकारत आहेत. लूक शेअर करताना त्यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली. ‘काही पात्रे तुम्हाला आतून, तुमच्या विचारसरणीतून आणि सवयींमधून बदलतात. गांधीजींचे पात्र त्यापैकीच एक आहे,’ असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.
त्यांनी शेअर केलेल्या चित्रात, अनुपम खेर यांचा लूक अगदी महात्मा गांधींसारखा दिसत आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रोस्थेटिक्सचा (Prosthetics) वापर केला गेला नाही. या चित्राच्या पार्श्वभूमीत श्रेया घोषाल यांनी गायलेले ‘वैष्णव जन’ हे भजन आहे, ज्याला ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे. अनुपम खेर यांचा हा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे.