(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी दरवर्षी गणेश चतुर्थी उत्साहात साजरा करताना दिसत असते. परंतु, यावर्षी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरी गणेश चतुर्थी साजरी होणार नसल्याचे समजले आहे. दरवर्षी शिल्पा शेट्टी तिच्या घरी बाप्पाचे स्वागत करते. पण यावर्षी कुटुंबात शोककळा असल्याने ती परंपरेनुसार १३ दिवस कोणतीही पूजा करणार नाही आहे. शिल्पा शेट्टीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे. स्वतः ही माहिती अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आहे.
कुटुंबात शोक असल्याने गणपती उत्सव होणार नाही
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, ‘प्रिय मित्रांनो, तुम्हाला कळवण्यात येत आहे की, कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या निधनाने आम्ही यावर्षी गणपती उत्सव साजरा करू शकणार नाही, याचे आम्हाला खूप वाईट वाटत आहे. परंपरेनुसार, आम्ही १३ दिवस शोकात असू, म्हणून कोणत्याही धार्मिक उत्सवापासून दूर राहू. आम्हाला तुमच्या सहानुभूतीची आणि प्रार्थनांची अपेक्षा आहे.’ शिल्पाने कुंद्रा कुटुंबाच्या वतीने ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
मनोज बाजपेयीच्या ‘Inspector Zende’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
कधी आहे गणेश उत्सव?
गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट रोजी आहे जो संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या सणाला लोक त्यांच्या घरी बाप्पाचे स्वागत करतात. त्यांच्या सुंदर मूर्ती घरात आणून, १० दिवस आनंदात आणि मोठ्या उत्साहात घालवतात. त्यांची सेवा करतात. त्यांची पूजा करतात. विविध ठिकाणी पंडाल उभारले जातात, जिथे लोक एकत्रितपणे बाप्पाची पूजा करतात. गणेश चतुर्थीपासून गणपती उत्सव दहा दिवस चालू राहतो. दहा दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होते.
एका नवीन शोसोबत परतले अश्नीर ग्रोव्हर; ‘Rise And Fall’ ची घोषणा, ‘१६’ सेलिब्रिटी करणार धमाका
शिल्पा-राजने प्रेमानंद महाराजांना दिली होती भेट
काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा वृंदावनमध्ये आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी तिथे उपस्थित राहिले होते. या दरम्यान राज कुंद्राने प्रेमानंद महाराजांना त्यांची किडनी दान करण्याची ऑफर दिली होती, जी आध्यात्मिक गुरूंनी नम्रपणे नाकारली. त्यांनी जोडप्याला सतत परमेश्वराचे नाव जप करत राहण्याचा सल्ला देखील दिला.