Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News today Live: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेचा मोठा दणका

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता या रुग्णालयाच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनावर बंदी घालण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 09, 2025 | 04:56 PM
Top Marathi News today Live: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेचा मोठा दणका
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates-  मिळकत कराची थकबाकी असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास महापालिकेने जप्तीची नोटीस पाठविली आहे. मिळकत कराचे २२ कोटी रुपये दोन दिवसांत जमा करावी अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असे या नोटीस मध्ये नमूद केले आहे. गर्भवती महीलेच्या मृत्युमुळे पुणेकरांच्या संतापाला सामोरे जावे लागलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला आता महापालिकेने दणका दिला आहे.

The liveblog has ended.
  • 09 Apr 2025 03:11 PM (IST)

    09 Apr 2025 03:11 PM (IST)

    PCMC मध्ये रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याबाबत नोटीस

    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारापूर्वी ऍडव्हान्ससाठी मुजोरी दाखवली अन तनीषा भिसेंचा यात बळी गेला. यानंतर पिंपरी चिंचवड पालिका देखील खडबडून जागी झाली आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने 650 रुग्णालयांना नोटिसा धाडल्या आहेत. कोणत्याच रुग्णांकडून ऍडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल. असा इशारा पालिकेने या नोटीसीद्वारे दिलाय.

  • 09 Apr 2025 02:35 PM (IST)

    09 Apr 2025 02:35 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 26 ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर

    कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार 26 ग्रामपंचायती सरपंच आरक्षण पदाची सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 514 ग्रामपंचायतींवर महिलाराज आले असून, सरपंचपदासाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यात आरक्षण सोडत काढण्यात आले. आपल्याला अपेक्षित असलेला आरक्षण न पडल्याने काही इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी पडले तर अपेक्षित आरक्षण मिळाल्याने अनेकांच्या उत्साहाला उधाण आले होते. जिल्ह्यातील 1 हजार 26 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण पदाची सोडत 12 तालुक्यात काढण्यात आली.

  • 09 Apr 2025 12:39 PM (IST)

    09 Apr 2025 12:39 PM (IST)

    बीडमध्ये तीन गायरान धारकांकडून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

    बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे तीन गायरान धारकांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित धारकांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले असून, त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचेही नाव घेतले आहे. सध्या गायरानधारकांना जमिनीवरून बेदखल करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे.

  • 09 Apr 2025 12:28 PM (IST)

    09 Apr 2025 12:28 PM (IST)

    सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

    बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीविरुद्ध ठोस आणि महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. तब्बल एक हजार पानांच्या या आरोपपत्रात फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाचा उल्लेख करण्यात आला असून, त्यात सैफ अली खानच्या शरीरातून सापडलेला चाकूचा तुकडा आणि आरोपींकडून जप्त करण्यात आलेला चाकू याचे तुकडे एकाच शस्त्राचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    वाचा सविस्तर- 

  • 09 Apr 2025 11:51 AM (IST)

    09 Apr 2025 11:51 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिराशी संबंधित १३ पुजारी ड्रग्ज तस्करी प्रकरणात

    तुळजापूर येथे समोर आलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिराशी संबंधित तब्बल १३ पुजाऱ्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संबंधितांची नावेही तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत. या प्रकरणातील एकूण ३५ आरोपींपैकी २१ जण अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा प्रकार समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील श्रद्धेचे प्रतीक असलेल्या तुळजाभवानी मंदिराशी संबंधित व्यक्तींचा अशा गुन्हेगारी प्रकरणात सहभाग आल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

  • 09 Apr 2025 11:50 AM (IST)

    09 Apr 2025 11:50 AM (IST)

    रेपो दरात कपात होऊनही शेअर बाजार घसरला

    आरबीआयच्या चलनविषयक धोरणाच्या घोषणेनंतर, निफ्टी १५६ अंकांनी घसरून २२३७९ वर व्यवहार करत आहे. निफ्टी नेक्स्ट ५० सुमारे १ टक्क्यांनी खाली आहे. बँक निफ्टी देखील ०.८२ टक्क्यांनी घसरला आहे. वित्तीय सेवा शेअर्स देखील लाल रंगात आहेत आणि निर्देशांक ०.९८ टक्क्यांनी घसरला आहे. मातीचा थर १.५५ टक्के तुटला आहे. स्मॉल कॅप १.६० टक्क्यांनी घसरला आहे. एफएमसीजी निर्देशांक १.२९ टक्क्यांनी वाढला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स सुमारे दोन टक्क्यांनी घसरले आहेत. धातू निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

  • 09 Apr 2025 11:41 AM (IST)

    09 Apr 2025 11:41 AM (IST)

    LPG सिलेंडरनंतर आता CNG-PNG मध्ये झाली वाढ

    लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात पार पडली. या निवडणुकांच्या पूर्वी घरगुती गॅस सिलेंडर असो किंवा सीएनजी-पीएनजी यांच्या दरात कोणतीही वाढ केली गेली नाही. मात्र, आता या दोन्ही निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वसामान्यांना जोरदार झटका दिला आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

  • 09 Apr 2025 11:04 AM (IST)

    09 Apr 2025 11:04 AM (IST)

    26/11 चा दोषी तहव्वुर राणाला आज भारतात आणण्याची तयारी

    मुंबईवरील 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. अमेरिकेतील न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली असून, त्याला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. दिल्ली आणि मुंबईतील तुरुंगांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

  • 09 Apr 2025 10:24 AM (IST)

    09 Apr 2025 10:24 AM (IST)

    ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाशी निगडित ९ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.  यासोबतच प्रशासनिक बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने ५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. वाचा सविस्तर- 

  • 09 Apr 2025 09:26 AM (IST)

    09 Apr 2025 09:26 AM (IST)

    पुण्यात परदेशी तरूणीवर लैंगिक अत्याचार

    पुण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. भूतानमधून आलेल्या २७ वर्षीय परदेशी महिलेवर सात जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही महिला २०२० पासून पुण्यात वास्तव्यास होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी शंतनु कुकडे आणि त्याचे सहा साथीदार आरोपी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. वाचा सविस्तर-

  • 09 Apr 2025 09:22 AM (IST)

    09 Apr 2025 09:22 AM (IST)

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये टेन्शन वाढणार?

    बिहारचे प्रसिद्ध माजी आयपीएस अधिकारी व ‘सिंघम’ अधिकारी अशी ओळख असलेले शिवदीप लांडे यांनी मंगळवारी राजकारणात प्रवेश केला. लांडे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसून, त्यांनी स्वत:चा नवीन राजकीय पक्ष ‘हिंद सेना’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन लांडे यांनी ही माहिती दिली. वाचा सविस्तर-

  • 09 Apr 2025 09:21 AM (IST)

    09 Apr 2025 09:21 AM (IST)

    अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना अक्षरश: झापलचं

    गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगलेच चर्चेत आहेत.  एका सभेत  शेतकऱ्याने कर्जमाफीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, "तुम्ही ती रक्कम लग्न आणि इतर समारंभांसाठी वापरता," असे धक्कादाय विधान त्यांनी  केले होते. कोकाटेंच्या या विधानामुळे चारही बाजूंनी त्यांच्यावर टीका होऊ लागली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटेंच्या या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.  त्यानंतर काल पुन्हा एकदा अजित पवार यांनी भर बैठकीत माणिकराव कोकाटेंना झापल्याची माहिती पुढे आली आहे. वाचा सविस्तर- 

  • 09 Apr 2025 09:03 AM (IST)

    09 Apr 2025 09:03 AM (IST)

    संजय राऊतांसह सहा जणांवर ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी

    शिवसेना ठाकरे गटाकडू सजंय राऊत  आणि अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनिल परब, सुषमा अंधारे, अंबादास दानवे यांच्यावरही प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • 09 Apr 2025 08:39 AM (IST)

    09 Apr 2025 08:39 AM (IST)

    माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची प्रकृती खालावली

    काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी अहमदाबादमध्ये आलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (वय ७५) यांना प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साबरमती आश्रमात फेरफटका मारताना उष्णतेचा त्रास झाल्यामुळे ते बेशुद्ध पडले. मिळालेल्या माहितीनुसार, कडक उन्हामुळे चिदंबरम यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही वेळातच ते बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले. मंगळवारी अहमदाबादमधील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

Web Title: Marathi breaking news today live updates political crime national sports viral entertainment technology economics news nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • Breaking News

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: ‘…तर तुमचं राजकीय करिअर बर्बाद होईल’; मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
1

Top Marathi News Today: ‘…तर तुमचं राजकीय करिअर बर्बाद होईल’; मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

पाकिस्तानच्या Jaffar Express मध्ये बॉम्ब ब्लास्ट, ट्रेनचे 6 डबे रूळावरून घसरले
2

पाकिस्तानच्या Jaffar Express मध्ये बॉम्ब ब्लास्ट, ट्रेनचे 6 डबे रूळावरून घसरले

Top Marathi News Today: चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपची प्रथमच एकहाती सत्ता
3

Top Marathi News Today: चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपची प्रथमच एकहाती सत्ता

Top Marathi News Today: राज ठाकरें म्हणाले ‘डुबे डुबे के मारेंगे’; निशिकांत दुबेंचं फक्त एका वाक्यात प्रत्युत्तर!
4

Top Marathi News Today: राज ठाकरें म्हणाले ‘डुबे डुबे के मारेंगे’; निशिकांत दुबेंचं फक्त एका वाक्यात प्रत्युत्तर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.