मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्याला काय आहे शिक्षेची तरतूद? या कलमांतर्गत दाखल होतो गुन्हा
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थान सिव्हिल लाईन्स येथे जनसुनावणीदरम्यान त्यांच्यावर हल्ला झाल्यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी (२० ऑगस्ट) झाले जनसुनावणी कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने प्रथम मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्रे दिली आणि नंतर अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला तात्काळ पकडून ताब्यात घेतले. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या खांद्याला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. पण या घटनेमुळे राजकीय वर्तुळात सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीने आपले नाव राजेशभाई खिमजी असे सांगितले असून तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी असल्याचा दावा केला आहे. सध्या, त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना दुखावण्याचा हेतू काय होता याची तपासणी सुरू आहे. चौकशीदरम्यान, आरोपी तुरुंगात असलेल्या आपल्या एका नातेवाईकाच्या सुटकेसाठी अर्ज घेऊन आला होता असे समोर आले आहे. घटनेच्या वेळी मुख्यमंत्री जनसुनावणीदरम्यान लोकांच्या तक्रारी ऐकत होत्या. त्याच वेळी अचानक हल्ला झाला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “आम्हाला मागून आवाज आला, आणि समजण्याआधीच पोलिसांनी हल्लेखोराला पकडले.” हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता पूर्णपणे हादरल्या होत्या. पण या घटनेनंतर मुख्यमंत्री किंवा कोणत्याही हल्ला करणाऱ्या आरोपीला काय शिक्षा मिळते, असाही प्रश्न उपस्थित होतो.
कायदेशीरदृष्ट्या, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ अंतर्गत गुन्हा मानला जातो. यात स्वेच्छेने दुखापत कण्याच्या उद्देशाने बोलण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ नुसार, जर एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक दुसऱ्या व्यक्तीला दुखापत केली तर त्याला गुन्हा मानले जाईल. यासाठी गुन्हेगाराला एक वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १० हजारांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. अशातच रेखा गुप्ता यांच्यावरही हल्ला हा मुख्यमंत्र्यांवर हल्ल्याचे प्रकरण असल्याने, पोलिस इतर कलमांखाली देखील गुन्हा दाखल करू शकतात.
Maharashtra Heavy Rain: पुणे, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांत तुफान पाऊस कोसळणार; कोकणात तर उंचच उंच
BNS ११५ मध्ये एखाद्याला थप्पड मारणे किंवा ठोसा मारणे यांचा समावेश आहे.
याशिवाय, जाणूनबुजून एखाद्याला ढकलून देणे देखील BNS ११५ कलमाअंतर्गत येते.
जर एखाद्या व्यक्तीने एखाद्यावर वस्तू फेकली तर त्या व्यक्तीविरुद्ध BNS ११५ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
जर एखाद्याचे शरीर घट्ट धरून दुखापत करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याच्याविरुद्ध बीएनएस ११५ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो.
विरोधी पक्ष आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्लायनंतर भाजपने या प्रकाराला गंभीर चूक असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने या घटनेचा निषेध केला आहे. जर मुख्यमंत्र्यांवरच हल्ला होत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण होतो, असही म्हटलं आहे.