Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: राज ठाकरें म्हणाले ‘डुबे डुबे के मारेंगे’; निशिकांत दुबेंचं फक्त एका वाक्यात प्रत्युत्तर!

Marathi breaking live marathi headlines update 09 Jan 2025: आज 19 जुलै फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 19, 2025 | 07:25 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : महाराष्ट्रात भाषेवरून राजकारण शिगेला पोहोचले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच आहे. भाजप खासदाराच्या ‘पटाक-पटाक कर मारेंगे’ या विधानाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी ‘डुबे डुबे के मारेंगे’ असे म्हटले. यावर निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंवर टीका करताना म्हटले, “तुम्ही मला हिंदी शिकवली का?” अलीकडेच एका दुकानदाराला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण करण्यात आली होती, ज्यावर निशिकांत दुबे यांनी “पटाक-पटाक के मारेंगे” असे म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे बराच वाद निर्माण झाला होता.

The liveblog has ended.
  • 19 Jul 2025 06:55 PM (IST)

    19 Jul 2025 06:55 PM (IST)

    Eknath Shinde: "मी कोणाला छेडत नाही पण..."; एकनाथ शिंदेंचा उबाठाला निर्वाणीचा इशारा

    मुंबई: बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला आज दिला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. भरलेल्या ताटाचे विचारता पण जनतेच्या मतांची माती कोणी केली, देवेंद्रजींच्या पाठित खंजीर कोणी खुपसला, असे प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उबाठाला केले.

  • 19 Jul 2025 06:22 PM (IST)

    19 Jul 2025 06:22 PM (IST)

    थोपटे, जगतापांच्या प्रवेशामुळे बारामती मतदारसंघात भाजपची ताकद वाढली; सुप्रिया सुळेंसमार असणार आव्हान

    बारामती/अमोल तोरणे:  भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसची सोडचिट्टी घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाठोपाठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी देखील भाजपचे मांडलिकत्व स्वीकारल्याने बारामती लोकसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे, त्यातच जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती प्रवीण माने देखील भाजपमध्ये गेले आहेत. भाजपचा बारामती लोकसभा मतदारसंघातील वाढलेला जनाधार खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

  • 19 Jul 2025 06:01 PM (IST)

    19 Jul 2025 06:01 PM (IST)

    धक्कादायक! नरेशवाडी बालसुधारगृहातून १५ वर्षीय मुलाचा अपहरण

    तलासरी तालुक्यातील नरेशवाडी येथील गिरीवनवासी प्रगती मंडळ मुलामुलींच्या बालसुधारगृहातून एक १५ वर्षीय बालक फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना समूपदेशक अर्जून राजेश पाटील यांच्या कायदेशीर देखरेखीखाली घडली असून, या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 19 Jul 2025 05:59 PM (IST)

    19 Jul 2025 05:59 PM (IST)

    Plane Emergency Landing: फ्लाईटने उड्डाण भरले अन् आकाशात….; हैद्राबादमध्ये नेमके घडले तरी काय?

    हैद्राबाद: हैद्राबादमध्ये एअर इंडिया एक्सप्रेच्या फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हैद्राबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनलवर ही घटना घडली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे हैद्राबादवरुन थायलंडला जाणारे विमान रद्द करण्यात आले आहे. थायलंडला जाण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईटने उड्डाण भरले होते. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट पुन्हा हैद्राबाद एअरपोर्टवर लँड करण्यात आले.

  • 19 Jul 2025 05:48 PM (IST)

    19 Jul 2025 05:48 PM (IST)

    ‘आप’ला मोठा धक्का! आमदार अनमोल गगन मान यांचा राजीनामा, राजकारणही सोडले

    आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या आणि पंजाबमधील आमदार अनमोल गगन मान यांनी आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी केवळ विधानसभेचा राजीनामा दिला नाही तर राजकारणातून पूर्णपणे निवृत्तीची घोषणा केली आहे. हा निर्णय पक्ष आणि पंजाबच्या राजकारणासाठी एक मोठी बातमी मानला जातो. त्या पूर्वी आमदार म्हणून खरार विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या.

  • 19 Jul 2025 05:42 PM (IST)

    19 Jul 2025 05:42 PM (IST)

    पंड्याचा पुन्हा Heartbreak! आता जास्मिननेही सोडली साथ; दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो..

    प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या काही ना काही कारणाने चर्चेत असतो. तो कधी क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीने चर्चेत येतो वा त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येतो. मागील वर्षी हार्दिक पांड्याचा मॉडेल नताशा स्टँकोविकसोबत घटस्फोट झाला होता. तर आता मात्र त्याचे हर्ट ब्रेक झाल्याची बातमी समोर आली आहे. ब्रिटिश-भारतीय गायिका जस्मिन वालिया आणि हार्दिक पंड्या यांच्यातील दुराव्याची बातमी समोर आली आहे.हार्दिक पंड्या आणि स्मिन वालिया या दोघांचे ब्रेक अप झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीचा हा शेवट झाला कि काय? अशी चर्चा आता तोंड वर काढत आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 19 Jul 2025 05:20 PM (IST)

    19 Jul 2025 05:20 PM (IST)

    Uddhav Thackeray News: ‘..तर सोबत राहण्यात काहीच अर्थ नाही’; उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

    Uddhav Thackeray News:  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या समन्वयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीने चांगली कामगिरी केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील विलंबामुळे पराभव पत्करावा लागला, आपल्याला चुका दुरुस्त कराव्या लागतील. भविष्यात अशा चुका होत राहिल्या तर एकत्र राहण्यात काही अर्थ नाही.” असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.

  • 19 Jul 2025 05:07 PM (IST)

    19 Jul 2025 05:07 PM (IST)

    भारतात Maruti Suzuki eVitara केव्हा होणार लाँच?

    देशात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. Maruti Suzuki ही त्यातीलच एक कंपनी. आता हीच कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा दमदार कार ऑफर करणार आहे. मारुती सुझुकी येत्या 3 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही, eVitara लाँच करणार आहे. ही कार गुजरातमधील सुझुकी मोटर प्लांटमध्ये तयार केली जात आहे आणि नेक्सा शोरूमद्वारे विकली जाणार आहे.

  • 19 Jul 2025 04:51 PM (IST)

    19 Jul 2025 04:51 PM (IST)

    पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! अमेरिकेकडून ‘TRF’वर मोठी कारवाई

    पाकिस्तानच्या द रेझिस्टंट फ्रंड (TRF) या दहशतवादी संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून अमेरिकेने घोषित केले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळ उडाला आहे. याशिवाय पाकिस्तानला त्याच्या मित्र राष्ट्राकडून म्हणजेचे चीनकडूनही मोठा झटका मिळाला आहे. चीनने देखील अमेरिकेच्या या निर्णयाचे अप्रत्यक्षपण समर्थन केले आहेत. तसेच पहलगाम हल्ल्याचा देखील निषेध केला आहे. लष्कर-ए-तैयबा (TRF) ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे. भारताच्या जम्मू आणि काश्मीरधील पहलगाम हल्ल्यानंतर या दहशतवादी संघटनेचे नाव पुढे आले होते. अमेरिकेने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. यानंतर पाकिस्तानने या संघटनेशी कोणतेही संबंध असल्याचे नाकारले आहे.

  • 19 Jul 2025 04:30 PM (IST)

    19 Jul 2025 04:30 PM (IST)

    2026 Suzuki GSX-8R झाली लाँच, मिळणार ॲडव्हान्स फीचर्स

    नुकतेच सुझुकीने देशात त्यांच्या मध्यम-वजनाच्या सुपरस्पोर्ट बाईक GSX-8R चे 2026 मॉडेल ग्लोबल लेव्हलवर सादर केले आहे. यावेळी कंपनीने बाईकच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे याचा परफॉर्मन्स आणि रायडरचा आराम दोन्ही सुधारतात. यासोबतच, कंपनीने त्यांच्या लोकप्रिय बाईक आणि स्कूटर जसे की GSX-8S, SV650 ABS, GSX-R750, DR650S आणि Burgman 400 देखील अपग्रेड केल्या आहेत.

  • 19 Jul 2025 04:27 PM (IST)

    19 Jul 2025 04:27 PM (IST)

    ‘ही बॅटरी लवकरच संपणार कारण…’; पुण्यात पोस्टरबाजी करत शिवसेनेची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

    पुणे/Aditya Thackeray Vs Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला. शिवसेना फुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आज शिवसेनेने पुण्यात पोस्टरबाजी करत आमदार आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. पुण्यात शिवसेनेने लावलेले हे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यावर हे पोस्टर लावण्यात आले आहे.

  • 19 Jul 2025 04:19 PM (IST)

    19 Jul 2025 04:19 PM (IST)

    टीम इंडियाला झटका! इंग्लंडहून मायदेशी परतला ऋतुराज गायकवाड

    टीम इंडिया सद्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दरम्यान भारताचे अनेक खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत इंग्लंड संघाने आघाडी घेतली आहे. अशातच एका भारतीय खेळाडूने वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. आपण इंडियन प्रीमियर लीग मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतुराजबद्दल बोलत आहोत. ऋतुराज इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार नाही. ऋतुराज गायकवाडने यॉर्कशायरशी ५ सामन्यांचा करार केला होता आणि २२ जुलै रोजी तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण देखील करणार होता. परंतु, त्याआधीच आता त्याने या स्पर्धेतून त्याने माघार घेतली आहे. वैयक्तिक कारण असल्याचे सांगत ऋतुराज गायकवाडने स्पर्धेतून माघार घेतली आहे. या निर्णयामुळे यॉर्कशायरला मोठा झटका बसला आहे.

  • 19 Jul 2025 04:11 PM (IST)

    19 Jul 2025 04:11 PM (IST)

    माणगांवच्या खांदाड गावात वस्तीनजीक आढळून आले दुर्मिळ खवले मांजर

    माणगावच्या खांदाड गावातील जंगलपरिसरात दुर्मिळ असं खवले मांजर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  या खवले मांजरला पाहण्यासाठी नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली.

  • 19 Jul 2025 03:28 PM (IST)

    19 Jul 2025 03:28 PM (IST)

    तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर कधी होणार ?

    रायगडमधील तळा अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलला लागूनच डम्पिंग ग्राऊंड आहे. त्यामुळे  तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर होणार तरी कधी असा प्रश्न आता शहर वासीयांकडून उपस्थित केला जात आहे.तळा नगरपंचायतीने डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था मालकीच्या तळा धरणाजवळ केली आहे.शहरातील सर्व गोळा केलेला ओला व सुका कचरा एकत्रित या ठिकाणी टाकला जातो.मात्र या डम्पिंग ग्राऊंड सभोवती संरक्षक भिंत न बांधल्यामुळे मोकाट गुरे,कुत्रे व पक्षांनी तो पसरला जात आहे.यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते जवळच तहसिल कार्यालय असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो.

  • 19 Jul 2025 03:19 PM (IST)

    19 Jul 2025 03:19 PM (IST)

    लोधिवली पाझर तलावात मौजमजा करण्यासाठी आलेल्या मित्रांतील एकाचा बुडून मृत्यु

     

    खालापूर पोलीस ठाणे अंतर्गत चौक पोलिस दुरक्षेत्र हद्दितील लोधिवली येथील पाझर तलावात मौजमजा करण्यासाठी दहा ते बारा मित्रांचा ग्रुप आला होता.तलावात पोहण्याचा मोह चेंबुर येथील सुनिल मोरे याला आवरता न आल्याने तो पाण्यात पोहण्यासाठी गेला.यावेळी सुनिलला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाल्याने मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार 17 जुलै 2025 रोजी दुपारी घडली.

  • 19 Jul 2025 03:12 PM (IST)

    19 Jul 2025 03:12 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांची अहिल्यानगरमध्ये बैठक

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट ला मुंबईकडे भव्य मोर्चाद्वारे जाणार आहेत. मुंबईतील मोर्चासाठी सद्या राज्यभर समाज बांधवांकडून बैठकांचा धडाका सुरु असून अनेक बैठकांना स्वतः जरांगे पाटील उपस्थित राहून समाजाला मार्गदर्शन करीत आहेत. काल रात्री अहिल्यानगर शहराच्या जवळ असलेल्या बुरुडगाव येथे मराठा आरक्षण संदर्भात घोंगडी बैठक घेण्यात आली. या बैठकीला मनोज जरांगे पाटील उपस्थित झाले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधवही उपस्थित होते. महिलांनी औक्षण करून अहिल्यानगरीत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या बांधवांना 29 ऑगस्ट च्या मुंबईतील आंदोलना संदर्भात मार्गदर्शन केले.

  • 19 Jul 2025 03:09 PM (IST)

    19 Jul 2025 03:09 PM (IST)

    राणेंनी एकदा महामार्गावरुन प्रवास करावाच

    खासदार नारायण राणे यांनी गणेशोत्सवाच्या पूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थितीत होईल असे म्हटले होते, यावर बोलताना ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना उपरोधिक सल्ला देताना म्हटले आहे की, राणेंनी गाडी काढून महामार्गावरून प्रवास करून बघावा. राणेंनी आपल्या मतदारसंघातील लांजा, पाली, संगमेश्वर येथे जाऊन रस्त्याची काय अवस्था आहे ती पहावी. गेली कित्येक वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. रायगडमध्ये तर गेल्या २० वर्षापासून महामार्ग रखडलेला आहे. या महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना अनेक वेळा भेटून सांगितले आहे. गडकरींनी सुद्धा एकदा तरी रस्त्याने प्रवास करून बघावा, असा उपरोधिक सल्ला विनायक राऊत यांनी मंत्री गडकरी यांनाही दिला आहे. हा महामार्ग कोकणवासीयांसाठी नाही तर ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी असल्याची टीका राऊत यांनी करताना रत्नागिरी जिल्ह्यात तर गाड्या चालण्यासारखा महामार्ग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 19 Jul 2025 03:03 PM (IST)

    19 Jul 2025 03:03 PM (IST)

    अलिबाग वडखळ मार्गावरील वाहतूक मंदावली

    शनिवारी सकाळपासूनच अलिबाग वडखळ मार्गावरील वाहतूक व्यवस्था मंदावून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, जागोजागी वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित न राहता केवळ पेझारी नाक्यावर एक वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर कार्लेखिंड तीनवीरा, पळी, पेझारी, पोयनाड, पांडवादेवी, शहाबाद, धरमतर पूल व धरमतर चेकपोस्ट ते वडखळ पर्यंत ट्रॅफिक जॅम होऊन वाहतूक मंदावली आहे. या समस्येबाबत , वाहन चालक, प्रवाशांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

  • 19 Jul 2025 02:53 PM (IST)

    19 Jul 2025 02:53 PM (IST)

    कर्जत शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार ?

    शहरातील सर्व रस्त्यांवर आणि नेरळ तसेच कशेळे या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत असून त्यावर मात करण्यासाठी पोलीस विभागाला सर्वाधिकार असतील. त्यावेळी माझा मुलगा जरी वाहतुकीचे नियम तोडल्याचे आढळून आल्यास कारवाई करावी अशी सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी आयोजित बैठकीत केली.

  • 19 Jul 2025 02:40 PM (IST)

    19 Jul 2025 02:40 PM (IST)

    एलए २८ क्रिकेट स्पर्धेसाठी आयसीसीकडून विचारमंथनाला सुरवात

    Olympics 2028 : आयसीसीकडून लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ साठी काम सुरू करण्यात आले आहे. आयसीसी लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ साठी एक नवीन कार्यगट तयार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. जो जगातील महत्त्वाचे प्रश्न सोडवणार आहे. शुक्रवारी सिंगापूरमध्ये पार पडलेल्या मुख्य कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. आयसीसीचे नवे सीईओ संजोग गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. तर आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या पदाच्या औपचारिक भूमिकेत भाग घेतला होता.

  • 19 Jul 2025 02:40 PM (IST)

    19 Jul 2025 02:40 PM (IST)

    स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा रवाळ कलाकंद

    श्रावण महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. श्रावणात नेहमीच काहींना काही गोड पदार्थ बनवले जातात. तांदळाची खीर, शेवयांची खीर, रसमलाई, साबुदाणा खीर इत्यादी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी स्वयंपाक घरातील तीन पदार्थांचा वापर करून रवाळ कलाकंद बनवू शकता. मिठाईच्या बॉक्समधील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कलाकंद. कलाकंद तुम्ही इतर कोणताही गोड पदार्थ बनवताना वापरू शकता. मात्र नेहमीच बाजारातून विकत आणलेला आणि प्रक्रिया करून तयार केलेला कलाकंद खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कलाकंद बनवू शकता. हा कलाकंद बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी.

  • 19 Jul 2025 02:39 PM (IST)

    19 Jul 2025 02:39 PM (IST)

    शमीच्या वनस्पतीची पूजा केल्याने कुंडलीमधील शनि दोष होईल दूर

    धर्मामध्ये काही वनस्पतींना महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. यामध्ये तुळशी, बेलपत्र, केळी, पिंपळ आणि शमी इत्यादी वनस्पती यांचा समावेश होतो. त्यासोबतच शनि ग्रहाचा संबंध पिंपळ आणि शमी वनस्पतीशी असल्याचे मानले जाते. मान्यतेनुसार या दोन्ही वनस्पती शनि देवाच्या प्रभावाखाली असतात. त्यामुळे या वनस्पतीची पूजा केल्याने शनि देव प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. पिंपळाचे झाड खूप मोठे असते त्यामुळे ते घरामध्ये लावता येत नाही मात्र शमी वनस्पती घरामध्ये लावता येते. यामुळे कुंडलीतील वास्तूदोष दूर होतोच त्याचबरोबर कुंडलीतील दोषांपासूनही मुक्तता मिळू शकते. शमी वनस्पतीची पूजा कशी केली जाते, पूजा करण्याचे काय फायदे आहेत, जाणून घ्या

  • 19 Jul 2025 02:39 PM (IST)

    19 Jul 2025 02:39 PM (IST)

    ‘King’ च्या सेटवर अभिनेता शाहरुख खान जखमी

    अभिनेता शाहरुख खान जखमी झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अनेक माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की अभिनेता त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाला. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एका अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते, त्यानंतर त्याला उपचारासाठी अमेरिकेत नेण्यात आले. चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे आणि पुढील वेळापत्रक आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, असेही वृत्तात म्हटले आहे. तसेच, या बातमीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या टीमने यावर कोणतेही विधान केलेले नाही.

  • 19 Jul 2025 02:38 PM (IST)

    19 Jul 2025 02:38 PM (IST)

    देशाच्या माजी लष्करी अधिकाऱ्याच्या या दाव्याने उडाली खळबळ

    वॉशिंग्टन : अमेरिकेला जगातील सर्वा शक्तीशाली लष्करी देश म्हणून ओळखले जाते. हा देश जगभरातील अनेक देशांना शस्त्रांची मदत पुरवतो. परंतु अमेरिकाला आता शस्त्रास्त्रांचा पुरवठा कमी पडत आहे. अमेरिकेचे माजी लष्कर अधिकारी कर्नल आणि पेंटागॉनचे माजी सल्लागार डग्लस मॅकग्रेगर यांनी यासंदर्भात मोठा दावा केला आहे. डग्लस मॅकग्रेगर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका युद्धभूमीत उतरल्यास केवळ ८ दिवस टिकू शकेल. यानंतर अमेरिकेकडे केवळ अण्वस्त्रांचा पर्याय राहिल.

  • 19 Jul 2025 02:37 PM (IST)

    19 Jul 2025 02:37 PM (IST)

    अमराठी नागरिकांकडून राज ठाकरेंविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

    Marathi-hindi Controversy: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि मनसे कार्यकर्त्यांकडून कथितपणे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली असून, यामध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 19 Jul 2025 02:34 PM (IST)

    19 Jul 2025 02:34 PM (IST)

    AI फीचर्सवाला बजेट फ्रेंडली iPhone स्वस्तात खरेदी करण्याची संधी

    टेकजायंट कंपनी Apple ने अलीकडेच त्यांचा स्वस्त आयफोन iPhone 16e लाँच केला आहे. ज्यांना आयफोन खरेदी करायचा पण बजेट कमी आहे, अशा लोकांसाठी हा स्वस्त आयफोन लाँच करण्यात आला आहे. iPhone 16e अनेक Apple Intelligence फीचर्सने सुसज्ज आहेत. असा हा बजेट आयफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Apple Intelligence फीचर्सने सुसज्ज असलेला हा बजेट मॉडेल iPhone 16e तुम्हाला आता आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • 19 Jul 2025 02:33 PM (IST)

    19 Jul 2025 02:33 PM (IST)

    पाकिस्तानी खेळाडूंची जुनी सवय! आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा केलं अपमानास्पद

    पाकिस्तान विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ चा सामना पार पडला. या सामन्यात विजय मिळवुन स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. या स्पर्धेचे आयोजन इंग्लडमध्ये करण्यात आले आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये 20 जुलै रोजी सामना खेळवला जाणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सने दमदार सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात, मोहम्मद हाफीजच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान चॅम्पियन्सने इंग्लंड चॅम्पियन्सचा ५ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान, पाकिस्तान संघ पुन्हा एकदा लाजिरवाणा झाला आहे. पाकिस्तानच्या डावात, फलंदाज उमर अमीनच्या धावबादने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

  • 19 Jul 2025 01:55 PM (IST)

    19 Jul 2025 01:55 PM (IST)

    चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना तीन महिला भाविक बुडाल्या

    पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिलांचा तर एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. सुनिता सपकाळ आणि संगीता सपकाळ अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं आहेत. तर एका महिलेबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी या महिला भक्त पुंडलिकाजवळ आल्या होत्या. उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या महिला नदीत बुडाल्या.

  • 19 Jul 2025 01:45 PM (IST)

    19 Jul 2025 01:45 PM (IST)

    Asia Cup 2025 बाबत मोठी अपडेट, BCCI या कारणामुळे स्पर्धेवर बहिष्कार टाकणार

    चॅम्पियन ट्राॅफीच्या यजमानपदावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होत्या. पण भारताचा संघाने त्याचे सर्व सामने हे दुबइमध्ये खेळवण्यात आले होते. आता नवा वाद समोर आला आहे. आशिया कप सप्टेंबर २०२५ मध्ये होणार आहे. तथापि, त्यात भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे. आशिया क्रिकेट परिषदेची बैठक २४ जुलै २०२५ रोजी बांगलादेशातील ढाका येथे होणार आहे. तथापि, बीसीसीआयने या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे आणि जर ठिकाण बदलले नाही तर ते आशिया कपवर बहिष्कार टाकतील असे म्हटले आहे.

  • 19 Jul 2025 01:38 PM (IST)

    19 Jul 2025 01:38 PM (IST)

    …तर संघटनेचा शेवट होईल’, ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना पुन्हा धमकी

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या निर्णयांनी जगाला हादरवून टाकतात. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ‘जीनियस अक्ट’ निर्णयाने ब्रिक्स देशांना धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना पुन्हा एकदा धमकी दिली. त्यांनी शुक्रवारी त्यांनी ‘जीनियस अक्ट’ कायदेशीर स्वाक्षरी करत ब्रिक्स देशांना (रशिया, भारत, ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका देशांना १०% कर लादण्याची धमकी दिली आहे. हे देश डॉलरलचे जागतिक वर्चस्व संपुष्टात आणत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

  • 19 Jul 2025 01:30 PM (IST)

    19 Jul 2025 01:30 PM (IST)

    चाहत्यांची प्रतीक्षा संपणार! रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच खेळणार

    भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेट मधून त्याचबरोबर t20 क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही आता फक्त एकदिवसीय क्रिकेट सामने खेळताना दिसणार आहेत. चॅम्पियनशिप झाल्यानंतर दोन्ही दिग्गज हे अजून पर्यंत खेळताना दिसले नाही. भारतीय क्रिकेटच्या हाताने या दोघांना एकत्र मैदानावर पाहण्याचे उत्सुकता लागली आहे.

  • 19 Jul 2025 01:20 PM (IST)

    19 Jul 2025 01:20 PM (IST)

    तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाकडून गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना निलंबित

    तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने चार कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. हिंदू धार्मिक संस्थेत नोकरी करूनही त्यांनी ख्रिश्चन धर्माचे पालन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, जो ट्रस्टच्या संस्थात्मक आचारसंहितेचे उल्लंघन मानला जात होता,अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानमकडून देण्यात आली आहे.याप्रकरणी टीटीडी प्रशासनाने सांगितले की, दक्षता अहवाल आणि अंतर्गत चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी हिंदू धार्मिक संस्थेत काम करताना अपेक्षित धार्मिक आचरणाचे पालन केले नाही असे ट्रस्टचे म्हणणे आहे.

  • 19 Jul 2025 12:59 PM (IST)

    19 Jul 2025 12:59 PM (IST)

    भाजप नेत्याच्या कार्यालयाचा गुजरातीतील फलक आता मराठीत

      राज्यात हिंदी मराठी भाषा वाद चिघळ्याने दिवसेंदिवस राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता  नवी मुंबईतील सिवूडमध्ये गुजराती भाषेतील पाटीमुळे या वादामध्ये पुन्हा ठिणगी पडली होती. दरम्यान   मनसेने  24 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर  आता भाजपच्या विरेंद्रसिंह जाडेजा यांच्या  कार्यालयाचा गुजराती फलक आता मराठीत लावण्यात आला आहे.

  • 19 Jul 2025 12:55 PM (IST)

    19 Jul 2025 12:55 PM (IST)

    24 तारखेला चक्काजाम आंदोलन: बच्चू कडू यांचा इशारा

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे नेते, बच्चू कडू यांनी येत्या 24 तारखेला चक्काजामचा इशारा सरकारला दिला आहे. कर्जमाफी संदर्भात सरकार जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही, कर्जमाफीची तारीख सांगत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन हे सुरूच राहणार, असे बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले.

  • 19 Jul 2025 12:47 PM (IST)

    19 Jul 2025 12:47 PM (IST)

    बीडमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेसाठी धोकादायक प्रवास

    बीडच्या धारूर तालुक्यातील धुनकवाड येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करत जावे लागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. धुनकवाड येथील भंडारे वस्तीवर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दीड किलोमीटरचे अंतर डोंगराळ भागातून मार्ग काढत पार करावे लागत आहे. पाऊस झाल्यावर या मार्गावर ओढा असल्याने ओढ्याला पाणी आल्यास या विद्यार्थ्यांना शाळेत देखील जाता येत नाही. कुठलीही दुर्घटना होण्याआधी या याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी धनुकवाड येथील नागरिकांकडून केली जात आहे.

  • 19 Jul 2025 12:43 PM (IST)

    19 Jul 2025 12:43 PM (IST)

    ओला-उबर चालकांचा आझाद मैदानात आंदोलन सुरू

    पंधरा तारखेपासून ओला-उबर चालकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू; असलेले आंदोलनात मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) अनेक भागांतून चालक सहभागी… आज पासून संपूर्ण MMR मध्ये सर्व अ‍ॅप आधारित कॅब बंद पाडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे… विमानतळ, रेल्वे स्थानक व कार्यालयीन प्रवाशांना कॅब न मिळण्याची शक्यता… जे चालक सेवा देत राहतील त्यांना चार जणांच्या गटाने जाऊन थांबवण्याचा इशारा; देखील आंदोलन करताना देण्यात आले आहे… नालासोपाऱ्यात एका चालकाने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्यानंतर आंदोलनाला वेग…

  • 19 Jul 2025 12:15 PM (IST)

    19 Jul 2025 12:15 PM (IST)

    'ही बॅटरी लवकरच संपणार; आदित्य ठाकरेंना डिवचलं

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पुण्यात डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे. पुण्यातील अलका चौक येथे लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांना चिडवण्याचा प्रयत्न केला आहे. 'ही बॅटरी लवकरच संपणार, कारण ही घराणेशाहीवर चालते,'असा मजकूर या बॅनरवर आहे.

  • 19 Jul 2025 12:05 PM (IST)

    19 Jul 2025 12:05 PM (IST)

    सरोज अहिरे यांच्या मोलकरणीला अटक

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. मोलकरणीने कपाटातून एक लाख रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक रोड पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरणीला अटक करण्यात आली आहे.

  • 19 Jul 2025 11:58 AM (IST)

    19 Jul 2025 11:58 AM (IST)

    मोठ्या टेक कंपन्या गूगल आणि मेटाला ED ची नोटीस

    भारतीय अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने आज शनिवारी जगभरातील मोठ्या टेक कंपन्या गूगल आणि मेटाला नोटीस बजावली आहे. बेटिंग अ‍ॅपला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत ईडीने या दोन्ही मोठ्या टेक कंपन्यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय ईडीने दोन्ही कंपन्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे देखील आदेश दिले आहेत. २१ जुलै रोजी या दोन्ही कंपन्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 19 Jul 2025 11:55 AM (IST)

    19 Jul 2025 11:55 AM (IST)

    विनायक राऊतांचा मंत्री नारायण राणेंवर हल्लाबोल

    ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, पण मेरिटवर आपला पराभव झाला नाही. नोट घ्या मतदान करा, असं करत विरोधकांनी 120 कोटी रुपेय वाटले म्हणून ते विजयी झाले. पण आम्ही आर्शिवाद मागितले आणि मतदारांनी चार लाख मते दिली. पुन्हा निवडणुका येतील पुन्हा उभे राहू पुन्हा जिंकू कारण इथला खासदार कोण आहे हे कुणाला माहिती देखील नाही, अशा शब्दात राऊतांनी नारायण राणेंवर टीकास्त्र डागलं.

  • 19 Jul 2025 11:54 AM (IST)

    19 Jul 2025 11:54 AM (IST)

    स्टंटमॅन राजूच्या दुःखद मृत्यूने अक्षय कुमार भावुक!

    अलिकडेच चित्रपटसृष्टीतून अशी एक बातमी समोर आली आहे जी सर्वांनाच आश्चर्यचकित करेल. प्रसिद्ध स्टंटमॅन राजूचा एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कर स्टंट करताना मृत्यू झाला. हा अपघात १० जुलै रोजी अलप्पाकुडीजवळ घडला, जेव्हा विझुंथमवाडी गावात ही शूटिंग सुरु होती. दरम्यान, बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने सर्व स्टंटमॅनसाठी असे कौतुकास्पद पाऊल उचलले, ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.अभिनेत्याने स्टंटमॅन राजूच्या अपघाती मृत्यूबाबत दुःख व्यक्त केले. आणि या घटनेमुळे अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे ज्याचं सगळेच कौतुक करताना दिसत आहे. बातमी सविस्तर वाचा

  • 19 Jul 2025 11:45 AM (IST)

    19 Jul 2025 11:45 AM (IST)

    अजितदादा आज बारामती दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून त्यांनी बारामतीमधील विविध विकासकामांची पाहणी केली. शहरातील सिद्धेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीच दर्शन घेतल्यानंतर त्यांनी विकासकामांची पाहणी सुरु केली असून आज ते बारामतीमधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

  • 19 Jul 2025 11:40 AM (IST)

    19 Jul 2025 11:40 AM (IST)

    नवजात अर्भकाची ७० हजार रुपयात विक्री; भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार

    भांडारा जिल्ह्यातील साकोली येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका १५ दिवसीय नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये म्हणून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर देखील तयार करण्यात आला आहे. या स्टॅम्प पेपरवर दत्तकनामा लिहून घेतल्याचा खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. सध्या हे बाळ बाल संरक्षण समितीच्या ताब्यात असून ते एका शिशुगृहात ठेवण्यात आलं आहे.

  • 19 Jul 2025 11:39 AM (IST)

    19 Jul 2025 11:39 AM (IST)

    वर्चस्वासाठी दोन गटात गँगवॉर; गोळीबारात आठ जण जखमी

    अकोला शहरात शुक्रवारी (१८ जुलै) ला दोन गटात वाद होत गॅंगवॉर झाला होता. हा गॅंगवॉर वर्चस्वाच्या लढाईतून झाला होता. यात ताल्वारीसह बंदुकीचा वापर झाला होता. या वादादरम्यान दोन गट आमने -सामने भिडले. गोळीबार करण्यात आला. एक हवेत गोळी फायर करण्यात आली होती. या संपूर्ण गॅंगवॉरमध्ये जवळपास ८ जण जखमी झाले होते. घटनस्थळावरून २ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. काही जखमी आरोपींवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले आहे. ही घटना कृषी नगर परिसरात घडली आहे. दरम्यान आरोपींची घटनास्थळी पोलिसांनी धिंड काढली.

  • 19 Jul 2025 11:38 AM (IST)

    19 Jul 2025 11:38 AM (IST)

    कर्नाटकच्या टॉपर इंजिनीयरची पुण्यातल्या ज्वेलरी शॉपमध्ये चोरी

    पुण्यातील बुधवार पेठ परिसारात एका ज्वेलरी शॉपमधून दागिने आणि ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी विश्रामबाग पोळी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास करून या प्रकरणी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून एकाला अटक केली आहे. आता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लिखित जी (21, रा. कोलार, कर्नाटक) असे आहे. आरोपी हा मूळचा कर्नाटकाचा आहे. तो सराईत गुन्हेगार नसून तो अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे.

  • 19 Jul 2025 11:35 AM (IST)

    19 Jul 2025 11:35 AM (IST)

    पीएमपीच्या बससेवेला प्रतिसाद

    पीएमपीकडून सुरू केलेल्या लोणावळा, एकवीरा देवी पर्यटन बस सेवेच्या पहिल्याच दिवशी तीन बस मार्गस्थ झाल्या. पीएमपीच्या पर्यटन बससेवेला पहिल्या तीन बसमधून ९९ पर्यटकांनी बुकिंग केले होते.

  • 19 Jul 2025 11:30 AM (IST)

    19 Jul 2025 11:30 AM (IST)

    Meta च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रोल आऊट झालं नवं इमेज टूल

    जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली Meta कंपनी आता पुन्हा एकदा एक नवीन सरप्राईज घेऊन आली आहे. फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Meta च्या मालकीचे आहेत. त्यामुळे कंपनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी सतत नवीन फीचर घेऊन येत असते. आता देखील कंपनीने असंच एक नवीन फीचर रोल आऊट करण्याची तयारी केली आहे. हे नवीन फीचर AI-पावर्ड टूल Imagine Me आहे. हे फीचर अद्याप सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलेलं नाही. मात्र येत्या काळात नवीन टूल सर्वांसाठी उपलब्ध केलं जाणार आहे.

  • 19 Jul 2025 11:29 AM (IST)

    19 Jul 2025 11:29 AM (IST)

    India – Pakistan पुन्हा एकदा भिडणार!

    वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स म्हणजेच WCL 2025 सुरू झाले आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार, 20 जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे. क्रिकेट चाहते अशा स्पर्धांची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण त्यांना त्यांचे जुने हिरो – युवराज सिंग, सुरेश रैना, पठाण बंधू आणि शिखर धवन – पुन्हा खेळताना पाहण्याची संधी मिळते. वाचा सविस्तर 

  • 19 Jul 2025 11:25 AM (IST)

    19 Jul 2025 11:25 AM (IST)

    सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे उपोषण

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. लॉच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीदेखील कॅरी ऑन पद्धत लागू करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळावा, या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे.

     

  • 19 Jul 2025 11:20 AM (IST)

    19 Jul 2025 11:20 AM (IST)

    Instagram Auto Scroll: रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार!

    इंस्टाग्रामवरील सर्वांचं आवडतं फीचर म्हणजे रिल्स. इंस्टाग्रामवर अनेक क्रिएटर्स त्यांच्या रिल्स शेअर करत असतात. प्रत्येक क्रिएटर्सचा रिल्स कंटेट वेगळा असतो. त्यामुळे लोकं त्यांच्या आवडीनुसार क्रिएटर्सना फॉलो करतात आणि रिल्स बघतात. पण रिल्स बघताना नवीन रिल्स बघण्यासाठी आपल्याला सतत पुढे पुढे स्क्रोल करावं लागतं. पण एका क्षणाला आपण स्क्रोल करून करून वैतागतो आणि आपल्याला असं वाटतं की असं एखादं फिचर असावं ज्यामुळे आपोआप रिल्स स्क्रोल होऊ शकतील. तुम्हाला देखील असंच वाटतं का, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Mark Zuckerberg आणि मेटा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामसाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. हे फीचर म्हणजे ऑटो स्क्रोल फीचर.

Web Title: Marathi breaking news today live updates raj thackeray on nishikant dubey 19 july 2025 marathi blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • Breaking News
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.