Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी? नगरविकास विभागाच्या कामकाजावरून चर्चांना उधाण

Marathi breaking live marathiया घडामोडींमुळे शिंदे–फडणवीस यांच्यातील समीकरणांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या चर्चांना फेटाळून लावले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 25, 2025 | 05:18 PM
LIVE
Top Marathi News Today Live शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी? नगरविकास विभागाच्या कामकाजावरून चर्चांना उधाण
Follow Us
Close
Follow Us:
  • 25 Aug 2025 05:18 PM (IST)

    25 Aug 2025 05:18 PM (IST)

    अतिरिक्त टॅरिफनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयावर ठाम

    सध्या रशियाकडून तेल खरेदीवरुन भारत आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त २५ टक्के दंडही लादला आहे. पण भारताने रशियाशी तेल व्यापार बंद करण्यास नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प यांना सुरुवातील २५ टक्के लादलेला कर ५० टक्क्यापर्यंत वाढवला आहे. दरम्यान पुन्हा एकदा भारताने रशियाकडून तेल खरेदीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 25 Aug 2025 05:16 PM (IST)

    25 Aug 2025 05:16 PM (IST)

    ही दोस्ती तुटायची नाही! अतिरिक्त टॅरिफनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयावर ठाम

    India Russia Relations : मॉस्को : सध्या रशियाकडून तेल खरेदीवरुन भारत आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त २५ टक्के दंडही लादला आहे. पण भारताने रशियाशी तेल व्यापार बंद करण्यास नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प यांना सुरुवातील २५ टक्के लादलेला कर ५० टक्क्यापर्यंत वाढवला आहे. दरम्यान पुन्हा एकदा भारताने रशियाकडून तेल खरेदीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियातील भारताचे राजदूत यांनी यावर मोठे विधान केले आहे.

  • 25 Aug 2025 05:09 PM (IST)

    25 Aug 2025 05:09 PM (IST)

    ‘क्रिश’चा मास्क बनवण्यासाठी लागले ‘इतके’ महिने

    ‘क्रिश’ (Krrish) चित्रपटाने सगळ्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. आता ज्येष्ठ चित्रपट निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी खुलासा केला की, त्यांचा सुपरस्टार मुलगा हृतिक रोशनसाठी (Hrithik Roshan) आयकॉनिक ‘क्रिश’ मास्क डिझाइन करण्यासाठी सहा महिने लागले कारण मेणाचा मास्क काही तासांत वितळत असे. त्यामुळे, शूटिंग दरम्यान, त्यांना तो चोवीस तास एसी बसमध्ये ठेवावा लागत असे. राकेश रोशन यांनी खंडाळा येथील त्यांच्या सुंदर बंगल्याचा दौरा करताना फराह खानला या मास्कबद्दल सांगितले.

     

  • 25 Aug 2025 04:53 PM (IST)

    25 Aug 2025 04:53 PM (IST)

    PVR INOX बोरिवली येथील मॉलमध्ये १०-स्क्रीन मेगाप्लेक्स लाँच

    भारतातील सर्वात मोठी आणि प्रीमियम सिनेमा प्रदर्शन कंपनी पीव्हीआर आयनॉक्सने मुंबईतील बोरिवली पूर्व येथील ओबेरॉय रिअ‍ॅल्टीच्या स्काय सिटी मॉलमध्ये १०-स्क्रीन मेगाप्लेक्स उघडले आहे. कंपनीच्या कॅपेक्स मॉडेल अंतर्गत विकसित केलेले, हे मल्टिप्लेक्स ४३,५०० चौरस फूट क्षेत्र व्यापते आणि त्यात १,३७२ आसन क्षमता आहे आणि त्यात इन्सिग्निया, आयमॅक्स विथ लेसर, ४डीएक्स आणि मुख्य प्रवाहातील स्क्रीन्स असे फॉरमॅट समाविष्ट आहेत.

  • 25 Aug 2025 04:44 PM (IST)

    25 Aug 2025 04:44 PM (IST)

    भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या पंतप्रधानाने पद सोडावे का?

    केंद्र सरकारच्या १३० व्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आज सकाळी ANIया वृत्तसंस्थेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मुलाखत दिली. त्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक झाल्यानंतर त्यांच्या पदावरून काढून टाकण्याच्या विधेयकावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

    (सविस्तर बातमी)

  • 25 Aug 2025 04:35 PM (IST)

    25 Aug 2025 04:35 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त

    पालघर जिल्ह्यात एकीकडे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.महायुतीतील प्रमुख घटक पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते आणि प्रतिनिधी फोडताना दिसत आहेत.तर आता अचानक पणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची मोखाडा तालुका कार्यकारिणी बरखास्त केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुनील भुसारा यांनी माध्यमांना दिली आहे.त्यामुळे येणारी निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाकरी फिरवणार का..?

  • 25 Aug 2025 04:10 PM (IST)

    25 Aug 2025 04:10 PM (IST)

    पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक केली जाणार नाही

    दोन वर्षांपासून देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी वरुन अनेकदा टिपाटीप्पण्या कऱण्यात आल्या. त्यावरून अनेकदा त्यांना ट्रोलही करण्यात आले. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीधर पदवीशी संबंधित माहिती उघड करण्याचा केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

     

  • 25 Aug 2025 04:01 PM (IST)

    25 Aug 2025 04:01 PM (IST)

    ED येताच बरमुड्यावरच पळू लागला ‘हा’ आमदार; CRPF च्या जवानांनी अलगदपणे…; पहा Video

    West Bengal: पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीने सत्ताधारी टीएमसीच्या आमदारावर छापेमारी केली आहे. ईडीने आपला मोर्चा पश्चिम बंगालमध्ये वळवला आहे. ईडीने आज सत्ताधारी टीएमसीचे आमदार जीवन कृष्णा साहा यांच्या घरी छापेमारी केली. तेव्हाचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

  • 25 Aug 2025 04:00 PM (IST)

    25 Aug 2025 04:00 PM (IST)

    IT शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी

    जागतिक बाजारपेठेत तेजी असताना, भारतीय शेअर बाजार सोमवारी (२५ ऑगस्ट) आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात तेजीसह उघडले. सप्टेंबरमध्ये यूएस फेडरल रिझर्व्ह (फेड) व्याजदरात कपात करण्याच्या अपेक्षेने जागतिक बाजार तेजीत होते. याचा देशांतर्गत बाजारपेठांवरही सकारात्मक परिणाम झाला. तसेच, आयटी शेअर्समधील जोरदार खरेदीमुळे बाजार तेजीला पाठिंबा मिळाला.

  • 25 Aug 2025 03:54 PM (IST)

    25 Aug 2025 03:54 PM (IST)

    Shilpa Shetty च्या घरी येणार नाही बाप्पा! मोडणार परंपरा, स्वतःच कारण देत केला खुलासा

    अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी गणेश चतुर्थी उत्साहात साजरा करताना दिसत असते. परंतु, यावर्षी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरी गणेश चतुर्थी साजरी होणार नसल्याचे समजले आहे. दरवर्षी शिल्पा शेट्टी तिच्या घरी बाप्पाचे स्वागत करते. पण यावर्षी कुटुंबात शोककळा असल्याने ती परंपरेनुसार १३ दिवस कोणतीही पूजा करणार नाही आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 25 Aug 2025 03:46 PM (IST)

    25 Aug 2025 03:46 PM (IST)

    निक्की हत्याकांड प्रकरणात नवीन खुलासा, घटनेच्या वेळी विपिन घरी नव्हता का?

    उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कासना येथील निक्कीची निर्घृण हत्या करण्यात आली. पती आणि सासरच्या कुटुंबातील लोकांवर या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 25 Aug 2025 03:41 PM (IST)

    25 Aug 2025 03:41 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाने इन्फ्ल्यूएर्सना झापलं! ‘या’ प्रकरणात समय रैनासह ५ जणांना माफी मागण्याचे आदेश

    दिव्यांग नागरिकांचा अपमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने इन्फ्ल्यूएर्सना चांगलेच झापले आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. इन्फ्ल्यूएर्सना सुप्रीम कोर्टाने माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 25 Aug 2025 03:24 PM (IST)

    25 Aug 2025 03:24 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाने इन्फ्ल्यूएर्सना झापलं! ‘या’ प्रकरणात समय रैनासह ५ जणांना माफी मागण्याचे आदेश

    Suprme Court On Influencers: दिव्यांग नागरिकांचा अपमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने इन्फ्ल्यूएर्सना चांगलेच झापले आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्याविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. इन्फ्ल्यूएर्सना सुप्रीम कोर्टाने माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणानंतर कोर्टाने यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे असे म्हटले आहे. समय रैना आणि 5 जणांना कोर्टाने माफी मागण्याचे आदेश दिले आहेत.

  • 25 Aug 2025 03:11 PM (IST)

    25 Aug 2025 03:11 PM (IST)

    शाकिब अल हसनने टी20 क्रिकेटमध्ये उमटवला ठसा! 500 विकेट्ससह रचला विश्वविक्रम

    बांगलादेशचा क्रिकेट दिग्गज शाकिब अल हसनने टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ च्या ११ व्या सामन्यात सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स विरुद्ध अँटिग्वा अँड बारबुडा फाल्कन्सकडून खेळताना त्याने ३ विकेट घेतल्या.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा....

  • 25 Aug 2025 02:59 PM (IST)

    25 Aug 2025 02:59 PM (IST)

    Aisa Cup 2025 आधीच BCCI आणि Dream 11 चा करार संपुष्टात

    जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआयने (BCCI) ड्रीम ११ (Dream 11) सोबतचे संबंध तोडले आहेत. ऑनलाइन गेमिंगचे प्रमोशन अँड रेग्युलेशन विधेयक मंजूर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रीम ११ सोबतचे संबंध तोडल्यानंतर बीसीसीआयनेही (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 25 Aug 2025 02:38 PM (IST)

    25 Aug 2025 02:38 PM (IST)

    ३० सेंकदाची रिल जीवावर बेतली!

    सध्या सोशल मीडिया धक्कादायक आणि थरराक व्हिडिओंच स्माशन बनले आहे. रोज कोणाच्या ना कोणच्या मरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ३० सेंकदाच्या रीलच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालत आहे. यामध्ये विशेष करुन तरुणाईचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आतापर्यंत अशा धोकादायक स्टंटबाजीमुळे अनेकांचा जीव गेला आहे. पण तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत.

  • 25 Aug 2025 02:37 PM (IST)

    25 Aug 2025 02:37 PM (IST)

    पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

    पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यासह देशभरातून दररोज घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विवाहित महिलेला घरी एकटेच पाहून तिच्या घराबाहेर जात तिच्याशी लगट करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मुबारक मोळम्मद शेख (२५, रा. घोरपडेवस्त, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. दोन दिवसांपुर्वी (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

  • 25 Aug 2025 02:37 PM (IST)

    25 Aug 2025 02:37 PM (IST)

    Cheteshwar Pujara च्या निवृत्तीवर शशी थरूर भावुक

    Cheteshwar Pujara Retirement : भारतीय संघाचा भरवशाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पूजाराने काल म्हणजे रविवार, २४ ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली. यानंतर, त्याच्यावर भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच काही प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. अशातच प्रसिद्ध काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील पुजाराच्या निवृत्तीवर भाष्य केले. चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीच्या घोषणेवर शशी थरूर अजिबात खूश असल्याचे दिसत नाहीत. या दरम्यान त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर टीका केली.  त्यांच्या मते पुजाराला उत्कृष्ट कसोटी कारकिर्दीमुळे सन्मानजनक निरोप मिळायला हवा होता.

  • 25 Aug 2025 02:36 PM (IST)

    25 Aug 2025 02:36 PM (IST)

    स्वतःच रचला बेपत्ता होण्याचा बनाव

    Sinhgad Fort News: चार दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध अशा किल्ले सिंहगडावर एक तरूण बेपत्ता झाला होता. फिरण्यासाठी आलेला हा तरुण लघुशंकेसाठी जातो असे सांगून गेला तो परत आलाच नाही. मात्र अखेर चार दिवसांच्या तपासानंतर तो तरूण पोलिसांच्या हाती लागला आहे. मध्यंतरी या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले होते. मात्र अखेर हा तरूण सापडला आहे. हा तरूण नक्की कुठे होता आणि कशासाठी लपला होता याबाबत अधिक जाणून घेऊयात.

  • 25 Aug 2025 02:27 PM (IST)

    25 Aug 2025 02:27 PM (IST)

    Pune News: स्वतःच रचला बेपत्ता होण्याचा बनाव; 4 दिवस लपून बसला अन्…, सिंहगड प्रकरणात ‘हा’ धक्कादायक खुलासा

    Sinhgad Fort News: चार दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध अशा किल्ले सिंहगडावर एक तरूण बेपत्ता झाला होता. फिरण्यासाठी आलेला हा तरुण लघुशंकेसाठी जातो असे सांगून गेला तो परत आलाच नाही. मात्र अखेर चार दिवसांच्या तपासानंतर तो तरूण पोलिसांच्या हाती लागला आहे. मध्यंतरी या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले होते. मात्र अखेर हा तरूण सापडला आहे. हा तरूण नक्की कुठे होता आणि कशासाठी लपला होता याबाबत अधिक जाणून घेऊयात.

  • 25 Aug 2025 02:20 PM (IST)

    25 Aug 2025 02:20 PM (IST)

    मनोज बाजपेयीच्या ‘Inspector Zende’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

    प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यावेळी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यांच्या आगामी ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे आणि हा चित्रपट तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता हे आपण जाणून घेणार आहोत.

  • 25 Aug 2025 02:19 PM (IST)

    25 Aug 2025 02:19 PM (IST)

    आता 10 पट वेगाने चालणार तुमच्या डिव्हाईसचं इंटरनेट

    शास्त्रज्ञांनी एक नवीन आणि अनोखा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांनी एक गजब लेजर एम्प्लिफायर तयार केला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने 10 पट जास्त वेगाने डेटा ट्रांसमिट केला जाऊ शकतो. हा शोध भविष्यात न केवळ इंटरनेटचा वेग वाढवणार आहे त्यासोबतच वैद्यकीय आणि वैज्ञानिक संशोधनातही ते मोठी भूमिका बजावू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

  • 25 Aug 2025 02:19 PM (IST)

    25 Aug 2025 02:19 PM (IST)

    पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी सज्ज!

    महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या मेगा इव्हेंटपूर्वी पाकिस्तान महिला क्रिकेट संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता या मेगा इव्हेंटसाठी संघ जाहीर केला आहे. खराब फॉर्ममधून जात असलेल्या पाकिस्तान संघावर या स्पर्धेत खूप दबाव येणार आहे. पीसीबीने एका तरुण खेळाडूला कर्णधार बनवले आहे.

  • 25 Aug 2025 01:58 PM (IST)

    25 Aug 2025 01:58 PM (IST)

    चीनची अनोखी टेक्नोलॉजी पाहून उडाले इतरांचे होश!

    आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आता आपल्याला AI ची जादू पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण AI चा वापर करून आपली काम पूर्ण करत आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते ऑफीसला जाणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला AI बद्दल माहिती आहे. AI आपल्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. AI मुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पृथ्वीवर सर्वत्र AI ची जादू पसरली आहे. आता AI ने अंतराळात देखील त्याची जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे.

  • 25 Aug 2025 01:53 PM (IST)

    25 Aug 2025 01:53 PM (IST)

    अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या, CBI ने दाखल केला फौजदारी खटला

    सोमवारी अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या तिन्ही कंपन्यांचे शेअर्स खालच्या सर्किटवर पोहोचले आहेत. सोमवारी बीएसईमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून २७५.०५ रुपयांवर आले.त्याच वेळी, रिलायन्स पॉवरचे शेअर्सही ५ टक्क्यांनी घसरून ४६.४९ रुपयांवर आले. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे शेअर्सही ५ टक्क्यांनी घसरले आहेत. केंद्रीय तपास संस्था सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

  • 25 Aug 2025 01:45 PM (IST)

    25 Aug 2025 01:45 PM (IST)

    संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मोदी-शरीफ येणार आमनेसामने

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ठोस प्रत्युत्तरामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात एक महत्त्वाचा राजनैतिक प्रसंग घडणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे दोघेही एकाच दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) ८० व्या अधिवेशनात भाषण करणार आहेत. विशेष म्हणजे, ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच दोन्ही नेते एका जागतिक व्यासपीठावर समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

  • 25 Aug 2025 01:26 PM (IST)

    25 Aug 2025 01:26 PM (IST)

    लग्नाच्या दोन वर्षानंतर परिणीती होणार आई

    बॉलीवूडमधील पॉवर कपलपैकी एक असलेल्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. हे जोडपे नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये दिसले होते. यादरम्यान राघवने संकेत दिले होते की तो लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी देईल. दरम्यान, आता राघव आणि परीने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच आई – बाबा होणार असल्याचे समजले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नंसीची घोषणा करून चाहत्यांना खुश केले आहे.

  • 25 Aug 2025 01:25 PM (IST)

    25 Aug 2025 01:25 PM (IST)

    प्रणीत मोरेला बिग बाॅस प्रेक्षकांनी धरलं धारेवर

    टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिेअॅलिटी शो बिग बाॅस 19 चा काल शुभारंभ झाला आहे. या नव्या सीझनमध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहे. अनेक वेगवेगळ्या राज्यांमधून बिग बॉस ने स्पर्धकांची निवड केली आहे. कालपासून बिग बाॅसच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता बिग बाॅसच्या स्पर्धकांवर प्रेक्षकांची नजर असणार आहे. बिग बाॅसचे प्रेक्षक हे हा शो मागील अनेक वर्ष पाहत आहेत. अनेक वादामध्ये असलेल्या स्पर्धेकांना या शोचा भाग बनवण्यात येते. त्याचबरोबर त्यांनी भूतकाळामध्ये केलेल्या कृत्याचा देखील शोमध्ये हिशोब घेतला जातो.

  • 25 Aug 2025 01:15 PM (IST)

    25 Aug 2025 01:15 PM (IST)

    पहलगाम हल्ल्यांनंतर भारताने प्रथमच साधला पाकिस्तानशी थेट संवाद

    पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी गडद झाला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शेजारील देशाला गंभीर इशारा दिला आहे. जम्मूतील तावी नदीला पूर येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून त्याचे परिणाम थेट पाकिस्तानातही जाणवतील, अशी माहिती भारत सरकारने इस्लामाबादला दिली आहे. भारताच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तान सरकारने तातडीने अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

  • 25 Aug 2025 01:05 PM (IST)

    25 Aug 2025 01:05 PM (IST)

    अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १३० घटनादुरुस्ती विधेयक मांडले. या विधेयकात पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत जो कोणताही नेता तुरुंगात जाईल, त्याला पदावरून काढून टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण विरोधकांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. विरोधकांनी याला काळा कायदा म्हणत जोरदार टिकाही केली आहे. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी या कायद्याबाबत काही गोष्टीही स्पष्ट केल्या आहेत. ANI या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विधेयकावर भाष्य केलं आहे.

  • 25 Aug 2025 12:55 PM (IST)

    25 Aug 2025 12:55 PM (IST)

    देवासाठी देहत्यागाचा निर्णय, महाराष्ट्रातील 10 भाविक

    परमेश्वराचं बोलणवणं आलं आहे त्यामुळे आम्ही देहत्याग करणार असल्याचे तब्बल 20 भाविकांनी जाहीर केले आहे. कर्नाटकमधील अथणी तालुक्यातील अंनतपूर येथील पाच भाविकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाविक देखील यामध्ये आहेत. जत तालुक्यातील एक महिला आणि पुरुष भक्त देखील देहत्याग करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • 25 Aug 2025 12:45 PM (IST)

    25 Aug 2025 12:45 PM (IST)

    काँग्रेस पक्षाकडून महापालिकेत आंदोलन

    नागपूर शहरातील खड्ड्याबाबत नागपुरात काँग्रेस पक्षाकडून अनोखे आंदोलन सुरू आहे. आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या फोटो आणि जीपीएस लोकेशनसह हे आंदोलन सुरू केले आहे. मनपाचा खड्डे मुक्त नागपूरचा दावा खोटा ठरवण्यासाठी एका प्रकारे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुरावेच यानिमित्ताने दिला आहे.

  • 25 Aug 2025 12:35 PM (IST)

    25 Aug 2025 12:35 PM (IST)

    एकनाथ शिंदे अपयशी ठरले

    नगरविकास मंत्री म्हणून काम करण्यास एकनाथ शिंदे अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

  • 25 Aug 2025 12:25 PM (IST)

    25 Aug 2025 12:25 PM (IST)

    सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

    “गणेशोत्सवाच्या आधी उद्याच वेतन देण्याचा जीआर काढलेला आहे. महाराष्ट्र सरकारकडून जे वेतन अधिकारी, कर्मचारी पेन्शनधारकांना दिलं जातं. उद्या 26 तारखेला त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होईल, तसा जीआर काढलेला आहे” असं राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

  • 25 Aug 2025 12:15 PM (IST)

    25 Aug 2025 12:15 PM (IST)

    विकास, उन्नती आणि प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध – अमित साटम

    “गेल्या 11 वर्षात मुंबई शहराचा कायापालट, मुंबईत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न त्याचा रिझल्ट मुंबईकरांना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या 11 वर्षात काम केलय तसाच विकास, उन्नती आणि प्रगती मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” असं मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं.

  • 25 Aug 2025 12:05 PM (IST)

    25 Aug 2025 12:05 PM (IST)

    कांदिवलीत एक चार मजली इमारत कोसळली

    कांदिवली पश्चिमेकडील एसव्ही रोडजवळ एक चार मजली इमारत कोसळली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बीएमसीने ही इमारत धोकादायक असल्याचे कारण देत ती आधीच रिकामी केली होती. सध्या, बीएमसीची टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि हटवण्याचे काम करत आहे.

  • 25 Aug 2025 12:05 PM (IST)

    25 Aug 2025 12:05 PM (IST)

    वसईमध्ये चिमुकल्याच्या अंगावर पडला विजेचा पोल

    वसईतील धक्कादायक व्हिडिओ समोर आाला आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या राहिलेल्या लहान मुलाच्या अंगावर विजेचा पोल पडला. या घटनेमध्ये शाळकरी मुलगा अगदी थोडक्यात बचावला आहे.

    Vasai | वसईत मुलाचा अंगावर पडला विजेचा पोल, शाळकरी मुलगा अगदी थोडक्यात बचावला#Vasai #MaharashtraNews #NationalNews #Viral pic.twitter.com/x5FCxROt07

    — Navarashtra (@navarashtra) August 24, 2025

  • 25 Aug 2025 11:55 AM (IST)

    25 Aug 2025 11:55 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान, पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील खोडलधाम मैदानावर ५,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यावेळी पंतप्रधान मोदी एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.

  • 25 Aug 2025 11:45 AM (IST)

    25 Aug 2025 11:45 AM (IST)

    ही शान कोणाची...? लालबागच्या राजाची...

    मुंबईमधील लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. तिरुपती बालाजीच्या मुकटाप्रमाणे मांडवामध्ये लालबागचा राजा विराजमान झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लालबागच्या गणपतीच्या पहिल्या झलकची जोरदार चर्चा रंगली आहे.

    ही शान कोणाची...? लालबागच्या राजाची...🙌🏻
    सोन्याच्या सिंहासनावर दिमाखात पार पडला लालबागच्या राजाचा अनावरण सोहळा.@LalbaugchaRaja#LalbaugchaRajaFirstLook #LalbaugchaRaja2025 #LalbaugchaRaja #Lalbaug #Ganeshotsav2025 #GaneshChaturthi pic.twitter.com/KpPuaq7ieE

    — Navarashtra (@navarashtra) August 24, 2025

  • 25 Aug 2025 11:25 AM (IST)

    25 Aug 2025 11:25 AM (IST)

    मी त्यांचा बाजार उठवतो - मनोज जरांगे पाटील

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या 28 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. यापूर्वी त्यांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेमध्ये महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. मुंबईला येण्याची हौस नाही. पण लेकरंबाळांसाठी यावं लागतंय.  बीडचं हे नुसतं रुप बघून सरकारला रातभर झोप राहणार नाही. बेजार होणार. असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

  • 25 Aug 2025 11:15 AM (IST)

    25 Aug 2025 11:15 AM (IST)

    भाजप मुंबईत आपली घोडदौड कायम राखेल - फडणवीस

    अमित साटम यांना मुंबईचे भाजप शहराध्यक्ष केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, "अमित साटम हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याआधी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून देखील काम केलं आहे. भाजपात त्यांचा प्रदीर्घ असा कार्यकाळ राहिला आहे. विधानसभेत एक अभ्यासू व आक्रमक असे आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी जी कल्पकत हवी ती देखील साटम यांच्याकडे आहे. मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळात त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मुंबईत आपली घोडदौड कायम राखेल," असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

  • 25 Aug 2025 11:04 AM (IST)

    25 Aug 2025 11:04 AM (IST)

    परप्रांतीयाकडून थेट राज ठाकरेंना शिवीगाळ

    मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे अनेकदा परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतात दिसतात. अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात एका तरुणाने दारुच्या नशेमध्ये राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, त्याने शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • 25 Aug 2025 11:01 AM (IST)

    25 Aug 2025 11:01 AM (IST)

    ‘हे’ आहे तामिळनाडूतील अद्भुत मानवमुखी गणेशाचे मंदिर

    भारताची ओळख म्हणजे अध्यात्म, संस्कृती आणि प्राचीन परंपरांनी भरलेली भूमी. येथे असंख्य मंदिरे आहेत ज्यांच्या मागे रहस्यमय कथा आणि श्रद्धेचा मजबूत पाया दडलेला आहे. अशाच मंदिरांपैकी एक आहे तामिळनाडूमधील “आदि विनायक मंदिर”, जिथे भगवान गणेशाचे विलक्षण मानवी मुख असलेले रूप भक्तांना दर्शन देते. सहसा आपण गणपती बाप्पाला हत्तीचे मुख असलेले पाहतो, पण या मंदिरात ते अगदी मानवाच्या चेहऱ्यासह पूजले जातात.

  • 25 Aug 2025 10:55 AM (IST)

    25 Aug 2025 10:55 AM (IST)

    भाजपची तिरपी चाल…

    भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई भाजपचे शहर अध्यक्षपदावरून आशिष शेलार यांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून  अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने  हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.

  • 25 Aug 2025 10:45 AM (IST)

    25 Aug 2025 10:45 AM (IST)

    मनोज जरांगेना गिरीश महाजनांचा मोलाचा सल्ला

    गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा वाद चिघळत चाललेला दिसून येत आहे. मनोज जरांगे वेगवेगळ्या पद्धतीने यासाठी लढा देत असून यावर अजूनही चर्चा चालू आहेत. दरम्यान मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठे निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी, राज्यमंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी जरांगे यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. बातमी सविस्तर वाचा...

  • 25 Aug 2025 10:33 AM (IST)

    25 Aug 2025 10:33 AM (IST)

    Asia Cup 2025 पूर्वी संजू सॅमसनने झळकावले शतक

    भारतीय निवडकर्त्यांनी आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची निवड केली आहे. जिथे यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन देखील संघात दिसत आहे. तथापि, शुभमन गिलच्या प्रवेशानंतर सॅमसनचे स्थान धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत, आता त्याने या सर्व वृत्तांना बॅटने उत्तर दिले आहे. आशिया कप २०२५ पूर्वी, संजूने १४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने एक शानदार शतक झळकावले आहे. या शतकामुळे त्याच्या संघाने रोमांचक सामना जिंकला आहे.

  • 25 Aug 2025 10:19 AM (IST)

    25 Aug 2025 10:19 AM (IST)

    धक्कदायक! विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित

    कोलकाता येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. कोलकाता येथील साऊथ साऊथ कोलकाता लॉ कॉलेज येथे सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. आधी एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ चित्रित करण्यात आले. त्यांनतर पीडितेला ब्लॅकमेल करून सामूहिक बलात्कार करण्यात आला.

  • 25 Aug 2025 10:10 AM (IST)

    25 Aug 2025 10:10 AM (IST)

    मोफत मिळवा डायमंड्स, स्किन्स आणि बक्षिसे!

    फ्री फायर हा एक लोकप्रिय बॅटल रॉयल गेम आहे. या गेममध्ये प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असते. गेममध्ये प्लेअर्सना सुरुवातीलाच एका आयलँडवर उतरवले जाते. या आयलँडवर प्लेअर्सना सेफ झोन संपण्यापूर्वी तुम्हाला शक्य तितक्या शत्रूंना मारून मोठा स्कोअर करायचा आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त शत्रूंवर विजय मिळवणं हेच प्लेअर्सचे ध्येय असते. यासाठी त्यांना वेगवेगळ्या गेमिंग आयटम्सची गरज असते. प्लेअर्सना हे गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी कोणतेही डायमंड खर्च करावे लागू नयेत आणि गेमिंग आयटम्स मोफत मिळावेत, यासाठी गरेना सतत रेडिम कोड्स जारी करत असते. बातमी सविस्तर वाचा

  • 25 Aug 2025 10:01 AM (IST)

    25 Aug 2025 10:01 AM (IST)

    पुण्यात यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नीचा मृत्यू; रुग्णालयाला नोटीस

    पुण्यात  यकृत प्रत्यारोपणानंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.   त्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने पुण्यातील त्या खाजगी रुग्णालयालाही नोटीस बजावली आहे. यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने हे पाऊल उचलण्यात आले. विभागाने सोमवारी (२५ ऑगस्ट) सकाळी १० वाजेपर्यंत रुग्णालयाला संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे.

  • 25 Aug 2025 09:57 AM (IST)

    25 Aug 2025 09:57 AM (IST)

    शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी

    Shinde-Fadnavis Dispute: राज्यातील सत्ताधारी युतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. नगरविकास विभागाच्या कारभाराबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरविकास विभागाच्या कामकाजावर फडणवीसांनी ताशेरे ओढले असून अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणा कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या असल्याचे समजते.

Marathi Breaking news live updates: राज्यातील सत्ताधारी युतीत  कनाथ शिंदे आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. नगरविकास विभागाच्या कारभाराबाबत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

केंद्र सरकारच्या योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगरविकास विभागाच्या कामकाजावर फडणवीसांनी ताशेरे ओढले असून अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणा कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या असल्याचे समजते.

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime sports international business lifestyle entertainment breaking news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: पुणे महापालिका निवडणूक २०२५ भाजप-शिंदे सेनेला फायदा; राष्ट्रवादी चिंतेत
1

Top Marathi News Today: पुणे महापालिका निवडणूक २०२५ भाजप-शिंदे सेनेला फायदा; राष्ट्रवादी चिंतेत

Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात
2

Top Marathi News Today: राज्यावर अस्मानी संकट; अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

Top Marathi News Today : राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण
3

Top Marathi News Today : राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

Top Marathi News Today : मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी
4

Top Marathi News Today : मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.