दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या 'या' पदार्थांचे नियमित करा सेवन
महिलांसह पुरुषांना कायमच दीर्घकाळ तरुण राहायचे असते. सुंदर त्वचा, चमकदार केस आणि ग्लोइंग स्किनसाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. त्वचा सुंदर ठेवण्यासाठी महिला फेसपॅक, फेसमास्क, स्क्रब इत्यादी अनेक वेगवेगळ्या गोष्टी लावून त्वचेची काळजी घेतली जाते. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. आयुष्यभर तरूण, प्रेझेंटेबल दिसण्यासाठी जीवनशैलीत अनेक बदल केले जातात. जीवनशैलीतील केलेले बदल शरीर आणि सुंदर दिसण्यासाठी कायमच महत्वपूर्ण ठरतात. सूंदर त्वचेसाठी स्किन केअर रुटीन, महागड्या ट्रीटमेंट आणि इतर वेगवेगळे उपाय केले जातात. पण यामुळे त्वचा काहीकाळच सुंदर दिसते. सुंदर त्वचेसाठी चांगला आहार आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पोषण आहार घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तरुण दिसण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.(फोटो सौजन्य – pinterest)
विटामिन सी युक्त आवळ्याचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. आवळ्यामध्ये असलेले घटक त्वचा आणि केस सुंदर ठेवतात. यामध्ये असलेले एंटी-एजिंग गुणधर्म त्वचेमधील कोलोजन वाढवण्यासाठी मदत करतात. वाढत्या चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, वांग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचे किंवा आवळ्याच्या पावडरचे सेवन करावे. आवळ्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म त्वचा सुंदर आणि स्वच्छ ठेवते. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर आवळ्याच्या रसाचे उपाशी पोटी सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल.
कायम सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे आणि फळांचे सेवन करावे. आहारात जांभूळ, ब्लुबेरी, डाळींब, सफरचंद, किवी, पालक, मेथी आणि मोहोरी इत्यादी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. फळांमध्ये असलेले विटामिन सी त्वचा कायमच सुंदर ठेवतात. याशिवाय विटामिन के, फॉलेट आणि आयर्न इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीर डिटॉक्स करणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी उपाशी पोटी हळद आणि कडुलिंबाचे सेवन करावे. कडुलिंबामध्ये चांगल्या बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. याशिवाय हळदीचे सेवन केल्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते.