Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live: स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज

Marathi breaking live marathi- राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूत्रामुळे अनेक जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतमध्ये आरक्षण ५० टक्क्यांवर गेले. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 28, 2025 | 11:05 AM
LIVE
Top Marathi News Today Live:

Top Marathi News Today Live:

Follow Us
Close
Follow Us:
  • 28 Nov 2025 11:05 AM (IST)

    28 Nov 2025 11:05 AM (IST)

    महात्मा जोतिराव फुले यांची पुण्यतिथी

    अस्पृशता निवारण आणि स्त्री शिक्षणाचा ध्यास हाती घेतलेल्या महात्मा जोतिराव फुले यांनी आजन्म यासाठी प्रयत्न केले. आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. ते महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते, जे “महात्मा फुले” या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी समाजातील जातिभेद, अस्पृश्यता आणि लिंगभेदावर कडाडून टीका केली आणि याविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी आणि उपेक्षित लोकांसाठी शिक्षणाचे कार्य केले. फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचा पाया भारतामध्ये रचला.

  • 28 Nov 2025 10:59 AM (IST)

    28 Nov 2025 10:59 AM (IST)

    पंतप्रधान मोदींनी T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाची घेतली भेट!

    भारतीय महिला खेळाडूंचा या वर्षी आंतरराष्ट्रिय स्तरावर दबदबा पाहायला मिळाला. संघांनी कमालीची कामगिरी आतापर्यत केली आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या ब्लाइंड क्रिकेट संघाने विश्वचषक नावावर केला होता. या स्पर्धेमध्ये भारताच्या ब्लाइंड क्रिकेट संघाने एकहि सामना न गमावता जेतेपद नावावर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या महिला अंध क्रिकेट संघाची भेट घेतली. पंतप्रधानांनी स्वतः संपूर्ण संघाला मिठाई वाटली आणि त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

  • 28 Nov 2025 10:52 AM (IST)

    28 Nov 2025 10:52 AM (IST)

    स्मार्टफोन मार्केटमध्ये होणार धिंगाणा!

    Honor Magic 8 Pro गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटसह लाँच करण्यात आलेला हा पहिला स्मार्टफोन होता. आता Honor चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन मलेशियासारख्या ग्लोबल मार्केटमध्ये देखील लाँच करण्यात आला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करताना या स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. Honor Magic मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि IP68, IP69, आणि IP69K रेटिंग दिली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये या स्मार्टफोनची किंमत किती आहे आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत, याबाबत जाणून घेऊया.

  • 28 Nov 2025 10:46 AM (IST)

    28 Nov 2025 10:46 AM (IST)

    लिसा हिली का अनसोल्ड झाली?

    उत्तर प्रदेश वॉरियर्सने त्यांच्या राईट टू मॅच कार्डचा वापर करून दीप्ती शर्माला ₹३.२ कोटी (अंदाजे $१.५ दशलक्ष) मध्ये पुन्हा विकत घेतले, तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हीली विकली गेली नाही. हीलीसाठी मोठी बोली अपेक्षित होती, परंतु कोणत्याही संघाने तिला घेण्यास रस दाखवला नाही, ज्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले. आता, हीलीच्या न विकल्या गेलेल्या खरेदीमागील मुख्य कारण उघड झाले आहे.

  • 28 Nov 2025 10:38 AM (IST)

    28 Nov 2025 10:38 AM (IST)

    टीडीएसने कर संकलनाला दिला ‘सुपर बूस्ट’

    केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, २०२४-२५ या कर निर्धारण वर्षात ज्यामध्ये आर्थिक वर्ष २३-२४ मधील उत्पन्न समाविष्ट आहे, एकूण करदात्यांचा आधार वार्षिक १७% वाढून ११६.१ दशलक्ष झाला, तर दाखल रिटर्नची संख्या केवळ ८.०८ दशलक्ष होती, जी वार्षिक ५.९% वाढ आहे. सीबीडीटीने या आठवड्याच्या सुरुवातीला हे आकडे जाहीर केले होते.

  • 28 Nov 2025 10:27 AM (IST)

    28 Nov 2025 10:27 AM (IST)

    भारत WTC च्या अंतिम फेरीत कसा पोहोचणार?

    भारत घरच्या मैदानावर श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळेल, तर ऑस्ट्रेलिया टीम इंडियाचे यजमानपद भूषवेल. जर आपण गेल्या दोन WTC सायकल्सवर नजर टाकली तर, ज्या संघांनी 60 ते 65 टक्के गुण मिळवले त्यांना WTC फायनलचे तिकीट मिळाले. WTC पॉइंट्स टेबलमध्ये ६० टक्के गुणांचा टप्पा ओलांडण्यासाठी भारताला उर्वरित नऊ सामन्यांपैकी किमान सहा सामने जिंकावे लागतील. भारताला कमीत कमी काहीही परवडणारे नाही. श्रीलंका (दूर, २ कसोटी – ऑगस्ट २०२६): येथे आमचा रेकॉर्ड चांगला आहे, पण तरीही क्लीन अप करणे ही एक मोठी गोष्ट आहे.

  • 28 Nov 2025 10:19 AM (IST)

    28 Nov 2025 10:19 AM (IST)

    कोल्हापूर स्थानिक निवडणुका

    कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक ठिकाणी गटबाजी, स्थानिक घराणेशाही आणि वैयक्तिक संबंधांवर आधारित आघाड्या उभ्या राहत असून या सर्वांमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे पक्षांची अधिकृत चिन्हे जवळजवळ गायब झाली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे, गाणी, प्रचार साहित्य आणि प्रतीके गाजत असतात; मात्र स्थानिक निवडणुकीत हीच पक्षनिष्ठा कमी होऊन पूर्णपणे स्थानिक आघाड्यांच्या रंगाने रंगलेली दिसत आहे.

  • 28 Nov 2025 10:11 AM (IST)

    28 Nov 2025 10:11 AM (IST)

    70 वर्षातील सर्वात मोठी आपत्ती; 4,600 लोकांची घरे उद्ध्वस्त

    हाँगकाँगमधील (China) वांग फुक कोर्ट या विशाल निवासी संकुलात लागलेली भीषण आग शहराने मागील ७० वर्षांत पाहिलेली सर्वात दारुण दुर्घटना ठरली आहे. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी अचानक भडकलेल्या आगीने काही क्षणांतच संपूर्ण परिसराला कवेत घेतले आणि सात उंच ३२ मजली इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या. या भयावह घटनेत आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली असून २८० हून अधिक रहिवाशी अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश असून अनेकांनी जीव धोक्यात घालून बचावकार्य केले.

  • 28 Nov 2025 09:59 AM (IST)

    28 Nov 2025 09:59 AM (IST)

    सुधारित जीएसटी दरांमुळे व्यवहारात लक्षणीय वाढ!

    GST Economic Outlook:  वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण केल्याने वापरात लक्षणीय वाढ झाली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आणि विकासाचा वेग टिकवून ठेवण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. गुरुवारी अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाच्या ऑक्टोबरच्या मासिक आर्थिक आढावामध्ये असे म्हटले आहे की, महागाईचा दबाव कमी झाल्यामुळे आणि अलिकडच्या कर सुधारणांमुळे घरगुती उत्पन्नात वाढ झाल्यामुळे जवळच्या काळात वापराचा दृष्टिकोन सकारात्मक दिसत आहे.

  • 28 Nov 2025 09:55 AM (IST)

    28 Nov 2025 09:55 AM (IST)

    भारतीय शेअर बाजारात वाढीची शक्यता

    India Share Market Update: जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० शुक्रवारी, २८ नोव्हेंबर रोजी वाढण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सौम्य सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,४१४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २४ अंकांनी जास्त होता.

  • 28 Nov 2025 09:53 AM (IST)

    28 Nov 2025 09:53 AM (IST)

    बोरामणीच्या सरपंचपदी अरुणा साळुंखेच कायम

    सोलापूर : निवडणुकीचा खर्च सादर केला नसल्याचे कारण देत बोरामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच अरुणा साळुंखे यांच्यासह सात सदस्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाविरोधात सरपंच साळुंखे यांच्यासह अपात्र सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळवली. त्यामुळे बोरामणीच्या सरपंचपदी तूर्तास तरी अरुणा साळुंखे याच कायम राहिल्या आहेत.

  • 28 Nov 2025 09:50 AM (IST)

    28 Nov 2025 09:50 AM (IST)

    दिल्ली उच्च न्यायालयाचा अजय देवगणला दिलासा

    बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. अंतिम आदेश देताना न्यायालयाने म्हटले आहे की अभिनेत्याचे फोटो, व्हिडिओ आणि इतर वैयक्तिक गोष्टी त्याच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्ता ( Al ) द्वारे त्याचे नाव आणि प्रतिमा खोट्या किंवा आक्षेपार्ह पद्धतीने वापरण्यास मनाई केली आहे.

  • 28 Nov 2025 09:45 AM (IST)

    28 Nov 2025 09:45 AM (IST)

    अभूतपूर्व वाढ! चांदीचा दर आकाशाला भिडला

    Gold Rate Today: भारतात 28 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,774 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,709 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,580 रुपये आहे. भारतात 28 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,17,090 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,27,740 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,800 रुपये आहे. भारतात 28 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 173.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,73,100 रुपये आहे.

  • 28 Nov 2025 09:43 AM (IST)

    28 Nov 2025 09:43 AM (IST)

    युजवेंद्र चहल दुसऱ्या लग्नासाठी सज्ज?

    क्रिकेटपटू युझवेंद्र चहल हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. त्याने २०२० मध्ये डान्सर आणि कंटेंट क्रिएटर धनश्री वर्माशी लग्न केले. या दोघांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि त्यांनी २०२२ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता या जोडप्याचा घटस्फोट झाला आहे आणि २०२५ मध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेऊन विभक्त झाले आहेत. धनश्रीशी घटस्फोट झाल्यानंतर, युझवेंद्र चहल दुसऱ्या लग्नाचा विचार करत असल्याचे समोर आले आहे. त्याने दुसऱ्या लग्नाचे संकेत दिले आहेत.

  • 28 Nov 2025 09:40 AM (IST)

    28 Nov 2025 09:40 AM (IST)

    MS Dhoni च्या घरी पार्टिचा आनंद घेण्यासाठी पोहोचले पंत आणि रोहित शर्मा

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू रांचीमध्ये पोहोचले आहेत. भारताचे अनेक खेळाडू हे 27 नोव्हेंबरलाच रांचीला पोहोचले आहेत. क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघ रांचीमध्ये येऊन त्याचा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी न जाता जाणे अशक्य आहे. गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे खेळाडू रांचीमधील धोनीच्या घरी डिनर पार्टीसाठी गेले होते.

  • 28 Nov 2025 09:36 AM (IST)

    28 Nov 2025 09:36 AM (IST)

    फ्री फायर मॅक्समध्ये सुरु झाला व्हेकेशन रिंग ईव्हेंट

    फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन गेमिंग ईव्हेंटची एंट्री होत आहे. आता पुन्हा एकदा गेममध्ये एका नवीन ईव्हेंटची एंट्री झाली आहे. हा एक व्हेकेशन रिंग ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना हॉलिडे वाईब्स आणि सि फोम बंडल जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे तुमच्या कॅरेक्टरला गेममध्ये फंकी आणि कूल लुक मिळणार आहे. याशिवाय, ईव्हेंटमध्ये वेपन स्किन क्लेम करण्याची देखील संधी मिळणार आहे, ज्यामुळे तुमच्या बंदूकची शक्ती अनेक पटीने वाढणार आहे. याशिवाय यूजर्सना त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठी मदत होणार आहे. जर तुम्हाला या सर्व वस्तू मिळवायच्या असतील, तर हा गेमिंग इव्हेंट तुमच्यासाठी आहे.

  • 28 Nov 2025 09:34 AM (IST)

    28 Nov 2025 09:34 AM (IST)

    माहीला भेटण्यासाठी विराट कोहली पोहोचल फार्म हाऊसवर

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू रांची येथे पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेमध्ये बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. रांची हे एमएस धोनीचे मूळ गाव आहे. त्यामुळे त्याने विराट कोहली आणि ऋषभ पंत सारख्या खेळाडूंसाठी त्याच्या घरी डिनर पार्टीचे आयोजन केले होते.

  • 28 Nov 2025 09:32 AM (IST)

    28 Nov 2025 09:32 AM (IST)

    Mundeshwari Temple : ‘हे’ आहे जगातील सर्वात जुने हिंदू मंदिर

    बिहारच्या (Bihar) कैमूर जिल्ह्यातील मुंडेश्वरी टेकडीवर वसलेले मुंडेश्वरी माता मंदिर आज जगातील सर्वात जुने कार्यरत मंदिर म्हणून ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून ६०८ फूट उंचीवरील या टेकडीवर वसलेले हे प्राचीन शक्तीपीठ हजारो वर्षांपासून अखंडपणे पूजेचे केंद्रबिंदू राहिले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (ASI) विविध शिलालेख, शकेकालीन पुरावे आणि ब्राह्मी लिपीतील लेखांच्या आधारे या मंदिराचे बांधकाम सुमारे १०८ इसवी सनाचे असल्याचे मान्य केले आहे. यामुळे मुंडेश्वरी मंदिराला ‘जगातील सर्वात जुने अखंड कार्यरत मंदिर’ हा मान मिळाला आहे.

  • 28 Nov 2025 09:32 AM (IST)

    28 Nov 2025 09:32 AM (IST)

    PAK vs SL : श्रीलंकेने पाकिस्तानला 6 धावांनी हरवून अंतिम फेरीत केला प्रवेश

    पाकिस्तानमध्ये सध्या ट्राय सिरीज खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये तीन संघ सहभागी झाले आहेत. या मालिकेचा सेमीफायनलचा सामना श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवण्यात आला. टी-२० ट्राय सिरीजच्या सहाव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने आधीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर श्रीलंकेच्या विजयाने झिम्बाब्वेचा प्रवास संपुष्टात आला आहे.

  • 28 Nov 2025 09:28 AM (IST)

    28 Nov 2025 09:28 AM (IST)

    GST growth: सुधारित जीएसटी दरांमुळे व्यवहारात लक्षणीय वाढ!

    GST Economic Outlook:  वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांचे सुसूत्रीकरण केल्याने वापरात लक्षणीय वाढ झाली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी आणि विकासाचा वेग टिकवून ठेवण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. गुरुवारी अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाच्या ऑक्टोबरच्या मासिक आर्थिक आढावामध्ये असे म्हटले आहे की, महागाईचा दबाव कमी झाल्यामुळे आणि अलिकडच्या कर सुधारणांमुळे घरगुती उत्पन्नात वाढ झाल्यामुळे जवळच्या काळात वापराचा दृष्टिकोन सकारात्मक दिसत आहे.

Marathi breaking live marathi- ओबीसी आरक्षण कायम झाल्यानंतर राज्य शासनाने जवळपास ३-४ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. नगर परिषद व नगर पंचायतींची प्रक्रियाही सुरू झाली आहे. परंतु, आता त्यात आरक्षणाच्या टक्केवारीचे विघ्न आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याने नाराजी व्यक्त करत निवडणुका रोखण्याचा इशारा दिला. शुक्रवारी (दि. २८) यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून, फैसला होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Web Title: Marathi breaking news today live updates political national entertainment sports crime weather update business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 09:25 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today:  आज संविधान दिवस: भारतीय इतिहासातील सुवर्णदिन; जाणून घ्या २६ नोव्हेंबरचा इतिहास
1

Top Marathi News Today: आज संविधान दिवस: भारतीय इतिहासातील सुवर्णदिन; जाणून घ्या २६ नोव्हेंबरचा इतिहास

Top Marathi News Today:  राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी
2

Top Marathi News Today: राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी

Dharmendra Passes Away News Update : डॉ. गौरी गर्जे प्रकरणात काय म्हणाले मंत्री पंकज भोयर?
3

Dharmendra Passes Away News Update : डॉ. गौरी गर्जे प्रकरणात काय म्हणाले मंत्री पंकज भोयर?

Top Marathi News Today Live:  लाडक्या बहिणींनी KYC कशी करावी?
4

Top Marathi News Today Live: लाडक्या बहिणींनी KYC कशी करावी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.