Maharashtra Breaking News
23 Aug 2025 10:00 AM (IST)
तुम्ही देखील अँड्रॉईड स्मार्टफोन युजर आहात का? मग तुम्ही देखील गेल्या दोन दिवसांपासून नक्कीच वैतागला असेल. याचं कारण म्हणजे कॉल आणि डायलर सेटिंगमध्ये झालेला बदल. कोणत्याही अपडेटशिवाय कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलली आहे. विवो, रेडमी, वनप्लस, पोको अशा अनेक स्मार्टफोन्समध्ये हा नवीन बदल पाहायला मिळत आहे. या नवीन बदलांमुळे अनेक स्मार्टफोन युजर्स वैतागले आहेत. या बदलाबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट वायरल होत आहेत. सोशल मीडियावर या बदलाचे कारण विचारले जात आहे. मात्र अनेकांना बदलाबाबत माहिती नाही. फोनमध्ये झालेल्या बदलामुळे युजर्सच्या डोक्याला ताप झाला आहे. हा बदल का झाला आणि याचं कारण काय, तुम्ही तुमची स्मार्टफोन सेटिंग पहिल्यासारखी कशी करू शकता.
23 Aug 2025 09:55 AM (IST)
गोंदियामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोंदियाच्या सडक- अर्जुनी तालुक्याच्या खजरी शेतशिवारात सापडलेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा झाल्याचं समोर आलं आहे. केवळ हत्याची नाही तर त्या मृत महिलेच्या ७ महिन्याच्या मुलाची विक्री करण्यामागील टोळीचा भांडाफोड करीत ७ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा उलगडा गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.
23 Aug 2025 09:50 AM (IST)
Kolhapur News: कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी ( २ ऑगस्ट) कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर भागात संध्याकाळी दोन गटात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. ही घटना सर्किट बेंचपासून काही अंतरावर घडली. नमाजानंतर दोन्ही गटांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला आणि काही क्षणातच वातावरण बिघडले. दगडफेकीत अनेक लोक जखमी झाले आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले.
23 Aug 2025 09:50 AM (IST)
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहूजा यांच्यात पुन्हा एकदा दुराव्याच्या चर्चा रंगत आहेत. काही वृत्तांनुसार, सुनीता यांनी गोविंदापासून घटस्फोटासाठी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.या अफवांच्या पार्श्वभूमीवर सुनीता आहूजाने एका मुलाखतीत इमोशनल अपील केली आहे. “गोविंदाला जितकं मी ओळखते तितकं कुणीच ओळखू शकत नाही. त्याच्यावर माझ्यासारखं कुणी प्रेम करू शकणार नाही किंवा त्याला इतकं समजू शकणार नाही,” असं त्या म्हणाल्या. सुनीता यांनी हेही मान्य केलं की, त्यांना ९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदाची खूप आठवण येते. त्यांनी भावनिक शब्दांत म्हटलं, “जुना गोविंदा परत ये. माझा ची ची परत माझ्याकडे ये.”
23 Aug 2025 09:48 AM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे आज (२३ ऑगस्ट) भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे, याआधी दोन दिवसांपूर्वीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर लगेचच अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणार असल्याने राज्यात राजकीय चर्चांना जोर आला आहे. मात्र या भेटीत नेमकी कोणती चर्चा होणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
23 Aug 2025 09:45 AM (IST)
येवला : सध्या ऑनलाईन गेमची अनेकांना सवय लागली आहे. काहींना तर याचं एकप्रकारे व्यसनच लागले आहे. या ऑनलाईन गेमच्या अतिआहारी गेलेले अनेक तरुण आत्महत्या करत असल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. आता याच पब्जीचे लोण ग्रामीण भागातही पसरल्याचे दिसून येत असून, पब्जीच्या या खेळाने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना येवला तालुक्यातील देवळाणे येथे घडली.
23 Aug 2025 09:41 AM (IST)
कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी ( २ ऑगस्ट) कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर भागात संध्याकाळी दोन गटात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. ही घटना सर्किट बेंचपासून काही अंतरावर घडली. नमाजानंतर दोन्ही गटांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला आणि काही क्षणातच वातावरण बिघडले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत अनेक लोक जखमी झाले आणि अनेक वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
23 Aug 2025 09:40 AM (IST)
भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात ती गर्भवती राहिल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
23 Aug 2025 09:35 AM (IST)
23 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,052 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,214 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,539 रुपये आहे. 22 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,076 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,231 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,553 रुपये होता.
23 Aug 2025 09:30 AM (IST)
वरवंड : दौंड तालुक्यातील शिरूर सुपा-अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात झाला. पडवी फाट्यावर खडी वाहतूक करणाऱ्या हायवाने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला हायवाने मागील चाकाखाली चिरडले. यामध्ये पती कबाजी भीमाजी कोळपे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी अलका कबाजी कोळपे या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
23 Aug 2025 09:26 AM (IST)
बीड : एका सरकारी वकिलाने वडवणी न्यायालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता या प्रकरणाला बीड जिल्ह्यात वेगळी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात थेट न्यायाधीश रफिक शेख आणि एका कर्मचाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
23 Aug 2025 08:55 AM (IST)
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र आंदोलनाआधीच राज्य सरकारने महत्त्वाची हालचाल सुरू केली आहे. मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलं असून, या समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
23 Aug 2025 08:51 AM (IST)
दादर येथील कबूतरखाना बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला होता. कबुतरांच्या विष्ठेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा न्यायालयाने दिला होता. त्यानंतर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्यास बंदी लागू केली होती.
मात्र, या निर्णयाला जैन समाजाने तीव्र विरोध दर्शवला होता, त्यामुळे हा मुद्दा अधिक चिघळला होता. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतरांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी १३ सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे.
23 Aug 2025 08:49 AM (IST)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एटीएममधून पैसे काढणे आणि जमा करण्याच्या (Cash Withdrawal व Cash Deposit) नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल होणार असून, ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अधिक भार पडणार असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
Marathi Breaking news live updates: पुणे महापालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठे बदल टाळण्यात आले असून करवे, पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या कमी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
उपनगरांमध्ये मात्र फेरबदल करण्यात आले असून प्रभाग मोठे झाल्याने नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आली आहे. या बदलांचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, या प्रभागरचनेचा फायदा भाजप आणि शिंदे गटाला होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.