पाकिस्तान हॉकी संघ(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup Hockey 2025 : २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हॉकी आशिया कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाने माघार घेतली आहे. हॉकी आशिया कप २०२५ ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जणार आहे. भारताला हॉकी आशिया कपचे यजमानपदाचा मान मिळाला असून देशाने या स्पर्धेचे यजमानपद बिहार राज्याकडे दिले आहे. परंतु, या स्पर्धेत पाकिस्तान हॉकी आशिया कपसाठी भारत दौरा करणार नसल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे. एवढेच नाही तर ओमानने देखील आपले नाव मागे घेतले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि कझाकस्तानला संधी देण्यात आली.
हेही वाचा : राणा-रावत जोडीचा DPL 2025 मध्ये धुमाकूळ! अर्धशतके झळकवत दिल्ली रायडर्सचा विजय, अव्वल स्थानी झेप
हॉकी इंडियाच्या एका सूत्राने सांगितले की, मंगळवारी सकाळी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने अधिकृतपणे भारतात येण्यास नकार दिला आहे. ओमानच्या संघानेही माघार घेतली आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि कझाकस्तानचा ड्रॉमध्ये समावेश करण्यात आला. यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये पाकिस्तान या स्पर्धेतून माघार घेईल असे म्हटले जात होते.
एका महिन्यापूर्वी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (पीएचएफ) सुरक्षेचे कारण सांगितला होता. तथापि, भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा दिला होता. आशिया कपमधून माघार घेतल्याने पाकिस्तानने विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी गमावली आहे. खरंतर, आशिया कप जिंकणाऱ्या संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळते. पुढील हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये बेल्जियम आणि नेदरलँ मध्ये खेळला जाईल.
माध्यम संस्थेच्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडून भारत दौरा करण्यास नसल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, या प्रकरणात, भारत सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते की, आले होते की ते आशिया कपसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देणार आहेत. हॉकी इंडियाने मान्य केले आहे की आता पाकिस्तानचा संघ आशिया कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही.
हेही वाचा : Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर
आशिया कप ही २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा देखील असणार आहे. यजमान भारताव्यतिरिक्त, आशिया कपमध्ये चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, कजाकिस्तान, बांगलादेश आणि चिनी तैपेई या संघ असणार आहेत.